......आणि आमची पितरं जेवली.
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
.
पितृपक्षात पितरांना जेवायला घालतात. एक पिढी गेली कि पुढच्या पिढीचा नंबर......
माझे सासूसासरे असताना आमच्याकडे द्वादशीला पितरं असत.
ते दोघेही गेल्यानंतर (सासरे चतुर्दशीला व सासूबाई पितृपक्षात नवमीला गेल्या.)श्राध्द कोणत्या दिवशी घालावे हा प्रश्न पडला. कारण प्रत्येकवेळी वेगवेगळे करणे सगळ्यांच्या दृष्टीने सोपे नव्हते.म्हणुन ब्राह्मणाने अष्टमीला दोघांचे एकत्र करायला सांगितले
.त्याप्रमाणे १९९८ च्या पितृपक्षात अष्टमीला केले. आम्ही वेगळे राहत असलो तरी सासू-सासरे आमच्याकडे राहत असल्याने सगळी कार्ये आमच्याकडेच होतात.त्याप्रमाणे हेही कार्य झाले. दरवेळी द्वादशीला आणि आता अष्टमीला,थोडं वेगळंच वाटत होतं.
आमच्या भागात पावसाळ्यात खूप पाणी साचते. त्या वर्षी (१९९८)खूप पाऊस झाला आणि पूर आला.
आम्ही जेथे राहतो तेथे खाली तळमजल्यावर इस्पितळ होते. त्या स्त्रीरोगतज्ञ डॉ.आणि माझे खूप चांगले सबंध आहेत.
त्यांनी सकाळीच विचारले की जास्त पाणी आले की रुग्णांची रहायची सोय तुमच्याकडे होऊ शकेल का?आम्ही होकार दिला फक्त त्यांना अंथरुणे मात्र तुमचीच द्या असे सांगितले. सकाळी १० नंतर पाणी चढू लागल्याने इस्पितळाची उपकरणे आमच्या मोठ्या गच्चीत ठेवली. पत्र्याचे आच्छादन असल्याने भिजण्याचा प्रश्नच नव्हता.
नंतर एक एक रुग्ण येऊ लागले .एकंदरीत १० बायका होत्या. त्यातील ८ बाळंत झालेल्या होत्या त्यांची ८ छोटी बाळे २ शस्त्रक्रिया झालेल्या,आणि प्रत्येकीबरोबर कुणाची आई किंवा सासू अशा १० बायका ३ पुरुष तसेच डॉ.व त्यांच्या परिचारिका असे ३४ जण आमच्याकडे आले.
घर मोठे असल्याने सगळ्यांची सोय झाली बायकांना दिवाणखान्यात,माझे पती व मुले मुख्य शयनकक्षात तर डॉ. व मी दुसऱ्या शयनकक्षात तर परिचारिका स्वयंपाकघरात अशी व्यवस्था केली.पुरुषांना मात्र जिन्याजवळच्या मोकळ्या जागेत बसण्याची सोय केली.
पाणी ७ फुटापर्यंत वाढले होते. सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. आम्ही रुग्णांसाठी दुपारच्या जेवणात वरण भात व भाजी बनवले. त्यांना जेवू घातल्यावर आम्ही जेवलो.संध्याकाळी चहा दिला तेव्हडे दूध घरात होते. पाणी चढल्यामुळे वीजप्रवाह खंडीत केलेला होता. दूरध्वनी बंद होते.(त्यावेळेस आमच्याकडे मोबाईल नव्हते.)
संध्याकाळी अंधाराचे साम्राज्य पसरले होते. भयाण शांततेत फक्त पाण्याचा आणि कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज येत होता . संध्याकाळी आमच्या इमारतीतील वरच्या मजल्यावरील कुटुंबाने रुग्णांसाठी वरण बनवून दिले आम्ही भात व टोमाटो बटाट्याची भाजी बनवली, सगळे पोटभर जेवले. आम्ही न झोपता पाण्याची पातळी पाहत होतो. अखेर पहाटे ३ नंतर पाणी ओसरू लागले. सकाळी ६ वाजेपर्यंत सगळे पाणी ओसरून गेले. परंतु इस्पितळाची स्वच्छता होईपर्यंत रुग्ण नेता येत नव्हते.त्यामुळे सकाळचा चहा व पाव त्यांना आम्ही दिला. ६ नंतर पाणी ओसरल्याने त्यांचे नातलगही येऊ लागले होते. दुपारी रुग्ण पुन्हा इस्पितळात गेले. त्यांच्या नातलगांनी त्यांना जेवण आणले.सर्वजण गेल्यावर घर साफसूफ केले. आमचेही नातलग आम्हाला भेटायला आले. आमच्या दिराचे सहजच दिनदर्शिकेवर लक्ष गेले आणि ते म्हणाले, अरे काल तर द्वादशी होती म्हणजे आपली सगळीच पितरं जेवली.
प्रतिक्रिया
तब्बल ३४ लोकांची बाळंतीणी,
वाचता वाचता डोळे भरुन आले.
त्या नंतरही
उत्तम !
+१
ग्रेट अनुभव!
वाह...
किती छान.
खूप छान ...घर मोठ्ठ आहे ..
कधीही या.
अरेरे!!
बरं बरं
कामाला ना नाही ...बोलवा तर खर
एक काम करा, पेठकर काकूंना
गल्ली चुकली काय?
शहाणपणा.
खरंच उत्तम काम केलेत !
मस्त...
+१...असेच म्हणतो.
हे खरं धर्मकृत्य!
+१
वाह!!!
हा खरा धर्म पाळलात भिंगरीताई!
फार उत्कृष्ट काम केलेत..
फार उत्कृष्ट काम केलेत..
खुपच छान काम केलेत. माणुसकीचा
क्या बात है...
खुपच छान काम केलेत. माणुसकीचा
ह्म्म !!
मस्त एकदम!!! फारच छान काम
खूपच छान. परंपरा नुसत्याच
य्य बात!
सुरेखच
मस्तच
@अरे काल तर द्वादशी होती
ग्रेट काम केलेत.
चला आत्म्यानेही मान्य केल...
माझे एव्हडे कौतुक नको मिपाकरांनो
आवडेश. _/\_
साष्टांग नमस्कार भिंगरीताई
छान
सम्द्यांचे प्रतिसाद वाचून
सर्वपित्रीला
भिंगरीताई यांना सलाम !!!
भिंगरीताईंना सलाम! वअरे काल
लै भारी
वरिल सर्व प्रतिसादाला आपला +१
छानच भिंगरि ताई..