✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्वायत्त महाराष्ट्र

व
विजुभाऊ यांनी
Sat, 09/27/2014 - 11:56  ·  लेख
लेख
राज ठाकरेनी परवा महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिन्ट प्रकाशीत केली. यात महाराष्ट्राच्या विकासा बद्दल बरेच मुद्दे आहेत. पायाभूत सुविधा ,मुलभूत गरजा , प्रशासन , प्रगतीच्या संधी अशा अनेक अंगाने महाराष्ट्राच्या विकासाचा विचार केलेला आहे. यात काही ठिकाणी उदा: प्रशासन : यात राज्याचे परराष्ट्र धोरण हे वेगळे विधान आहे. यात म्हंटले आहे की. विकासात्मक व्यापार वृद्धीसाठी राज्याची थेट, स्वतंत्र व सक्रिय भूमिका
आज जागतिकीकरणामुळे सगळे देश एकमेकांशी जोडले गेले आहेत. या देशांतील राष्ट्र सरकारांपेक्षा राज्य सरकारांना कधी नव्हे ते जास्त महत्त्व आले आहे. केंद्र शासन बर्‍याच वेळा राज्य व स्थानिक विशिष्ट आर्थिक आणि व्यापारी गरजा न समजल्यामुळे व त्यांची जास्त माहिती व ज्ञान नसल्यामुळे त्याप्रमाणे धोरण व कार्यक्रम आखून राबवू शकत नाही. यावर उपाय म्हणून प्रगत देशांमध्ये कायद्यानेच आज राज्य व स्थानिक शासनांना परदेशी राज्यांशी, परदेशी कंपन्यांशी प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार, व्यापार निर्णय करता येतो. महाराष्ट्र राज्य शासनास ही अशा प्रकारचे कायदे करून स्थानिक विकासाला चालना देण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे.
या साठी
राज्याच्या किंबहुना स्थानिक बाजाराची व्यापारी गणिते - उदाहरणार्थ नाशिकचा कांदा वा नागपूरची संत्री, कोकणचा आंबा हा कधी, कुणाला, कोणत्या देशाच्या कोणत्या राज्याला, किती प्रमाणात, काय किंमतीने विकायचा हे ठरविण्याचे अधिकार, या व्यापार वाटाघाटी राज्य अथवा स्थानिक पातळीवर व्हायला पाहिजे, तसे ते होत नाही. त्यामुळे इथला शेतकरी जागतिक बाजारापासून अनभिज्ञ राहतो. जसे कापसाची जागतिक बाजारातील किंमत ही प्रत्यक्ष इथल्या शेतकर्‍याला मिळतच नाही. व त्याआधारे तो आपल्या शेतीतील पुढील गुंतवणूक, पीक पद्धत ठरवू शकत नाही. काय करायला हवं? कलम ३७० मुळे जसे जम्मू-काश्मीर ला विशेष दर्जा प्राप्त झाला आहे, तसे महाराष्ट्र राज्याला परराष्ट्र व्यापार विषयक निर्णय घेण्याचे अधिकार मिळविण्यासाठी केंद्राशी वाटाघाटी करायला हव्या महाराष्ट्र राज्य परराज्य व जागतिक व्यापार संघटनेची स्थापन करायला हवी. ज्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला जागतिक व्यापार धोरण आखणीसाठी आवश्यक प्रशासनिक व प्रशिक्षणाचे सहाय्य करता येऊ शकेल.
या सर्वांसाठी मनसे च्या ब्ल्यूप्रिन्ट मधे महाराष्ट्राला स्वायत्तता असावी असे विधान केलेले आहे. हे विधान या निवडणूकीत तसेच त्या नंतरही बरेच वादग्रस्त ठरणार आहे. कदाचित पुढील मध्यावधी निवडणुका याच मुद्द्यावर लढल्या जाणार आहेत.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12420 वाचन

💬 प्रतिसाद (51)

प्रतिक्रिया

जाऊ द्या हो मिपाकरांनो कशाला वेळ घालवता ?

सामान्यनागरिक
गुरुवार, 10/02/2014 - 15:32 नवीन
राज ठाकरे हे नीट पुरेसा विचार करुन राजकारणात आलेलेनाहीर्त. हे शेंबड्या पोराला सुद्धा कळते. पंचवीसेक आमदार आले तरी दोन अडीचशे नक्की ! मनसेच्या कार्यालया बाहेर बोर्ड दिसेल- आमचे येथे वाजवी भावात आमदार विकत मिळतील. टीप : वेगवेगळ्या विधेयक पास करुन घेण्याचा चार्ज जादा पडेल. तो त्या आमदारास विचारुन घेणे,. नेंतर तक्रार चालणार नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा