(चुकीच्या विभागात कविता टाकली होती आणि त्यात चुका ही होत्या)
श्रावण सगळा सरला
टिपूस नाही पडला.
बळीराजाच्या अश्रूंनी
धरती जळून गेली.
साकडं घातल इंद्राला
वरुणराजा धावत आला
वादळ फोडून पाऊस बरसला.
गुरं-ढोरं पुरात गेली वाहून
पीक सगलं खलास झालं
बळीराजाच नशीब फुटलं.
वरुण राजा
तू तर देव आकाशाचा
का वागतो लहरी सारखा?
गत जन्मांच्या कर्मांचा
का हिशोब घेतो आता?
झाल्या चुका माफ कर
कृपा कर पामरांवर
साकडं घालतो तुच्या चरणी
पुढच्या वर्षी तरी
पाऊस पाड नेमान.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1421
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
बदल आवश्यक.
सगळी कडे उत्तम पाऊस होत आहे