Skip to main content

वरुण राजाला साकडं

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 02/09/2014 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
(चुकीच्या विभागात कविता टाकली होती आणि त्यात चुका ही होत्या) श्रावण सगळा सरला टिपूस नाही पडला. बळीराजाच्या अश्रूंनी धरती जळून गेली. साकडं घातल इंद्राला वरुणराजा धावत आला वादळ फोडून पाऊस बरसला. गुरं-ढोरं पुरात गेली वाहून पीक सगलं खलास झालं बळीराजाच नशीब फुटलं. वरुण राजा तू तर देव आकाशाचा का वागतो लहरी सारखा? गत जन्मांच्या कर्मांचा का हिशोब घेतो आता? झाल्या चुका माफ कर कृपा कर पामरांवर साकडं घालतो तुच्या चरणी पुढच्या वर्षी तरी पाऊस पाड नेमान.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1421
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

लहरी वरूणराजावर विसंबून न राहता आता, बळीराजाने उत्पन्नाची नवी साधने शोधावित.

सगळी कडे उत्तम पाऊस होत आहे महाराष्टात. अगदी मराठवाड्यात सुद्धा गेल्या आठवड्यात चांगला पाउस झाला. उगाच कशाला वरुणराजाला साकडे घालताय. तसे ही मान्सुन कधी दगा देत नाही. ८०% च्या खाली तर कधीच जात नाही. सगळीकडे उस लावुन पाणी उधळायचे. सरकारनी रोटेशन मधे तालुक्यांवर उस लागवड बंदी च केली पाहीजे. सर्व पाण्याचा प्रॉब्लेम बंद होईल.