✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अनवाणी नवरात्र

द
दिपक.कुवेत यांनी
गुरुवार, 09/25/2014 - 11:54  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, आजपासून नवरात्र सुरु होतयं. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. गरब्याच्या साथीने हे नउ दिवस जाउन दसरा कधी उजाडतो ते कळतहि नाहि. दसर्‍याच्याहि सर्वांना आगाउ शुभेच्छा. वेल तर ह्या कालावधीत काहि लोकं नॉनवेज तर खात नाहिच पण ९ दिवस सगळीकडे अनवाणी फिरतात; अगदि ऑफिस ला सुद्धा बिना चप्पल / बूट येतात. हा नक्कि काय प्रकार आहे? हे असं करण्यामागे नक्कि काय भावना आहेत? व्यक्तिश निदान मला तरी हे पटत नाहि. अर्थात प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते त्या बद्द्ल आक्षेप नाहि पण मी पाहिलयं जाताना वाटेवर एखादं मंदिर असेल तर लोक रस्त्यावरुन पण नमस्कार करताना चपला/बूट काढून करतात. निदान मी तरी बूट घालूनच नमस्कार करायचो/अजूनहि करतो. तुमच्यापैकि कोणी असं काहि फॉलो करतं का?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
28893 वाचन

💬 प्रतिसाद (138)

प्रतिक्रिया

देवी अस्तित्वात असेल तर काही

धन्या
Fri, 09/26/2014 - 21:29 नवीन
देवी अस्तित्वात असेल तर काही करेल ना. जी शक्ती अस्तित्वातच नाही तिच्याकडून मदत कशी मिळेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

धन्यवाद प्यारे

दिपक.कुवेत
गुरुवार, 09/25/2014 - 17:07 नवीन
हेच म्हणायला आलो होतो कि बास...अजून फक्त काहि प्रतिसाद
  • Log in or register to post comments

दीपक ला शतकी धाग्यासाठी आगाऊ

पिंपातला उंदीर
गुरुवार, 09/25/2014 - 17:11 नवीन
दीपक ला शतकी धाग्यासाठी आगाऊ शुभेच्छा! टोमणा कि जळ्जळ ? ह. घ्या
  • Log in or register to post comments

टोमणा कि जळ्जळ

दिपक.कुवेत
गुरुवार, 09/25/2014 - 17:18 नवीन
तूला काय वाटतयं ते!!! ओक्के?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

अरे बाबा प्रतिसाद आम्चे

पिंपातला उंदीर
गुरुवार, 09/25/2014 - 17:22 नवीन
अरे बाबा प्रतिसाद आम्चे मित्र्वर्य प्यारे याना होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

ओह मला वाटलं

दिपक.कुवेत
गुरुवार, 09/25/2014 - 17:25 नवीन
धागाकर्त्यालाच आहे. कुठुन हा विषय चर्चे करिता ठेवलाय असं झालय? धागा उडवता येईल का संमं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

मार्क टेलर ने Bradman चा

पिंपातला उंदीर
गुरुवार, 09/25/2014 - 17:30 नवीन
मार्क टेलर ने Bradman चा रेकॉर्ड तोडण्याची संधी असून पण डाव घोषित केल्याची आठवण झाली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

दीपकला टोमणा? त्याच्या

प्यारे१
गुरुवार, 09/25/2014 - 17:29 नवीन
दीपकला टोमणा? त्याच्या हातच्या पाकृ खायच्यात आम्हाला देवा! आणि जळजळ? ती तर आम्हाला वाटायची बंद झालीये कधीची. सीरियस शुभेच्छा दिल्या हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

.?

विनायक प्रभू
गुरुवार, 09/25/2014 - 17:59 नवीन
९ दिवस आण्खी काय ़काय ़ करायचे नाही म्हणे?
  • Log in or register to post comments

जे आम्हाला सोयिस्कर आणि केलं

प्यारे१
गुरुवार, 09/25/2014 - 18:15 नवीन
जे आम्हाला सोयिस्कर आणि केलं नाही तरी चालेल असं सगळं. बाकी साठी औषधं आहेतच. :) नुकताच आलेला प्रगोंचा धागा कुणी इकडे सुद्धा वापरेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

दिवस आण्खी काय ़काय ़ करायचे

सुहास..
गुरुवार, 09/25/2014 - 18:02 नवीन
दिवस आण्खी काय ़काय ़ करायचे नाही म्हणे? >> तुम्ही काही करु शकता , सल्ले/पालन ईतरांसाठी आहे मास्तर ;)
  • Log in or register to post comments

उपास

विनायक प्रभू
गुरुवार, 09/25/2014 - 18:49 नवीन
आण्खी कस्ले कस्ले उपास पाळायचे म्हणे?
  • Log in or register to post comments

आपापली कुवत, वकुब इ इ नुसार

सूड
गुरुवार, 09/25/2014 - 18:54 नवीन
आपापली कुवत, वकुब इ इ नुसार जे जमतील ते!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

पापी

विनायक प्रभू
गुरुवार, 09/25/2014 - 19:00 नवीन
मी कस्लेही उपास ़ पाळत नाही.म्हणजे मी पापी का?
  • Log in or register to post comments

मी कस्लेही उपास ़ पाळत नाही

सुहास..
गुरुवार, 09/25/2014 - 19:10 नवीन
मी कस्लेही उपास ़ पाळत नाही.म्हणजे मी पापी का? >> हो !! अगदीच अब्रम्हण्यम का काय ते ;) ( भिजलेले बेदाणे आणि जुळ्या चिंबोर्‍याची आठवण असलेला ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

भिजलेले बेदाणे आणि जुळ्या

मदनबाण
Fri, 09/26/2014 - 17:09 नवीन
भिजलेले बेदाणे आणि जुळ्या चिंबोर्‍याची आठवण असलेला जुळ्या चिंबोर्‍यांचा अर्थ त्यावेळी मला समजला नव्हता ! तेव्हा कोणीतरी माझ्या खव मधे ओरडुन गेल तेव्हा मला बोध झाला ! बाकी चिंबोरी प्रकरणा नंतर मास्तुरं बरेच दिवस मिपावर गैर हजर होतं... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- काजळमाया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

म्हणजे मी पापी का?

विजुभाऊ
गुरुवार, 09/25/2014 - 19:12 नवीन
म्हणजे मी पापी का?
लहान बाळाची पापी घेतात..........
  • Log in or register to post comments

बाळू

विनायक प्रभू
गुरुवार, 09/25/2014 - 19:15 नवीन
बायकोचे नाव बाळू?
  • Log in or register to post comments

चामड्याच्या नाही पण रबराच्या

सुबोध खरे
गुरुवार, 09/25/2014 - 20:59 नवीन
चामड्याच्या नाही पण रबराच्या किंवा प्लास्टिकच्या चपला (आणि पट्टा) घातलेला चालेल काय ?
  • Log in or register to post comments

शतकी धाग्यासाठी...

मुक्त विहारि
गुरुवार, 09/25/2014 - 21:40 नवीन
आमचा पण थोडा "प्रतिसाद-भार"....
  • Log in or register to post comments

आपण काहीतरी चांगलं केलं असं

असंका
Fri, 09/26/2014 - 16:30 नवीन
आपण काहीतरी चांगलं केलं असं वाटण्यासाठी एक सोपा आणि सहज मार्ग. सदा सर्वकाळ चांगलं वागणं हे सोपं नाही. लहापणी ऐकलेल्या "पुण्या"च्या ज्या अनेक कल्पना आहेत त्यातील आत्मक्लेश ही सर्वाधिक वेळा ऐकली गेलेली कल्पना आहे! हे असे सोपे मार्ग चोखाळून स्वतःचा चांगुलपणा एकदाचा सिद्ध केला की झालं. सदा सर्वकाळ चांगलं वागायची गरज संपली/कमी झाली.
  • Log in or register to post comments

सहमत

कोऽहम्
Fri, 09/26/2014 - 17:20 नवीन
वाघुळमानव(बॅटमॅन) व चौथ्या मितीशी (कोनाडा) सहमत. नावाचा अपभ्रंश केल्याबद्दल क्षमस्व, मैत्रीखात्यात खर्ची टाका. कळावे, मित्र
  • Log in or register to post comments

कोs हम, कोs हम ? मी कोण ? अहो

चौथा कोनाडा
Tue, 09/30/2014 - 21:48 नवीन
कोs हम, कोs हम ? मी कोण ? अहो अपभ्रंश कसला ? उलट आम्हाला चौथी मिती हे नविन नाव आवडलेले आहे (सॉरी, सध्याच्या "शुद्ध"लेखन प्रॅक्टीस नुसार आवडल्या गेलेले आहे) ((चौथा कोनाडा हे पुल्लिंगी नावाचे चौथी मिती हे स्त्रीलिंगी नांव म्हणजे नवरात्रा निमित्त देवीची कृपा समजावावी काय ?)) एनीवेज, चौथी मिती म्हंजे हे फारच भारदस्त बुद्धीवादी झाल्या सारखे वाटतेय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोऽहम्

ह्या पाय ....

माम्लेदारचा पन्खा
Fri, 09/26/2014 - 23:37 नवीन
नऊ दिवस चामड्याच्या चपला न वापरता अनवानी फिरण्यापेक्षा, चमडीगीरी सोडा, देवी आपोआप पावेल ......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

"देवी पावेल"...

खटपट्या
Sat, 09/27/2014 - 02:06 नवीन
"देवी पावेल"... देवी पटेल असं म्हणायचंय का ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

एक खुळचट प्रथा पाळली जात आहे.

पाषाणभेद
Sat, 09/27/2014 - 22:00 नवीन
एक खुळचट प्रथा पाळली जात आहे. देवी काय म्हणत नाय की पायात चपला घालत जावू नका म्हणून. आपल्याकडे नव्हते असले काही फॅड. सांगोसांगीतून असल्या प्रथा पाळल्या जातात. मी गेल्या पाच सहा वर्षांपासून नवरात्राचे उपास करतो आहे पण असले फॅड बघीतले नव्हते अन केलेही नव्हते. आमच्या कंपनीत एकाने चपला घालायच्या नाहीत म्हणून नाईट शिफ्ट घेतली बदलून. म्हणजे उगाचच दुसर्‍याला त्रास दिला. नाय पटत आपल्याला. त्याचप्रमाणे ऑफिसात असतांना नमाज पढणे देखील तोच प्रकार वाटतो. धर्म, देवकार्य, श्रद्धा अंधश्रद्धा आपाअपल्या घरात ठेवाव्या. बाहेर त्याचा देखावा करू नये या मताचा मी आहे.
  • Log in or register to post comments

सहमत.

प्रभाकर पेठकर
Sun, 09/28/2014 - 01:18 नवीन
धर्म, देवकार्य, श्रद्धा अंधश्रद्धा आपाअपल्या घरात ठेवाव्या. बाहेर त्याचा देखावा करू नये या मताचा मी आहे. सहमत. समस्या अशी आहे की कांहीतरी वेगळं (पुष्कळदा चमत्कारीक) वागून माझ्या भक्तीचं(?) प्रदर्शन नाही केलं तर माझ्याकडे कोणाचं लक्ष जात नाही आणि मला महत्त्व मिळत नाही. म्हणून प्रदर्शन अत्यंत आवश्यक बनून जातं. पुण्य मिळालं नाही मिळालं, मेल्यावर स्वर्गात गेलो की नर्कात तरी कोण पाहतंय, त्यात कांही सुख नाही. सुख ह्याच जन्मात चार लोकांची वाहवा शब्दात किंवा नुसत्या नजरेतही मिळविण्यात आहे. ('आमच्या कंपनीत एकाने चपला घालायच्या नाहीत म्हणून नाईट शिफ्ट घेतली बदलून.' बघा आला नं त्याचा उल्लेख!, ह्यात त्यांना सुख मिळतं.) शिवाय कोणी त्याला वेडेपणा म्हंटले तर 'माझी श्रद्धा आहे' असे म्हणून समोरच्याचे तोंड बंद करता येते. श्रद्धा आहे म्हंटल्यावर तर्काला स्थान नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

अन आजकाल रस्त्यांवर किती लोकं

पाषाणभेद
Sat, 09/27/2014 - 22:03 नवीन
अन आजकाल रस्त्यांवर किती लोकं थुंकतात. चपला न घालून फायदा न होता तोटाच होईल आरोग्याला. पुर्वी चपला न घालणार्‍यांचा वावर सीमीत प्रदेशात असावा. त्यामुळे तेथे आरोग्याची जपणूक होत असावी. आजकाल श्रावणात देखील चपला न घातल्याचे बघितले आहे. खुळचट प्रथा काहीही. निषेध.
  • Log in or register to post comments

दिपक्.कुवेत

प्रसाद गोडबोले
Sun, 09/28/2014 - 02:01 नवीन
कुवेत मधे अनवाणी पायाने फिरणे शक्य आहे का हो ?
  • Log in or register to post comments

@ प्रगो

दिपक.कुवेत
Sun, 09/28/2014 - 10:34 नवीन
अरेच्च्या पण मी अनवाणी फिरण्याचा प्रश्नच कुठे येतोय? धागा नीट वाचलाच ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

वाचला हो ...पण त्यात काही रस

प्रसाद गोडबोले
Sun, 09/28/2014 - 10:47 नवीन
वाचला हो ...पण त्यात काही रस वाटला नाही म्हणुन जरा वेगळे वळण घेतले ... चप्पल न घालणे , नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या अन टाय अन चड्ड्या बदलणे हे निव्वळ फ्यॅड आहे असे आपले स्पष्ट मत आहे ! अध्यात्मिकतेचे उत्सवीकरण हे हिंदुधर्मा/तत्वज्ञाना पुढील खरेच मोठ्ठे आव्हान आहे पण त्यावर चर्चा नको उगाच इथल्या सुडोसेक्युलर तत्वज्ञआनांच्या हातात कोलीत कशाला द्या ;) मागे वारी बंद करा म्हणाले मग गणेशोत्सव बंद करा म्हणाले ,लगेच गाडी नवरात्रीवर घसरेल मग काय दिवाळी आहेच नंतर... त्यांचे म्हणजे पायाला जखम झाली तर पायच तोडुन टाकला पाहिजे असले काहीसे लॉजिक आहे , कुठं सारखं सारखं त्यांच्या नादाला लागता ? आपल्याला आस्तिकनास्तिकपाव पेक्षा मिसळपावच जास्त आवडते =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

अनवाणी नवरात्र ?

काउबॉय
Sun, 09/28/2014 - 14:26 नवीन
अहो 9 दिवस देवीच्या मंदिरात उभे राहण्याचे व्रत पाळणारेही बघत आहे. दिवसभर उपास रात्री उभ्यानेच आधार घेउन झोपायचे सगळे विधी उभ्यानेच ना बसायचे ना पाठ टेकवायची... अन हे सर्व सामान्य संसारी लोक करत आहेत. 9 दिवस.
  • Log in or register to post comments

याने काय होणार???

टवाळ कार्टा
Sun, 09/28/2014 - 14:38 नवीन
याने काय होणार???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काउबॉय

हे वाचा सीटींग इज न्यु

कानडाऊ योगेशु
Sun, 09/28/2014 - 14:58 नवीन
हे वाचा सीटींग इज न्यु स्मोकिंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

होय प्रकार मला अनाकलनीयच वाटला.

काउबॉय
Sun, 09/28/2014 - 15:07 नवीन
सन्यास घेउन आजन्म उभे राहिल्याचे दावा करणाऱ्याना भेटलो आहे मला फारसा न पटलेला हां प्रकार आहे. त्यामुळे त्याचे वा याचे साध्य काय चे उत्तर मला तर काय बाबात्यातलं कळतं नाही हेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

श्रद्धा

vikramaditya
Sun, 09/28/2014 - 16:41 नवीन
स्वतःपुरती मर्यादीत असावी. सश्रद्ध असण्यात काही गैर नाही जो पर्यंत त्यामुळे स्वतःच्या प्रापंचीक जबाबदा-या पार पाडण्याचे सामर्थ्य मिळत असेल. परंतु त्यातुन कुठलाही इतर वैयक्तिक (कुटुंब, नोकरी, व्यवसाय या कडे दुर्लक्ष, कर्ज काढुन सण साजरे करणे असले प्रकार) किंवा सामाजिक (ध्वनी प्रदुषण, खंडणी वसुली, वाहतुकीचीगैरसोय आर्थिक फसवणुक, दडपशाही (धर्माची सक्ती), जीवहत्या इ.) त्रास होत नसेल तर.
  • Log in or register to post comments

'न जाणता' कोटीवरि| साधने केली

प्यारे१
Sun, 09/28/2014 - 17:13 नवीन
'न जाणता' कोटीवरि| साधने केली परोपरि| तरी मोक्षास अधिकारी| होणार नाही||
  • Log in or register to post comments

प्यारे काका ,

प्रसाद गोडबोले
Mon, 09/29/2014 - 06:19 नवीन
प्यारे काका , इथे मोक्ष कुणाला हवाय ? देव फॅशन झाला आहे फॅशन ... ( बायदवे हे काही आजचे अन नवीन नाही , स्वामी विवेकानंदही एका भ्हाषणात हे देवाचे धर्माचे तत्त्वज्ञानाचे उत्सवीकरण डेंजरस आहे असे म्हणाल्याचा उल्लेख आहे )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा