Skip to main content

आजही माझ्याचपासुन दूर मीही

लेखक स्नेहदर्शन यांनी सोमवार, 20/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आजही माझ्याचपासून दूर मीही तू जशी आहे तसा मजबूर मीही भेटण्या जितकी मला उत्सुक असते ये, व्यथे ये, तेवढा आतुर मीही जेवढे जातो जवळ, ती लांब जाते वाटते आता राहावे दूर मीही लागला होता तिला माझा लळा पण, प्रेमही केले तसे भरपूर मीही एवढे शिकलो यशस्वी डाव त्यांचे, जाहलो बघ खेळताना क्रूर मीही सांगणारे सांगता लाखो कहाण्या नीट आता वाचतो मजकूर मीही ----स्नेहदर्शन​
दिवाळी अंक वर्ष

वाचने 2031
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया