संकेतस्थळावरील लेखनाचा, एक फसलेला दिवाळी अंक !!!

गेल्या अनेक दिवसांपासून मोठा गाजावाजा केलेल्या, एका सौम्य आणि सभ्य भाषेसाठी प्रसिद्ध असलेल्या, आणि संकेतस्थळावर वावरणा-या आणि त्यांनीच वाचावा या हेतूनेच की काय, निघालेला दिवाळी अंक नुकताच वाचण्यात आला. संकेतस्थळावरील दिवाळी अंकाचे वेगळेपण काय असावे, तर सर्वसामान्य वाचकांची कोणतीही अभिरुची भरुन निघेल असा, वेगळेपण असलेले लेखन आणि नवलेखकांना लिहिण्यासाठी प्रेरणा मिळावी. वेगळेपणाचा एक साहित्यिक अनुभव मिळावा,वाचकाची ब्रम्हानंदी टाळी लागावी हा हेतू या दिवाळी अंकात असावा असा एक समज आमच्या मनात होता, तसे मात्र काहीच दिसत नाही. एका संकेतस्थळावरील प्रस्थापीत लेखकांचा दिवाळी अंक वाटला. त्यांचेच लेखन निवडून संपादित केलेल्या लेखनास दिवाळी अंक म्हणायचे का ? जे लेखक सतत लिहित असतात त्यांच्या लेखनात तसे वेगळेपण काही नसताना त्याच पठडीतले लेखन दिवाळी अंक टाकण्याचा उद्दामपणा आम्हाला कळला नाही. वाचतांना दिवाळी अंक नव्हे तर संकेतस्थळावरील लेखन वाचतो आहे असेच वाटत होते. आणि संपादकीय मधून संपादक मंडळानीच ' आम्ही केवळे भारवाही' असे म्हणून की काय त्याचे समर्थनच केले आहे असे वाटते. कोणतेही वेगळे साहित्य प्रकार नाही. सामाजिक, आणि राजकीय या विषयांच्या जवळ जाणारा एकही लेख त्यात आढळत नाहीत. कथा, लेख, अनुभव, कविता, प्रवासवर्णन, मुलाखती,पाककृती, या अशा ठरावीक साच्यातला हा अंक. लेखनाच्या अनुक्रमेत वाचक सोयीचे वाटेल तेथून वाचायला सुरुवात करतो आम्ही कवितेपासून वाचायला सुरुवात केली.
नेहमीप्रमाणेच चित्तांची ''तुझ्या शहरात मी जातो'' ही कविता सुंदर झालेली' आहे. पण, संकेतस्थळावरील वाचकांना चित्तांची ओळख असल्यामुळे त्यांची कविता वाचतांनाही त्यांच्याच संकेतस्थळावरील कविता वाचतोय असे वाटले. प्रसाद शिरगावकरांची 'सारांश'. मुकुंद भालेरावांची ''एक कविता लिहीन म्हणतो, मिलिंद फनसेंची 'कोणासाठी'' या कविता, मात्र जबराच आहे. थोडा समय आहे, कुमार जावडेकरांचीही सुंदर कविता आहे. पटतच नाही, अजब. चुकलो म्हणेन मी तर सोकावतील सारे, चक्रपाणी चिटणीस. कविता कशी हवी अनिरुद्ध १९६९, चकवा, ओकार क-हाडे. तु असता तर, प्राजकता. आणि दिवाळी पहाट या कविता वाचनीय आनंद देतात.म्हणजे त्यांच्यामुळेच हा दिवाळी अंक आहे, असे क्षणभर वाटते. निर्भयतेच्या नभात, प्रदीप कुलकर्णी आणि उत्पल चंदावरच्या निमित्तमात्र आणि श्रावणसरी या शब्दरचनेच्या बाबतीतल्या नोंद घेण्यासारख्या कविता आहेत.
मात्र थेंबाचे निरोप, जयंता ५२, तनामनातुन दाटलेला, संतोष कुलकर्णी. मुकतता, हर्षल भडकमकर. श्रेयस, मुग्धा रिसबुड. प्रीत बावरी ,मुक्तछंदा. या कविता रसास्वादाच्या बाबतीत वाचकांना खिळवून ठेवतील का या बाबत मात्र आमच्या मनात शंका आहे.
त्यानंतर अनुभवात ''आक्का'' ही मिरा फाटकांचे व्यक्तिचित्र म्हणावे की अनुभव तेही सुरेखच झाले. लेखिकेने स्मरणातले प्रसंग सहीच रेखाटलेले आहेत, त्यातला चित्रपट थेटरातला -
''अगं, तू कशाला इतकं वाईट वाटून घेतीयस? रडू नको, गप बघू! गप." मग मात्र मला माझं रडू आवरावंच लागलं! '' अशा प्रसंगातुन आक्का विशेष लक्षार राहते, मात्र अशा लेखनात समारोप फार महत्त्वाचा असतो. शेवट वाचतांना वाचक हेलावला पाहिजे असा असावा लागतो, अशी एक साधारणता अपेक्षा असते, इथे मात्र तसे होत नाही. त्यामुळे वाचनातली मजा निघून जाते.
अक्कलदाढ आली तर, कुशाग्रांचा अनुभव छान झाला आहे. पण असे दात आणि डॉक्टरांचे अनेक प्रसंग वाचक वाचत असतात म्हणून या अनुभवांची खोली तितकीशी वाटत नाही. मात्र विनोदी पद्धतीने लिहित असल्यामुळे वाचकांची करमणूक होते.
दिघुकाका हे व्यकितीचित्र मात्र माधव कुलकर्णी यांनी कसदारपणे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, त्यात ते यशस्वी झाले आहेत असे वाटते.
माध्यमाची ताकद वाढवणार्या अनेक साधनांपैकी एक असलेले मी कॉश्चूम डिझायनरच आहे, डिझायनरची नव्या विषयाची ओळख चित्रपटातील विविध अनुभवासहीत अज्जुका यांनी मस्त करुन दिली आहे. वा-या पोलिसचौकीची. मी दादरकर, यांचा अनुभव आणि संकेतस्थळवर लेखन प्रसिद्ध केल्यानंतरच्या विविध भावना रोहिनी यांनी ''स्वगत'' मधून मस्त मांडलेले आहे. स्वाती दिनेश यांचे जर्मनीचे सरकारी अनुभवही छान झाले आहेत.
लेखांमधे, परसृष्टीचा शोध घेणारे वरदा वैद्य, यांचा लेख संदर्भासहीत झाल्याने एकदम क्लासवन झाला आहे. जरा लेखाची लांबी वाढल्यासारखे वाटते. अर्थात आवडणारा लेख असेल तर वाचक लांबीचा विचार थोडाच करतो.
जीवन जिज्ञासा, यांचे कवडसे पकडणारा कलावंत अंतोन चेकॉव्ह यांच्या कथांवर लिहिण्यात आलेला लेख मस्त आहे, चेकॉव्हची ओ़ळख सहीच करुन दिली आहे. रावसाहेबांच्या त्यांच्या ठारविक शैलीतील गीतकार कैफी आझमीची गाण्यांची ओळख झकास झाली आहे. आनंदघन यांची कोणत्याच काळात न संपणा-या दशावताराचा अर्थ भविष्यकाळात सोयीने घेतला तर ते महत्त्वाचे कसे आहे हे पटवून देणारा लेखही बरा उतरला आहे.
जगभर नावलौकिक असलेल्या समाजसेविका क्रिस्टिनाच्या कार्याची आणि तिच्या कामाची ओळख ममा टिना हा प्रदीप यांचा लेख या दिवाळी अंकाचे वैशिष्टे वाटावा असा आहे.
घाटपांडे यांचा आवडता विषय फलजोतिष इथेही आहे, पण या प्रवाहात माधव रिसबूडांचे वैचारिक मंथन आणि त्यांच्याशी असलेल्या घरोब्याचे संबध त्यासाठी माधव रिसबूड एक कठोर फलज्योतिष चिकित्सक !वाचण्यासारखे आहे, मात्र या लेखातून लेखकाची भुमिका स्पष्ट होत नाही असे वाटते.
प्रवास वर्णनात खीद्रापूरच्या शिवमंदिराचे वर्णन छान झाले आहे, प्रियाली यांचे प्रवासवर्णन स्वप्ननगरीच्या जादूनगरीत त्यांच्या इतर लेखनाप्रमाणे झकासच झाले आहे.
मुलाखतीत, मंगला गोडबोले यांची सुवर्णमयी यांनी घेतलेल्या मुलाखतीमुळे त्यांची साहित्यविषयक दृष्टीकोण समजण्यास वाचकांना नक्कीच आवडेल.त्या तुलनेत सुहास जगागिरदार यांची लांबलेली मुलाखत वाचायला कंटाळवाणी वाटते.
कथेच्या बाबतीत कोहम यांची गर्ता ही कथा दर्जेदार वाटली. जिद्द, प्रभाकर पेठकरांची लांबलेली कथाही मस्तच आहे, जज्जाची कोठी 'द जजेस हाऊस' या लघुकथेचं स्वैर रुपांतर दर्जेदार झाले आहे. विसुनानांची एक दिवाळी अशीही येते दर्जेदार झालेली आहेत. श्रावण मोडक यांचे झाड, अरुण वडूलकर यांचे बटाटा हाईट्स, जोरदार झाले आहे. एकूणच काय या दिवाळी अंकातल्या कथा या प्रकारांनी बाजी मारली आहे तर, त्याला हातभार लावला कविता प्रकारांनी. विनोदाचा अभाव नजरेत भरणारा आहे,बाकी..........संकेतस्थळावरचे वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेले लेखनाचा संग्रह आहे. वाचक म्हणून आपल्याला लिहिणारे ते सुंदरच लिहितात, या भावनेने वाचायला काय हरकत आहे.
संपादक मंडळाची मात्र लेख निवडतांना दमछाक झाली असेल. नाकारलेल्या लेखकांच्या लेखनाच्या संबधी आता वर्षभर शिमगा चालेल. मात्र संपादकांनी लेखनाची केलेली निवड आणि त्यांच्यामुळेच अंकाचा दर्जा, सभ्य आणि सौम्य करण्यास मदत झाली असावी, मात्र नवीन ते काही देऊ शकले नाही हे अपयश लपवण्यासारखे नक्कीच नाही.

वाचने
16445
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
बिरुटेशेठ,
जरुर काढू !!!
In reply to बिरुटेशेठ, by विसोबा खेचर
कौतुकास्पद!
काहीतरीच
फसलेला?
गुरुंची शिकवण !!!
In reply to फसलेला? by आजानुकर्ण
हा हा हा
In reply to गुरुंची शिकवण !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बोधकथा
In reply to गुरुंची शिकवण !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कर्णा,
In reply to बोधकथा by आजानुकर्ण
फसवणूक
In reply to कर्णा, by विसोबा खेचर
फसवणूक नव्हे सत्य !
In reply to फसवणूक by आजानुकर्ण
कोकणातले का हो? :)
In reply to फसवणूक नव्हे सत्य ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कारण सांगा ना!
In reply to फसवणूक नव्हे सत्य ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फार मागे लागले बॉ तुम्ही !!!
In reply to कारण सांगा ना! by आजानुकर्ण
पटण्याजोगे...
In reply to फार मागे लागले बॉ तुम्ही !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोणती पुस्तके वाचावी बॉ ?
In reply to पटण्याजोगे... by विसोबा खेचर
आम्ही
In reply to कोणती पुस्तके वाचावी बॉ ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा क्या बात है !!!
In reply to आम्ही by विसोबा खेचर
बिरुटे सर,
नोंद घेतली आहे !
In reply to बिरुटे सर, by कोलबेर
बरोबर आहे
In reply to नोंद घेतली आहे ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक फसलेली? की फसवणारी समीक्षा?
देव साहेब,
In reply to एक फसलेली? की फसवणारी समीक्षा? by प्रमोद देव
छान..
टायटल
बिरुटेसाहेब, मनोगतवरचा नसता तर....
अवघड प्रश्न विचारला बॉ :)
In reply to बिरुटेसाहेब, मनोगतवरचा नसता तर.... by एकवाचक
अहो राहू
In reply to अवघड प्रश्न विचारला बॉ :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एकच आयडी
In reply to अहो राहू by नंदा प्रधान
>>प्रत्येक
In reply to एकच आयडी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
युयुत्सु
In reply to >>प्रत्येक by नंदा प्रधान
आमच्या
In reply to युयुत्सु by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
उलटा न्याय
In reply to युयुत्सु by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
?
.
ह्ही ह्ही ह्ही.
In reply to . by मारवा
आजानुकर्णांचे प्रतिसाद जबरा