✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जेवणाची चव

क
कहर यांनी
Wed, 09/17/2014 - 09:04  ·  लेख
लेख
लहानपणी आईसोबत बाजारात जायला मला कधीच आवडले नाही पण ती आवर्जून मला घेऊन जायची. रविवार आणि गुरुवार असे दोनच दिवस बाजार भरायचा. पण या दोन तीन दिवसाचा बाजार खरेदी करतानाही आईला तास का लागायचा मला त्यावेळी कधीच समजले नाही. ती आधी सगळीकडील भाजी पहात, भाव विचारीत पूर्ण शेवटपर्यंत जायची आणि परत येताना खरेदी चालू करायची. अगदी चार दोन रुपयांसाठी पण मोलभाव करायची. ढिगामधील एखादी गवारी भेंडी मोडून, काकडी दुधीमधे नख खुपसुन त्याचा कोवळेपणा तपासायची. भुईमुगाच्या किंवा वाटाण्याच्या शेंगा फोडून खाउन मगच घ्यायची. फळेच काय पण अगदी बटाटे आणि टोमाटोसुद्धा स्वतः एकेक निवडून घ्यायची. आणि वरती त्या भाजी किंवा फळविक्याला "अहो मावशी अहो मामा" म्हणत वर एक्स्ट्रा भाजी किंवा फळ घ्यायची. मला हे सारे त्यावेळी कसेतरीच वाटायचे. काल येताना अशीच एक थोडीशी वेगळ्या रूपातील आई मला पाहायला भेटली. आई म्हणतोय कारण एक चिमुरडी तिच्या आजूबाजूला फिरत होती. घट्ट जीन्स, वर सैल टीशर्ट अशा रूपात ती एका भैय्याच्या हातगाड्यावरून भाजी खरेदी करत होती. एका हाताने मोबाईल कानाशी धरून बोलणे चालू होते आणि ड्रेसला शोभेल अशा नेलपोलीश लावलेल्या, मोठे नख असलेल्या तर्जनीने, भाजीकडे न पहाताच आणि बहुधा चुकून भाजीला स्पर्श झाला तर शॉक बसेल कि काय अशा समजाने अर्ध्या फुटाचे अंतर ठेऊन ती भैय्याला म्हणत होती "आधा किलो टमाटर, आधा किलो कांदा, पाव किलो मटार ,एक गोभी …. और पाच कि मिरची देना" बस संपला बाजार.. हल्ली रासायनिक खतांमुळे भाजीचा कस तर उतरलाच आहे पण जेवणाची चव हि का उतरली आहे याचे उत्तर मिळाले bazar
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
53778 वाचन

💬 प्रतिसाद (172)

प्रतिक्रिया

जीन्स घातली होती का? नायतर

आदूबाळ
Wed, 09/17/2014 - 20:38 नवीन
जीन्स घातली होती का? नायतर फाऊल आहे. नुस्ती म्यानिक्यूर्ड नखं असून काय उपेग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

१००!

शिद
Wed, 09/17/2014 - 16:52 नवीन
काही नाही सेंचूरी नोंदवायला आलेलो. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments

ही बघा भाजी आनाला चाल्ली

इरसाल
Wed, 09/17/2014 - 17:05 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

टवाळ कार्टा
Sun, 09/21/2014 - 13:44 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

सैल टीशर्ट अशा रूपात ती एका

शिद
Wed, 09/17/2014 - 17:59 नवीन
सैल टीशर्ट अशा रूपात ती एका भैय्याच्या हातगाड्यावरून भाजी खरेदी करत होती
सैल टि-शर्ट घालून हातगाड्यांवरच भाजी घेवू शकता येते...तुम्ही दाखवलेल्या फोटोतल्या बाजारात नाही. ;) बाकी नक्की जळजळ कश्याबद्दल आहे? १) घट्ट जिन्स घालण्याबद्दल? २) सैल टि-शर्ट घालण्याबद्दल? ३) हातगाडीवरुन भाजी विकत घेण्याबद्दल? ४) भैय्याकडून भाजी विकत घेण्याबद्दल? ५) मोबाईल कानाशी धरून बोलता बोलता भाजी विकत घेण्याबद्दल? ६) ड्रेसला शोभेल अशी नेलपोलीश लावली होती म्हणून? ७) तर्जनीचे नख मोठे वाढवल्यामूळे व ते नख भाजीत न खुपसल्यामूळे? इ. इ. आणखी काही कारणं असतील तर तसं कळू देत.
  • Log in or register to post comments

बाय्कान्नी डोक्टर कड़े असे कपड़े घालून जायचे नाही

काउबॉय
Wed, 09/17/2014 - 18:04 नवीन
भाजीखरेदीला असे कपड़े घालून जायचे नाही मग त्यांनी नेमके करावे तरी काय ?
  • Log in or register to post comments

हैला! आजकाल टैट कपडे, क्लिवेज

रेवती
Wed, 09/17/2014 - 18:30 नवीन
हैला! आजकाल टैट कपडे, क्लिवेज यांची आणि दिपिकाची चर्चा का चालूए? काय कामं नैत का लोकांना? बरेचदा आपल्यापर्यंत खरी माहिती येत नाही मग कशाला टैम वेस्टायचा? च्यामारी! घालू द्या की कोणाला काय घालायचय ते! शेवटी बाईनं घरी भाजी पोळी केली ना? मग झालं तर! किती ते लक्ष लोकाकडे! आपण भारतीय लोक्स आपल्या कामाच्या लीस्टपेक्शा दुसर्‍याकडे जास्त लक्ष देतो का?
  • Log in or register to post comments

हैला! आजकाल टैट कपडे, क्लिवेज

मदनबाण
गुरुवार, 09/18/2014 - 15:02 नवीन
हैला! आजकाल टैट कपडे, क्लिवेज यांची आणि दिपिकाची चर्चा का चालूए? चर्चा होणारच आज्जे... ;) कारण 'दीपिकानं जे दाखवलं तेच तर दिसलं'

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- हिंदी-चिनी.. नेमके काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हम्म...आजकाल तू लैच फेमस हून

रेवती
गुरुवार, 09/18/2014 - 18:04 नवीन
हम्म...आजकाल तू लैच फेमस हून र्‍हायलायस. घालू दे की तिला जे घालायचय ते! बहुतेक मला माझ्या आजूबाजूला असे प्रकार बघून सवय झालीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

शॅरोन स्टोनचा

ऋतुराज चित्रे
Sat, 09/20/2014 - 12:41 नवीन
शॅरोन स्टोनचा 'तो सीन आठवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

वा: दिवस सार्थकी लागला.

मराठे
Wed, 09/17/2014 - 20:21 नवीन
वा: दिवस सार्थकी लागला.
  • Log in or register to post comments

एक आईवरील कविता आवश्य एकदा

पैठणकर
Wed, 09/17/2014 - 23:55 नवीन
एक आईवरील कविता आवश्य एकदा तरी ऐकावी अशी - http://www.youtube.com/watch?v=vXdolSi0DMY
  • Log in or register to post comments

भाजी शिळी झाली वादावादीमध्ये.

प्यारे१
गुरुवार, 09/18/2014 - 13:28 नवीन
भाजी शिळी झाली वादावादीमध्ये.
  • Log in or register to post comments

भेंडी शुद्धीवर येण्याचा जोक

गवि
गुरुवार, 09/18/2014 - 14:03 नवीन
भेंडी शुद्धीवर येण्याचा जोक आठवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

सांगा की.

कवितानागेश
गुरुवार, 09/18/2014 - 16:36 नवीन
सांगा की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

बाकी तो फोटो आटपाडी

प्यारे१
गुरुवार, 09/18/2014 - 19:05 नवीन
बाकी तो फोटो आटपाडी तालुक्यातल्या एखाद्या आठवडी बाजारातला असावा. (गेलाबाजार डखांबे बुद्रुक, शिरगाव किंवा हुमगाव पण चालेल) जिथं सैल टीशर्ट आणि घट्ट जीन्स अजूनही बहुधा दुकानातल्या पुतळ्यालाच घातली जात असावी.
  • Log in or register to post comments

वा मस्त...

मुक्त विहारि
Fri, 09/19/2014 - 00:16 नवीन
प्रतिसाद एका पेक्षा एक....
  • Log in or register to post comments

नौवारी घालुन केलेलं आणि

आनन्दिता
Fri, 09/19/2014 - 00:25 नवीन
नौवारी घालुन केलेलं आणि सहावारी घालुन केलेलं. असं ही वेरिएशन जेवण्याच्या चवीत आणता येतं हे ज्ञान आज मिळालं. "ती हिंगाची जादा चिमुट" असला धागा वाचल्याचं स्मरतंय.. तो शोधुन त्यावर प्रतिसाद टंकावा का बरें.. ??? :) :)
  • Log in or register to post comments

अय्या आनन्दिता होत काग अस

इशा१२३
Sat, 09/20/2014 - 10:34 नवीन
अय्या आनन्दिता होत काग अस?माझ्याकडे भा़जी आणायला मीच जाते आणि पंजाबी ड्रेस(सलवार कमीज काहिहि म्हणा)घालून जाते.नउवारि नाहि अन जिन्सहि नाहि.पण भाज्यांना काहि पंजाबी चव येत नाहि.यायला हवी पंजाबी ड्रेस घातल्यावर हो कि नै... :tongue:
  • Log in or register to post comments

हो ..

आनन्दिता
Sun, 09/21/2014 - 00:37 नवीन
हो .. इतके जुजा मिपाकर छातीठोक पणे सांगतायत म्हणजे ते तस्स्सच असणार भौतेक! "तुमच्या कपड्याला चव आहे बरं का" असा नवा वाक्यप्रचार मराठीत आणण्याचा ठराव मांडण्यासाठी मिपाकर लौकरच ' बसणार ' आहेत. :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इशा१२३

घालुन कि नेसुन

रवीराज
Sun, 09/21/2014 - 12:19 नवीन
नौवारी घालुन केलेलं आणि सहावारी घालुन केलेलं.
वाचुन अंमळ मजा वाटलेी, म्हणजे स्वयंपाकात मसाल्याप्रमाणे हेपण टाकतात का ?
  • Log in or register to post comments

तीन वर्षांपूर्वी

कहर
गुरुवार, 07/19/2018 - 14:39 नवीन
तीन वर्षांपूर्वी
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा