जम्मू- कश्मीर मदत कार्य अनुभव- १
सर्वप्रथम मिपा संस्कृतीला मन:पूर्वक अभिवादन! मिपा टीम आणि मिपावरील सर्व मान्यवर लेखक- वाचकांना मन:पूर्वक नमस्कार. आज मिपावर लिहायला सुरूवात करताना आदराची भावना मनात आहे. आजवर मिपावर असंख्य दर्जेदार, अभ्यासपूर्ण आणि रंजक लेख वाचले. अशा मिपावर लेखन करताना सर्वांना पुनश्च अभिवादन करावसं वाटत आहे. हे लिहिण्याची सुविधा दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद किंवा मिपा भाषेत धन्स! :)
पूरग्रस्त जम्मू- कश्मीरमध्ये मदत कार्यात थोडा सहभागा घेता आला; त्याबद्दल काही लिहू इच्छितो. जम्मू- कश्मीरच्या 240 हून अधिक गावांमध्ये एकल विद्यालये आणि अन्य प्रकल्प चालवणा-या सेवा भारती जम्मू- कश्मीर संस्थेने तिथे मोठं मदतकार्य केलं आहे. त्यामध्ये 15 दिवस सहभाग घेतल्याचे हे अनुभव हिंदीमध्ये ब्लॉगवर प्रकाशित करत आहे आणि इथे त्याचा सारांश देत आहे. सेवा भारती जम्मू- कश्मीरसोबत मदत कार्यासाठी देशभरातून 200 पेक्षा जास्त डॉक्टर्स आणि व्हॉलंटिअर्स अनेक टप्प्यांमध्ये तिथे आले होते. मदत कार्याचा मुख्य भर आरोग्य शिबिरांवर होता. आता पुढच्या टप्प्यात उपजीविका आणि घरांसाठी सहाय्य असा प्रयत्न केला जात आहे.
. . जम्मूहून श्रीनगरला जाताना बनिहालमार्गे असलेला मुख्य रस्ता काही ठिकाणी बंद असल्यामुळे जातानाच राजौरी व पुलवामासारख्या प्रसिद्ध भागातून तिथे जावं लागलं. श्रीनगरपर्यंतच्या प्रवासात सोबत असलेले कश्मिरी लोक फारसे बोलत नव्हते. 5 ऑक्टोबरला ईदच्या रात्री श्रीनगरला पोहचलो तेव्हा पूराच्या खुणा लगेचच दिसत नव्हत्या. उलट लोक परत सामान्य स्थितीत आहेत, असं वाटत होतं. काही रस्त्यांवर कचरा होता आणि काही ठिकाणी तुंबलेलं पाणी अजूनही दिसत होतं. संस्थेच्या कार्यालयाकडे जाण्यासाठी रिक्षात बसण्यापूर्वी रिक्षावाल्याने हिंदु का मुसलमान असं विचारलं! संस्थेच्या मगरमल बाग़ चौकाजवळ दोन एँब्युलन्स संस्थेद्वारे केले जाणारे मदत कार्य दर्शवत होत्या.
सेवाभारती जम्मू कश्मीरच्या मदत कार्याचा व्हिडिओ
अधिक माहितीसाठी:
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १
क्रमश:
सर्वांना पुनश्च धन्यवाद.:)
- जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव २
- जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ३
- जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ४
- जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ५
- जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ६
- जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ७
- जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ८
- जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ९
- जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १०
- जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ११
- जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १२
- जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १३ आपत्तीची 'आपबिती'
- जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १४ नैकपोरामधील शिबिर
- जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १५ मदतकार्यातील सहभागाचा शेवटचा दिवस
- जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १६ (अंतिम)
Book traversal links for जम्मू- कश्मीर मदत कार्य अनुभव- १
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी पयला...
पुभाप्र!
जाहिरात करा हो ब्लॉगची हर्कत
अखेर मार्गी आला !
जरा विस्तारानं सविस्तर वर्णन
कॉमेंटी राखुन ठेवण्यात आल्या
पुभाप्र. ब्लाॅगची लिंक द्याल
उत्तम
आवडला. विस्ताराने लिहिले तर
सर्वांना धन्यवाद!
छान
छान सुरुवात!
गुड !!
वाचतोय.