✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जम्मू- कश्मीर मदत कार्य अनुभव- १

म
मार्गी यांनी
Wed, 10/29/2014 - 16:51  ·  लेख
लेख
सर्वप्रथम मिपा संस्कृतीला मन:पूर्वक अभिवादन! मिपा टीम आणि मिपावरील सर्व मान्यवर लेखक- वाचकांना मन:पूर्वक नमस्कार. आज मिपावर लिहायला सुरूवात करताना आदराची भावना मनात आहे. आजवर मिपावर असंख्य दर्जेदार, अभ्यासपूर्ण आणि रंजक लेख वाचले. अशा मिपावर लेखन करताना सर्वांना पुनश्च अभिवादन करावसं वाटत आहे. हे लिहिण्याची सुविधा दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद किंवा मिपा भाषेत धन्स! :) पूरग्रस्त जम्मू- कश्मीरमध्ये मदत कार्यात थोडा सहभागा घेता आला; त्याबद्दल काही लिहू इच्छितो. जम्मू- कश्मीरच्या 240 हून अधिक गावांमध्ये एकल विद्यालये आणि अन्य प्रकल्प चालवणा-या सेवा भारती जम्मू- कश्मीर संस्थेने तिथे मोठं मदतकार्य केलं आहे. त्यामध्ये 15 दिवस सहभाग घेतल्याचे हे अनुभव हिंदीमध्ये ब्लॉगवर प्रकाशित करत आहे आणि इथे त्याचा सारांश देत आहे. सेवा भारती जम्मू- कश्मीरसोबत मदत कार्यासाठी देशभरातून 200 पेक्षा जास्त डॉक्टर्स आणि व्हॉलंटिअर्स अनेक टप्प्यांमध्ये तिथे आले होते. मदत कार्याचा मुख्य भर आरोग्य शिबिरांवर होता. आता पुढच्या टप्प्यात उपजीविका आणि घरांसाठी सहाय्य असा प्रयत्न केला जात आहे. . . जम्मूहून श्रीनगरला जाताना बनिहालमार्गे असलेला मुख्य रस्ता काही ठिकाणी बंद असल्यामुळे जातानाच राजौरी व पुलवामासारख्या प्रसिद्ध भागातून तिथे जावं लागलं. श्रीनगरपर्यंतच्या प्रवासात सोबत असलेले कश्मिरी लोक फारसे बोलत नव्हते. 5 ऑक्टोबरला ईदच्या रात्री श्रीनगरला पोहचलो तेव्हा पूराच्या खुणा लगेचच दिसत नव्हत्या. उलट लोक परत सामान्य स्थितीत आहेत, असं वाटत होतं. काही रस्त्यांवर कचरा होता आणि काही ठिकाणी तुंबलेलं पाणी अजूनही दिसत होतं. संस्थेच्या कार्यालयाकडे जाण्यासाठी रिक्षात बसण्यापूर्वी रिक्षावाल्याने हिंदु का मुसलमान असं विचारलं! संस्थेच्या मगरमल बाग़ चौकाजवळ दोन एँब्युलन्स संस्थेद्वारे केले जाणारे मदत कार्य दर्शवत होत्या. सेवाभारती जम्मू कश्मीरच्या मदत कार्याचा व्हिडिओ अधिक माहितीसाठी: जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १ क्रमश: सर्वांना पुनश्च धन्यवाद.:)
  • जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव २
  • जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ३
  • जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ४
  • जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ५
  • जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ६
  • जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ७
  • जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ८
  • जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ९
  • जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १०
  • जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ११
  • जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १२
  • जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १३ आपत्तीची 'आपबिती'
  • जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १४ नैकपोरामधील शिबिर
  • जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १५ मदतकार्यातील सहभागाचा शेवटचा दिवस
  • जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १६ (अंतिम)

Book traversal links for जम्मू- कश्मीर मदत कार्य अनुभव- १

  • जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
9760 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

मी पयला...

बॅटमॅन
Wed, 10/29/2014 - 16:54 नवीन
साहेब, जरा अजून विस्ताराने लिहा की हो. लै जबराट विषय अन तुमचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

पुभाप्र!

आदूबाळ
Wed, 10/29/2014 - 17:02 नवीन
पुभाप्र!
  • Log in or register to post comments

जाहिरात करा हो ब्लॉगची हर्कत

ऋषिकेश
Wed, 10/29/2014 - 17:12 नवीन
जाहिरात करा हो ब्लॉगची हर्कत इल्ले. पण इथेही लेखन द्या. हाफिसातून ब्लॉग्ज उघडत नाहीत.
  • Log in or register to post comments

अखेर मार्गी आला !

गिरीश मांधळे
Wed, 10/29/2014 - 17:34 नवीन
अखेर मार्गी आला !
  • Log in or register to post comments

जरा विस्तारानं सविस्तर वर्णन

शिद
Wed, 10/29/2014 - 17:37 नवीन
जरा विस्तारानं सविस्तर वर्णन वाचण्यास उत्सुक. बाकी तुम्ही केलेल्या मदत कार्याबद्दल धन्यवाद व अभिनंदन.
  • Log in or register to post comments

कॉमेंटी राखुन ठेवण्यात आल्या

प्रसाद१९७१
Wed, 10/29/2014 - 18:23 नवीन
कॉमेंटी राखुन ठेवण्यात आल्या आहेत.
  • Log in or register to post comments

पुभाप्र. ब्लाॅगची लिंक द्याल

बोका-ए-आझम
Wed, 10/29/2014 - 19:02 नवीन
पुभाप्र. ब्लाॅगची लिंक द्याल का?
  • Log in or register to post comments

उत्तम

विकास
Wed, 10/29/2014 - 19:19 नवीन
मिसळपाव संस्थळावर आपले स्वागत आहे! पूरग्रस्तांना केलेल्या सेवाकार्याबाबत आपण आपले अनुभव कथन करत आहात त्याबद्दल आभार! आपण पुढच्या भागात काही फोटो टाकले तसेच काही प्रसंगावर अधिक विस्ताराने लिहीले तर वाचकांना अजून आवडू शकेल. पुढच्या भागासाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

आवडला. विस्ताराने लिहिले तर

विवेकपटाईत
Wed, 10/29/2014 - 20:07 नवीन
आवडला. विस्ताराने लिहिले तर वाचायला अधिक आनंद येईल.
  • Log in or register to post comments

सर्वांना धन्यवाद!

मार्गी
गुरुवार, 10/30/2014 - 04:58 नवीन
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! इथून पुढे अगदी सविस्तर लिहेन. सारांश न लिहिता इथे पूर्ण लिहेन. पुढचा भाग लवकरच लिहेन. :)
  • Log in or register to post comments

छान

देवदत्त परुळेकर
गुरुवार, 10/30/2014 - 09:04 नवीन
सुरवात उत्तम. सविस्तर लिहा.
  • Log in or register to post comments

छान सुरुवात!

पैसा
गुरुवार, 10/30/2014 - 17:34 नवीन
सविस्तर वाचायला आवडेल!
  • Log in or register to post comments

गुड !!

सुहास..
गुरुवार, 10/30/2014 - 18:37 नवीन
गुड !!
  • Log in or register to post comments

वाचतोय.

अर्धवटराव
Sat, 11/01/2014 - 01:20 नवीन
लाख मोलाचं कार्य आहे.
संस्थेच्या कार्यालयाकडे जाण्यासाठी रिक्षात बसण्यापूर्वी रिक्षावाल्याने हिंदु का मुसलमान असं विचारलं!
याचा काहि संदर्भ लागला का पुढे ?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा