कोकणातली भुतं
लेखनप्रकार
कोकण, या नावात भरपूर काही साठवलय. त्या महासागरांच्या पोटात ज्या गोष्टी दडल्यात ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त गोष्टी आमच्या कोंकणात आणि इथल्या माणसांमध्ये दडल्यात. आता कोकण म्हणजे नदी नाले डोंगर दऱ्या हे सगळं आलंच पण या सगळ्याबरोबर एक इनबिल्ट गोष्टंसुद्धा येते ती म्हणजे कोकणातली भूतं. लहानपण गेलं ते यांच्या गोष्टी ऐकण्यातच आणि अनुभवण्यातपण त्यातलेच काही मोजके गमतीदार किस्से खाली दिलेत.
रात्रीची वेळ होती आणि अचानक वीज गेली. आता कोकणात पाऊस कधी पडेल आणि वीज कधी जाईल याचा काही भरवसा नसतो. तर उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे लगेचच घामाच्या धारा लागल्या. इथे वर्षाचे १२ महिने धाराच असतात घामाच्या नाहीतर पावसाच्या. आमचा पप्या उकडतंय म्हणून बाहेर आला इतक्यात, अचानक समोरच्या सुध्याच्या घराच्या छतावर काहीतरी दिसलं. एकतर रात्र त्याच्या जोडीला वीज न्हवती त्यामुळे ते अंधुक दिसत होतं. वेगळीच आकृती होती कोणीतरी माणूस बसल्यासारखं वाटत होतं पण काय आहे हे कळायला नक्की मार्ग न्हवता. बस्स, माणसाना विषय भेटला. लाईट गेल्यामुळे करण्यासारखंसुद्धा काही नव्हतं. माणसं आपापल्या-परीने अकलेचे तारे तोडू लागले. कोणी म्हटलं हा भानामातीचा प्रकार आहे. कोणी म्हटलं कोणीतरी करणी केली, तर कोणी रेकी. सगळ्या गूढ विद्या होत्या नव्हत्या त्या सगळ्यांची नावं त्या ५ मिनिटांमध्ये माझ्या कानावरून गेली. एकाने तर कहर केला त्याच्या मते सर्वपित्री नुकतीच होऊन गेलीय आणि आणि घरावर जे सूप ठेवतात त्यामध्ये सुध्याच्या बापाचा आवडता मेनू चहा बटर नव्ह्ता. त्यामुळे तो सुध्याचा बापच आहे त्याला चहा बटर द्या मग तो निघून जाईल. दोन दिवसांपूर्वी सुध्याच्या बापाला घराच्या अंगणात काठी घेऊन बसलेला पाहिला अशी दुसऱ्याने री ओढली. एव्हाना बर्यापैकी गर्दी जमली होती आणि उलट सुलट चर्चा सुरु होत्या, इतक्यात दामू वायरमन समोरून आला. उत्सुकता म्हणून तो पण गर्दीत सामील झाला. आणि जसा त्याला विषय समजला तसा तो एकेकाला लाखोली वाहायला लागला. पलीकडच्या घरी पूजा होती आणि ज्याला माणसं सुध्याचा बाप समजत होती ते दोन स्पीकर होते जे दामू वायरमनने सुध्याच्या घराच्या छपरावर लावले होते. एक दोन मिनिट स्मशान शांतता आणि नंतर जो तो जोर जोरात हसू लागला. या सगळ्या गोंधळात पप्याने कधीच पोबारा केला होता.
गणपतीचे दिवस होते आणि हे दिवस म्हणजे रात्र आणि दिवस सारखेच. माणसं रात्रभर जागी असतात आणि वेगवेगळे विषय सुरु असतात. असाच एका रात्री स्मशानातल्या भूतांचा विषय निघाला आणि पैज लागली. स्मशानात जायचं आणि तिथल्या शंकराच्या देवळात एक लहान पणती आहे ती घेऊन यायची. राजाने विडा उचलला. समशान एक दीड किलोमीटर अंतरावर होतं आणि तो रस्ता आमच्या बाळू काकाच्या घरासमोरून जात होता. राजा निघाला, खूप धीट माणूस आणि त्यापेक्षाही धीट आमचा बाळू काका. बाळूकाकाने नेमका त्याला स्मशानात जाताना पाहिला. राजा गेला आणि त्याने ती पणती आणली, आणि गणपती जवळच्या माणसाना दाखवली. आता ज्याने पैज लावली होती त्याचे पाचावर धारण बसली. खात्री करण्यासाठी त्याने ४-५ माणसं बरोबर घेतली आणि स्मशानाकडे निघाला. बाळू काकापण त्याचीच वाट पाहत होता. त्याने घोंगडी घेतली आणि या सगळ्यांच्या अगोदर स्मशानात जाऊन दबा धरून बसला. हे चार पाच जण स्मशानात पोहचले आणि नेमका त्याच वेळी विचित्र आवाज काढत बाळू काका घोंगडी अंगावर घेऊन त्यांच्या पुढ्यात. सगळ्यांची फे फे उडाली, पायातल्या चपला तिथेच टाकून जो तो वाट मिळेल तिकडे धूम पळत सुटला. हे चार जण पुढे बाळू काका त्यांच्या एकटा त्यांच्या पाठीवर. प्रत्येकाला मंदिर गाठायची घाई होती. शेवटी कसेबसे मंदिराजवळ पोहचले. पाठीमागून बाळू काका आलाच. खरा प्रसंग समजल्यावर प्रत्येकाची हसून हसून मुरकुंडी वळली होती.
जुनी गोष्ट आहे नुकतीच दोन चाकी गाडी गावात नवीन घेतली होती एकाने. त्याला कंपनीत रात्रपाळी असायची. तसा तो भित्राच होता. त्यात गावातली माणसं फुकटचे सल्ले देण्यात एक्स्पर्ट. त्याला लोकांनी सांगितलं होतं ‘बाबा रे रात्रीचा अमुक अमुक ठिकाणावरून एकटा जातोस सांभाळून येत जात रहा. तो परिसर झपाटलेला आहे. रात्री एखादी पांढरी साडी नेसलेली बाई दिसली किंवा संशयास्पद काही आढळलं तर सरळ त्यावरून गाडी न्यायची आपल्याला काही होत नाही’. ही गोष्ट त्याला पटली होती. असाच एका रात्री बिचारा कंपनीत जायला निघाला, आणि समोर नेमकी एक म्हैस आली. याची भंभेरी उडाली. याला तो कान मंत्र आठवला अंगावरून गाडी न्यायचा. बस्स भाईने गाडी फुल गिअर मध्ये टाकली आणि सुसाट वेगामध्ये त्या जखिणरुपी म्हशीच्या अंगावर घातली. कशात काय आणि फाटक्यात पाय. ती खरोखर म्हैस होती. तो बिचारा दगडू म्हशीला शोधून शोधून दमला होतां आणि याने भूत समजून गाडी अंगावर घातली. साहेबांची स्वारी बरेच दिवस हात पाय गळ्यात अडकवून दवाखान्यात होती. आता दुसऱ्यादिवशी दुचाकीच्या चालकाचा बावळटपणा तिखट मीठ लाऊन सांगीतला जात होतां, आणि यामध्ये ते सल्ले देणारे पण सामील होते हे नवीन सांगायला नकोच.
वाचने
7687
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
मस्त किस्से...
मस्त !! अजुन येवुद्यात !!
कोक्नाचा आन भुतावलीचा लय घरोबा हा....
सुध्याच्या बापाचा प्रतिसाद ..
In reply to सुध्याच्या बापाचा प्रतिसाद .. by विटेकर
हाहाहा
हाहाहाहा!
In reply to हाहाहाहा! by वेल्लाभट
हाहाहा, ऐकलंय. रत्नांग्रीस
हे बाकी खरे आहे ..
येशू ख्रिस्तासारखे हात आडव्या पट्ट्यात फिरवतएकदा पट्ट्यात आलं की गळ्यात क्रॉस घालूनच सोडतयं बघा ... अन ते रत्नागिरीत नाय , सगळ्या जगात असच करतयंमस्त किस्से आहेत सगळे. पोतडीत
In reply to मस्त किस्से आहेत सगळे. पोतडीत by शिद
नक्कीच
उन्हाळ्याच्या सुट्टीत रात्री
बायकांचे हावभाव
मस्त !!
ते जयस्तंभावर रात्री किती वाजता येतं भूत?
In reply to ते जयस्तंभावर रात्री किती वाजता येतं भूत? by अनन्न्या
हे राम.. स्तंभावरुनच जा ये
मस्त किस्से !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बोलक्या पोपटांचे राजकारणकोकणातलं भूतबीत नाही, पण एकदा
हाहाहा!
अकरावीत असताना हायर मॅथच्या
In reply to अकरावीत असताना हायर मॅथच्या by डॉ सुहास म्हात्रे
@एकदा तरी खर्या एखाद्या
In reply to @एकदा तरी खर्या एखाद्या by अत्रुप्त आत्मा
(No subject)
तिकडे स्पाच्या कट्ट्यावर