✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मराठी शिलालेखांतील शापवचने

प
प्रचेतस यांनी
Tue, 09/23/2014 - 23:42  ·  लेख
लेख
डिस्क्लेमरः खालील शापवचने मराठीतील प्राचीन शिलालेखांतील आणि मुख्यतः शिलाहार यादव आणि विजयनगरच्या राजांच्या काळातील आहेत. जरी ती कुणाला असभ्य वाटली (तशी ती असभ्य आहेतच) तरी ती केवळ तत्कालीन प्रथेचा भाग होती असे समजून वाचावीत. सुरुवातीला हा प्रतिसाद शशिकांत ओकांच्या ह्या धाग्यावर देणार होतो पण लिहिता लिहिता प्रतिसाद बर्‍यापैकी मोठा झाल्याने स्वतंत्र धागा काढूनच आपणांसमोर आणत आहे. गधेगाळीसंबंधी माहिती आधीच वीरगळ आणि गधेगाळ ह्या धाग्यात लिहिलेली आहेच तेव्हा त्याची परत येथे पुनरुक्ती न करता केवळ काही शापवचने थोडक्यात देतो. सर्वसाधारणपणे दिलेल्या दानाला जो कोणी बाधा आणेल अथवा जो कोणी हे दान मोडीला अशा व्यक्तीस अनुलक्षून गधेगाळींतील शापवचने असतात. तेहाची माय गाढव ... हे तर बहुतेकांना माहित आहेच. इतर काही शापवचने पुढीलप्रमाणे १. स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत वसुंधरां | षष्टिं वर्षसहस्राणि विष्टायां जायते कृमि: || हे शापवचन बर्‍याच शिलालेखांत आढळते. जो स्वकीय अथवा परकीय या पृथ्वीचे (दानाचे) हरण करेल तो ६००० वर्षे विष्ठेमधला कृमी होऊन राहील. २. ससन करुनु ग्रामु दिधला हे सासन लोपि तेआसि गोहत्या ब्रम्ह- हत्या बाळहत्या पडे तेयाचीऐ माऐसि गाडौ घोडु | विजयनगरचा संगम हरिहर ह्याचा हा लेख गोव्यातील वेळूस गावातला. (इ.स. १४०२) हे शासन जो मोडील त्यास गोहत्या, ब्रह्महत्या व बालहत्या ही पातके लागून त्याच्या आईस गाढव व घोडा. ३. शिलाहार अपरादित्य (द्वितीय) याचा लोनाड शिलालेख (इ.स. ११८४) इये शासने लिखिता भाषा जो लोपि अथवा लोपावि यो गर्दभनाथु गर्दभु तेहाचिए मांए सूर्यपर्वे गर्दभु झवे इति विचार्य तथा यस्य यस्य यदा भूमिस्तस्य ह्या शासनाचा जो लोप करील तो गाढवांचा नाथ गाढव व त्याचे आईस सूर्यपर्वात गाढव लागेल याचा विचार करून त्याप्रमाणे करावे. ४. पंढरपूरचा विठ्ठलदेवाचा शिलालेख (शके ११११) कवणु अतिसो देई तेआ- सी वीठलाची आण ए काज जो फेडि तो धात्रुद्रोहि शके ११११ रोजी सौम्य संवत्सरी (भिल्लम यादवाच्या) काळात महाजन, देवभक्त परिवार, मुद्रहस्त विठ्ठलदेवनायक या सर्वांनी हे लहान असे देऊळ बांधले. (या देवळास) कोणी अतिसो (पीडा/ उपद्रव) करील त्यास विठ्ठलाची शपथ आहे. हे कार्य जो नष्ट करील तो धातृद्रोही होय. ५. .उदयादित्याचा आंबेजोगाई येथील शिलालेख. (शके १०६६) जो फेडी लोपी तेआ योगिनींचा वज्रदंडू पडे हे शासन जो कोणी नष्ट करेल अथवा लुप्त करेल त्यावर योगिनींचा वज्रदंड पडेल. ६. विजयनगरचा संगम देवराय याचा गोवे- वेळूस शिलालेख (शके १४०८) स्र्हीरवळनाथा श्रीमाहादेवासी १० नैवेद्या चंद्रूसूर्यू तपे सासन लोपी तेआअ गोहते ब्रम्हते बआळते पडे तेआची माए गर्धभे... श्रीरवळनाथ महादेवाच्या १० नैवेद्यांसाठी हे दान दिले आहे. हे शासन जो ल्पील त्यास गोहत्या, ब्रह्महत्या व बालह्त्या ही पातके लागतील व त्याच्या आईस... ७. जैत्र सामंत याचा जालगाव ताम्रपट (शके ११२४) हे ठाकली भाषा चंद्रार्कपर्यत जो मेली तो श्वान गधभ चांडालु ही भाषा (हे दानपत्र) चंद्र व सूर्य आहेत तो पर्यंत सिद्ध आहे. ती जो कोणी फेडील तो श्वान, गर्दभ व चांडाळ होय. ८. सिंघण यादवाचा फुलंब्री शिलालेख (शके ११६४) जो मढाचे अयगत स्वोधाराए घेयवे ए मढु फेडील यचा दोषु ब्रम्हणभोजना फेडील यचा दोषुकरि ह्या मठाचे (देवळाचे) उत्पन्न स्वतःकडे घेणे हे ब्राह्मणभोजनाच विरोध करण्यासारखे असून असे करणारा तसा दोषकरी होईल. ९. .विजयनगरचा संगम देवराय याच्या वेळचा बांदोडे शिलालेख (शके १३३५) पाळावा केला हा धर्मु जो मोडि तेणे वाराण सि श्री विस्वेस्वरा सनिधि सूर्यग्रहणिं आपुला मातापिता गाए वदिल्या पापासि जाए | हा धर्म जो मोडील त्याने काशी येथे श्री विश्वेश्वरासन्निध सूर्यग्रहणाच्या वेळेस आपले आईबाप व गाई वधिल्या असे समजावे. त्यास हे पाप लागेल. १०. यादव रामचंद्रदेवाचा वेळापूर शिलालेख (शके १२२२) पाली तो स्वर्गा जाए न पाली तो नरका जाए हे दान जो पालन करील तो स्वर्गात जाईल, न करील तो नरकात जाईल. ११. पंढरपूर येथील विठ्ठलदेवाचा शिलालेख ( शके १२३३) हा धर्मु जो नाणि लोपि तो मळकु पाली ते- आचा धर्मु | परिवंडे मराठे | सेवकु विठलदेवा खेत्रपति सदैवु धाधर्म जो नष्ट करील तो मळकु (पापी) व जो पाळील याचे मराठी सेवक विठ्ठलदेवाचे सदैव क्षेत्रपती होत. १२. शिलाहार अपरादित्य याचा परळ शिलालेख ( शके ११०८) अथ तु जो कोणु हुवि ए शासन लो- पि तेया श्री वैद्यनाथ देवाची भाल सकुटुंबिआ पडे|| तेहाचीए माय गाढवें.... परंतु हे शासन जो कोणी नष्ट करील त्याच्यावर वैद्यनाथाच्या त्रिशुळाचा फाळ त्याच्या सर्व कुटुंबियांसुद्धा पडेल व त्याच्या आईस गाढव... १३. दाभोळ येथील जामा मशिदीतला मराठी शिलालेख यासि कोणी हिंदु वा मुसलमान इरे वा इस्ति करिल त्यावरिश त्याचे मएअवरि गडदा असे जाणिजे जो हिंदु अथवा मुसलमान ह्या स्थानाचा अवमान करील त्याचे मायेस गाढव.. असे समजा. संदर्भः प्राचीन मराठी कोरीव लेख (शं. गो. तुळपुळे)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
संदर्भ

प्रतिक्रिया द्या
35147 वाचन

💬 प्रतिसाद (74)

प्रतिक्रिया

मी पयला!!!!!!!!!!

बॅटमॅन
Tue, 09/23/2014 - 23:48 नवीन
मी पयला!!!!!!!!!! वल्लीशेठच्या लेखाला न्याय मिळेलशी प्रतिक्रिया नंतर यथावकाश देईनच, तूर्त ही पोच फक्त.
  • Log in or register to post comments

हे धत्तडतत्तड

एस
Tue, 09/23/2014 - 23:48 नवीन
मी पयला!.... ;-)
  • Log in or register to post comments

श्याट!!!!!

एस
Tue, 09/23/2014 - 23:49 नवीन
श्याट!!!!! ब्याट्या!!! XXXXXXXX
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

श्याट!!!!!

आदूबाळ
Wed, 09/24/2014 - 00:33 नवीन
श्याट!!!!!
गधेगाळीला शोभेलसा प्रतिसाद ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

>>गधेगाळीला शोभेलसा प्रतिसाद

सूड
Wed, 09/24/2014 - 00:51 नवीन
>>गधेगाळीला शोभेलसा प्रतिसाद __/\__ =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

श्या...न्ना इतकी प्राचीन

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/24/2014 - 00:01 नवीन
श्या...न्ना इतकी प्राचीन प्रंपरा आता बोला!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! =))
  • Log in or register to post comments

एकविसाव्या शतकातही अशी अनेक

मार्क ट्वेन
Wed, 09/24/2014 - 00:31 नवीन
एकविसाव्या शतकातही अशी अनेक शापवचने आढळली आहेत. विशेषकरून पुण्यग्रामाच्या आसपास. उदा - इये सोसायटीचिये फाटकासमोरु पार्किंग करी तो गाडौ जाणावा इये भिंतीवरू थुंकी तेहाची माय गर्दभे इ. इ.
  • Log in or register to post comments

आयला

रामपुरी
Wed, 09/24/2014 - 01:13 नवीन
गाढव घोड्याची परंपरा एवढी मागे जाते हे माहीतच नव्हतं. आता शिव्या देताना परंपरेचं पालन केल्याचासुद्धा आनंद मिळेल.
  • Log in or register to post comments

क्या बात है!!!

पिवळा डांबिस
Wed, 09/24/2014 - 02:20 नवीन
या पवित्र परंपरेचा पाईक रहाण्याची पात्रता अंगी टिकावी म्हणून सदैव प्रयत्न करीन!!!! :)
  • Log in or register to post comments

पुढची ओळ?

कवितानागेश
Wed, 09/24/2014 - 11:49 नवीन
पुढची ओळ? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

पुढची ओळ?

पिवळा डांबिस
Fri, 09/26/2014 - 02:53 नवीन
त्यापाई मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा, आणि वडिलधार्‍या माणसांचा प्राण घेईन!! आणि सर्वांशी औधत्याने वागेन. माझं मिपा आणि इब्लिस मिपाकर यांच्याशी सदैव टवाळक्या करण्याची मी प्रतिज्ञा घेतो. त्यांचे कट्टे आणि त्यांची ऐशीतैशी यांतच माझे सौख्य सामावले आहे!!! :) (आमीबी चार धागे तोडल्यात म्हंटलं, तटातटा!!!!) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

बेस्ट

कवितानागेश
Fri, 09/26/2014 - 09:35 नवीन
बेस्ट =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

हा हा हा

बॅटमॅन
Fri, 09/26/2014 - 15:10 नवीन
हा हा हा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

रामपुरी व डांबिसकाकांशी एक

अन्या दातार
Wed, 09/24/2014 - 04:54 नवीन
रामपुरी व डांबिसकाकांशी एक कोल्हापुरकर म्हणून जोर्दार सहमत :)
  • Log in or register to post comments

खिक्क

स्पा
Wed, 09/24/2014 - 07:11 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments

किती ती समृद्ध परंपरा...

धन्या
Wed, 09/24/2014 - 07:57 नवीन
किती ती समृद्ध परंपरा...
  • Log in or register to post comments

लावल्ली लवंगी फटाक्यांची माळ.

कंजूस
Wed, 09/24/2014 - 08:14 नवीन
लावल्ली लवंगी फटाक्यांची माळ.
  • Log in or register to post comments

हा हा हा. भारी!

अनुप ढेरे
Wed, 09/24/2014 - 09:34 नवीन
हा हा हा. भारी!
  • Log in or register to post comments

हे शिलालेख ज्यांच्या

विलासराव
Wed, 09/24/2014 - 10:20 नवीन
हे शिलालेख ज्यांच्या आदेशावरुन लिहीले त्यांच्या *** ** ***!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

वा विलासराव ! वर दिलेल्या १३

नाव आडनाव
Wed, 09/24/2014 - 10:48 नवीन
:) वा विलासराव ! वर दिलेल्या १३ जुन्या रेफरंस नंतर २१ व्या शतकातला रेफरंस म्हणून तुमची ही प्रतिक्रिया दिली जाईल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

बघा, बघा. इतकी बहरलेली

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/24/2014 - 10:58 नवीन
बघा, बघा. इतकी बहरलेली प्राचीन परंपरा असलेल्या शिव्यांना शिव्या देणे शोभते काय? =)) वल्लीशेट, तुस्सी ग्रेट हो !
  • Log in or register to post comments

बघा, बघा. इतकी बहरलेली

विलासराव
Wed, 09/24/2014 - 12:43 नवीन
बघा, बघा. इतकी बहरलेली प्राचीन परंपरा असलेल्या शिव्यांना शिव्या देणे शोभते काय? अरेरे!!!!!! मी तर शाप देणार्यांना ऊ:शाप दिलाय असेच समजत होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आयला पुर्वज लै ड्यांजर होते.

मृत्युन्जय
Wed, 09/24/2014 - 11:24 नवीन
आयला पुर्वज लै ड्यांजर होते. कसले कसले घाणेरडे शाप द्यायचे.
  • Log in or register to post comments

वल्लीबुवा यातील बहुतांश

गवि
Wed, 09/24/2014 - 11:56 नवीन
वल्लीबुवा यातील बहुतांश वचनांबाबत तो मूळचा आदेश/ नियम / कायदा इ इ काय होता की जो मोडल्यास त्या मोडणा-यांच्या मातु:श्रीना पशुप्रेमाची संधी दिली जात होती ते समजेल तर त्या कायद्यांचे कितपत महत्व होते तेही कळेल.
  • Log in or register to post comments

बहुतेकदा देवळास दिलेले दान

बॅटमॅन
Wed, 09/24/2014 - 14:47 नवीन
बहुतेकदा देवळास दिलेले दान उदा. माळ्याने काही फुले, तेल्याने काही तेल, सुताराने डागडुजीचे काम, इ.इ. काँट्रि करणे, रोज अभिषेक करणे, इ. नियम. ते मोडणारास, किंवा काही जमीन ब्राह्मणांस दान म्हणून दिलेली असे ती व्यवस्था मोडणारास इ.इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

+१

प्रचेतस
Wed, 09/24/2014 - 19:18 नवीन
यात देऊळ बांधणे, अग्रहार देणे, मूर्ती स्थापन करणे, वतन देणे आदी व्यवस्थांचाही समावेश होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पशुप्रेम

हरकाम्या
गुरुवार, 09/25/2014 - 23:44 नवीन
" पशुप्रेम " शब्दाबद्दल " गवि " चे अभिनन्दन . हा शब्द्प्रयोग वाचुनन्मी डोळ्यात पाणी येइइपर्यन्त हसलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

(No subject)

टवाळ कार्टा
Fri, 09/26/2014 - 10:00 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

पशुप्रेमाचे महत्व अन नियमभंग माहीत नाही

काउबॉय
Fri, 09/26/2014 - 14:18 नवीन
पण नियमाने हे अश्वमेध यज्ञातही यजमानाच्या घरच्यान्च्या वाट्याला येत असे ऐकिवात आहे. पण बहुदा तो गैरसमज असावा अथवा मला चुकीची माहिती मिळाली असावी.(संदर्भ अर्थातच चार्वाक : आह सालूंखे) असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

म्हणजे शिव्यांना फार

किसन शिंदे
Wed, 09/24/2014 - 12:09 नवीन
म्हणजे शिव्यांना फार अतिप्राचीन परंपरा आहे तर!! :-) एकापेक्षा एक डेन्जर शिलालेख आहेत मायला. =))
  • Log in or register to post comments

आणि लोक उगाच काम न करणाराला

प्यारे१
Wed, 09/24/2014 - 12:34 नवीन
आणि लोक उगाच काम न करणाराला गाढव म्हणतात. बघा बघा गाढव कित्ती 'कामा'चं आहे ते. वल्ल्या, भारीच रे!
  • Log in or register to post comments

वल्लीशेठ नेहमी प्रमाणेच लय

प्रमोद देर्देकर
Wed, 09/24/2014 - 13:27 नवीन
वल्लीशेठ नेहमी प्रमाणेच लय भारी खोदकाम. झालं नुकतंच मि.पा वर असलेलं निराकार गाढवाची मान ताठ झाली असेल. आता ते उलटुन येतय बघा हा लेख वाचल्यावर. चला कांडी टाकली आता पळा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

झालं नुकतंच मि.पा वर असलेलं

बॅटमॅन
Wed, 09/24/2014 - 14:48 नवीन
झालं नुकतंच मि.पा वर असलेलं निराकार गाढवाची मान ताठ झाली असेल. आता ते उलटुन येतय बघा हा लेख वाचल्यावर.
अश्लील, अश्लील ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

लै भारी.

जेपी
Wed, 09/24/2014 - 12:42 नवीन
लै भारी. लोक उगाच नाव ठेवत्यात आताची पिढी बिघडली मनुनशान
  • Log in or register to post comments

नामांकित संग्रह !

सस्नेह
Wed, 09/24/2014 - 12:43 नवीन
बाकी, काही आदरार्थी संबोधने बापाला उद्देशूनही असतील. संशोधन करावे, ही इणंती इशेष !
  • Log in or register to post comments

बाकी, काही आदरार्थी संबोधने

विलासराव
Wed, 09/24/2014 - 12:58 नवीन
बाकी, काही आदरार्थी संबोधने बापाला उद्देशूनही असतील. अर्थातच असतील. माझ्यामते आर्थीक/शारिरीक आनी मानसीक /भावनीक अशा शाखा ढोबळमानाने असाव्यात. जसे की तुझ्या बापाचं खातोय का? तुझ्या बापाची जागा आहे का? तुझ्या बापानी ठेव ठेवलीये का? तुझ्या बापाचा नोकर आहे का? ई. दुसर्या शाखेवर बरेचसे ज्ञानकण आधीच उधळले/सांडले गेलेले आहेतच. संशोधन करावे, ही इणंती इशेष ! वरील संशोधन केलेले लोक तितक्याच ईमानेईतबारे हे काम करु शकतील की नाही ही शंका आहे. मी करु शकलो असतो कदाचीत पण तेवढा अभ्यास नाहीये माझा. फारतर आम्ही मित्र आपापसात एकमेकांना प्रेमाने एकमेकांच्या बापांच्या नावाने हाक मारायचो बुवा कालेजात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

मस्त लेख..

शैलेन्द्र
Wed, 09/24/2014 - 12:46 नवीन
मस्त लेख.. आमच्या डोंबिवलीचा गधेगाळ आठवला..
  • Log in or register to post comments

वॉव.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/24/2014 - 12:46 नवीन
व्वा...!! सालं त्या काळातला समाज सध्या समाजापेक्षा जास्त चावट होता असे म्हणावे वाटते. सालं सभ्यपणा नव्हताच. सध्याच्या पिढीने नवीन काहीच भर घातली नाही. ;) वल्लीशेठ, अजून येऊ द्या. शिलालेखाचे फोटोसहीत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

इंग्रजांच्या अंमलाखाली

बॅटमॅन
Wed, 09/24/2014 - 14:49 नवीन
इंग्रजांच्या अंमलाखाली महाराष्ट्र सोवळा अन दांभिक बनला असे आमचे स्पष्ट मत आहे. तो हँगओव्हर इतका गच्च बसलाय की अजूनही तीच डिफॉल्ट स्थिती असे म्हटल्या जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा घ्या रतनवाडीतील अमृतेश्वर

प्रचेतस
Wed, 09/24/2014 - 19:21 नवीन
हा घ्या रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिराच्या पुढ्यातील गधेगाळ. दुर्दैवाने ह्यावरचा शिलालेख पूर्ण झिजून गेला आहे. पण शिवपिंडीवरचा अभिषेक पाहून निश्चितपणे मंदिराच्या काहीतरी व्यवस्थेसंबंधी असावा. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ही गधेगाळ नसून हत्तीगाळ आहे

बॅटमॅन
गुरुवार, 09/25/2014 - 02:49 नवीन
ही गधेगाळ नसून हत्तीगाळ आहे असा आपल्याशी मध्ये झालेल्या चर्चेत निष्कर्ष काढल्या गेला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हो. हत्तीगाळच आहे. पण

प्रचेतस
गुरुवार, 09/25/2014 - 08:49 नवीन
हो. हत्तीगाळच आहे. पण सरसकटपणे ह्यांना गधेगाळच (ass curses stones) म्हटल्या जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हम्म रैट्ट.

बॅटमॅन
गुरुवार, 09/25/2014 - 12:35 नवीन
हम्म रैट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

निराकार गाढव आता झीट येउन

मदनबाण
Wed, 09/24/2014 - 13:11 नवीन
निराकार गाढव आता झीट येउन पडेल ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ई निविदा घोटाळा प्रकरण : महापालिकेचे नऊ अभियंते निलंबित
  • Log in or register to post comments

रोचक माहिती.

शिद
Wed, 09/24/2014 - 13:30 नवीन
रोचक माहिती.
  • Log in or register to post comments

हम्म ! अस्स आहे तरं

सुहास..
Wed, 09/24/2014 - 14:57 नवीन
हम्म ! अस्स आहे तरं
  • Log in or register to post comments

मिपाशापवाणी !! ;)

सूड
Wed, 09/24/2014 - 14:59 नवीन
मिपाशापवाणी !! ;) अथ तु जो कोणु हुवि ए लेखा नावे ठेवि तेहाचीए खरडवहे मोजींचा लेखु अष्टोत्तरशत दिवसु चोप्यपेस्तु...तदुपरिही नावे ठेवि तेहाचिए खरडवहे अआंचे काव्य
  • Log in or register to post comments

ह घ्या हो !!

सूड
Wed, 09/24/2014 - 15:00 नवीन
ह घ्या हो !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

धन्यवाद.

आतिवास
Wed, 09/24/2014 - 15:22 नवीन
धन्यवाद. आपण ज्या संस्कृतीचं रक्षण करू पाहतोय, त्या संस्कृतीत 'अशाही' गोष्टी होत्या - आणि 'गावंढ्या' (!) लोकांनी नाही तर सुसंस्कृत लोकांनी असे शब्दप्रयोग वापरले होते; हे समजल्यावर संस्कृतीरक्षकांची प्रतिक्रिया 'पाहायला' मजा येते नेहमीच. काय योग्य आणि काय अयोग्य याचे सामाजिक संदर्भ वेळ, काळ, परिस्थिती, व्यक्ती... यांच्यानुसार बदलत असतात हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
  • Log in or register to post comments

+१

सूड
Wed, 09/24/2014 - 15:27 नवीन
अगदी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा