घातक स्युडोमार्ग
"बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले?" माय फुट! मी कसाही वागेन नी काहिहि बोलेन! शिवाय माझी पावले कोणी वंदावी अशी माझी इच्छाच कुठाय? आणि असली तरीही हा नियम मी का म्हणून मानावा? आणि तसंही मी अगदी बोलल्याप्रमाणे वागल्यावरही माझी पावले वंदतीलच लोकं याचीही खात्री नाहिच्चे!
=========
"साला स्युडोलिबरल" त्याने आणखी एक शिवी हासडली. हा स्युडो शब्द इतका व्हेग आहे की त्याच्याशी संग केल्यावर होणारी प्रसुती ही कोणालाही कोणत्याही पातळीवर नेऊ शकते. स्युडोलिबरल, स्युडोसेक्युलर, स्युडोयंव नी स्युडोत्यंव! महात्मा गांधींपासून ते डॉ आंबेडकरांपर्यंत आणि पंडीत नेहरूंपासून ते मनमोहनसिंगांपर्यंत कोणालाही काहीही विचार न करता क्षणात झाडून टाकायला हे "स्युडो" हत्यार मंडळींच्या हातात आलं आहे. विचाराचा प्रतिकार करू न शकणारी लोकं मग व्यक्तीच्या वागण्यावर घसरतात आणि मग त्याचं वागणं तसं नव्हतं ना? त्याचं वागणं असं होतं ना? मग काय बाता करता?
अरेच्या! त्याचे विचार चुक आहेत की नाहीत ते बोला! हवं तर त्या माणसाला दुटप्पी म्हणा दुतोंडी म्हणा पण तरीही तो विचारांचा प्रतिवाद नाहिच्चे! त्या व्यक्तीच्या विचारांचा प्रतिवाद हा विचारांनी करण्याची धमक नसलेले विचारषंढ लोक मग त्या व्यक्तीलाच झाडून टाकायला हा 'स्युडोमार्ग' अवलंबतात. व्यक्तीलाच झाडून टाकलं की विचारांचा प्रश्नच येत नाही, ना रहेगा बांस...
माझ्यामते कोणताही समाज पुढे यायला - बदलत रहायला - परंपरा नावाच्या चिखलाला दूर सारू शकणारी पुरोगामी मंडळी अत्यावश्यक असतात. पुरोगाम्यांचे (मग ते वैयक्तिक जीवनात तसे वागु शकत असोत वा नसोत ते इथे गैरलागू आहे) किंबहुना पुरोगामी विचारांचे कोणत्याही प्रगती इच्छिणार्या समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण त्या त्याच व्यक्ती असतात ज्या परंपरेने चालत आहे, संस्कारांमुळे गरजेचे आहे असल्या भुलथापांच्या पलिकडे जाऊन तर्काला, बुद्धीला जे पटेल त्यावर आपले मत बनवतात. प्रत्येकवेळी परिस्थितीमुळे, काही भावनिक कारणांमुळे कधी कायद्याच्या भितीमुळे किंवा कधी कायदा मोडायची प्रत्यक्ष धमक नसल्याने असेल ते तसे वागु शकतीलच असे नाही, पण त्यांनी दिलेला विचार हा समाजाला पुढेच घेऊन जात असतो. पुरोगाम्यांचा आवाज दाबल्यावर, त्या व्यक्तींना आउटराईट रिजेक्ट केल्यावर भुतकाळात अडकलेल्या रादर रुतलेल्या आणि लोकांच्या निव्वळ अस्मितांना चुचकारत नेतृत्त्व करू पाहणार्या परंपरावाद्यांच्या हातात नेतृत्त्व गेलं की देशाचा, समाजाचा फक्त पाकिस्तान होऊ शकतो इतके लक्षात घेतले तरी पुरेसे आहे.
पुरोगामी, लिबरल म्हणजे काही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही किंवा विशिष्ट काळाचीही नाही. एखादी गोष्ट निव्वळ चालत आली आहे, किंवा "हे करून कुणाचं वैट झालंय का?" किंवा "आमच्या पिढ्यान पिढ्या असं वागत आल्या आहेत" किंवा "आपल्या धर्मात, जातीत, 'लोकांत' हे असंच चालतं" असली कारणं आपली मते बनवायला पुरेशी न वाटणार्या कोणत्याही व्यक्तीला मी पुरोगामी म्हणेन. पुरोगामी किंवा अभिजन वर्ग हा मुठभर उच्चजातीतील किंवा उच्चभ्रुंचा अट्टाहास आहे किंवा त्यांची नाटकं आहेत, हि प्रतिमा उभी करणे हा मला देशद्रोह वाटतो. या अभिजन वर्गाचे अस्तित्त्वच नसेल तर समाज पुढे जाईलच कसा?
समाजाला साचु न देता सतत पुढे खेचत रहायचे अतिशय महत्त्वाचे कार्य हा अभिजन वर्ग करत असतो. आजवर त्यांच्या कृतीवर असंख्यवेळा टिका झाली आहे. होत असते. आणि ती होणारच कारण ते "स्टेटस कूओ" भेदत असतात त्याला विरोध हा अध्याहृत असतो. मात्र भारतात आजवर सुदैवाने हा विरोध विचारांना व कृतीला झाला आहे. त्या व्यक्तीला मात्र समाजात आदरच मिळत आला आहे. ज्योतिबांसारख्या व्यक्तीला मोठा विरोध झाला पण तो त्यांच्या कार्याला व विचारांना झाला. त्यांना अडवण्यात आले, त्यासाठी अनेक गोष्टी केल्या गेल्या पण समाजाने ज्योतिबांना शेवटी गौरवलेच. त्यांना आउटराईट रिजेक्ट केले नाही. त्यांना होणारा विरोध हा त्यांना "ग्राह्य" ठरवल्यानंतरची स्टेज आहे. आता लगेच प्रतिवाद येईल की ज्योतिबांना आदर दिला गेला नाही तो त्यांनी त्यांच्या कृतीतून मिळवला आहे. अर्थातच! तुमच्या बोलण्याला यशस्वी कृतीची जोड असेल तर त्याचा परिणाम अधिक होतो हे मान्यच आहे! पण म्हणून तुलनेने कमी कृती करू शकणार्या / इच्छिणार्या किंवा वेगळ्या प्रकारे/माध्यमांतून समाजप्रबोधन घडवू पाहणार्या आगरकर व/वा गोखल्यांसारख्यांच्या विचारांचे महत्त्व अजिबात कमी होत नाही.
कोणत्याही समाजाला नवे विचार, नवी दिशा हवी असेल, समाज प्रवाही हवा असेल तर चाकोरी मोडणार्या नव्या विचारांची समाजाला आत्यंतिक गरज असते. स्युडो लिबरल, स्युडोसेक्युलर, विचारजंत, हस्तीदंती मनोर्यातील मूर्ख अश्या शब्दांनी हल्ली अनेकदा व्यक्तीला दूर केले जाते. त्यांचे काही विचार कित्येकदा पूर्णपणे चुकीचेही असतील पण ते त्यांना मांडु देण्यासाठी पोषक वातावरण ठेवणे ही आपली जबाबदारीच नाही तर अत्यावश्यक कर्तव्य आहे. आततायी वाटणार्या विचारांकडे दुर्लक्ष करा किंवा त्यांचा प्रतिवाद करा मात्र त्या व्यक्तीला रिजेक्ट करून, कायमचे अग्राह्य ठरवून त्याच्याकडून येणार्या/येऊ शकणार्या किंवा आधीच आलेल्या इतर विषयांवरच्या संभाव्य महत्त्वाच्या विचारांनाही तुम्ही घाऊकपणे दूर लोटता आहात. बदलत्या आर्थिक परिस्थितीने आणलेल्या वेगाबरोरच भारतात हा होऊ घातलेला नवा बदल आता सामान्य लोकांमध्ये खूप वेगात रूजतो आहे याची खंत अतिशय बोचरी आहे.
या मुक्तचिंतनावरही येणार्या प्रतिसादांची पूर्ण कल्पना आहे. त्यावर मी प्रतिवाद करेनच, प्रतिसाद देईनच असे नाही. मात्र त्यात येणार्या विचारांवर पूर्ण व आदरपूर्वक विचार करेन इतके मात्र नक्की! बरेच दिवस साचले होते, एकहाती, एकटाकी टंकले आहे. प्रमाणलेखनदोष पदरात घ्याल अशी आशा!
याद्या
13255
प्रतिक्रिया
89
मिसळपाव
प्रतिक्रिया
..वाचतेय,
आभार!
In reply to ..वाचतेय, by कवितानागेश
तर्काच्या कसोटीवर मतांना
In reply to आभार! by ऋषिकेश
मुळात तुम्ही स्यूडोमिपाकर
हम्म
ही परिस्थिती या लोकांच्या
In reply to हम्म by पैसा
'कर्तृत्त्व' या गुणाला इथे
In reply to हम्म by पैसा
लक्षात घे
In reply to 'कर्तृत्त्व' या गुणाला इथे by ऋषिकेश
टिंगल करू नये व त्यांचे मत
In reply to लक्षात घे by पैसा
बरं
In reply to टिंगल करू नये व त्यांचे मत by ऋषिकेश
थोडा फरक आहे. माणूस किती खरा
In reply to टिंगल करू नये व त्यांचे मत by ऋषिकेश
पण एखाद्या माण्साची एखाद्या
In reply to थोडा फरक आहे. माणूस किती खरा by आनन्दा
माझी व्याख्या सरळ आहे. जो
In reply to पण एखाद्या माण्साची एखाद्या by कवितानागेश
याच न्यायाने मी दिग्गीराजांचे
In reply to माझी व्याख्या सरळ आहे. जो by आनन्दा
आनंदराव, हे जरूर पहा
In reply to याच न्यायाने मी दिग्गीराजांचे by आनन्दा
वॉव !
In reply to याच न्यायाने मी दिग्गीराजांचे by आनन्दा
तो माणूस स्वतःशी प्रामाणिक आहे??? !!!हो. म्हणजे मी ज्या न्यायाने
In reply to वॉव ! by डॉ सुहास म्हात्रे
दैवायत्तं कुले जन्म म्हणणार्
In reply to हो. म्हणजे मी ज्या न्यायाने by आनन्दा
"प्रामाणिकपणे अप्रामाणिक
In reply to हो. म्हणजे मी ज्या न्यायाने by आनन्दा
निव्वळ एखादा योग्य, विधायक
In reply to 'कर्तृत्त्व' या गुणाला इथे by ऋषिकेश
सहमत
In reply to निव्वळ एखादा योग्य, विधायक by बॅटमॅन
विचाराने पुरोगामी असलेला
In reply to सहमत by पैसा
समाजात बदल घडवू पाहण्याची
In reply to निव्वळ एखादा योग्य, विधायक by बॅटमॅन
ठीके, पण अशी अपेक्षा करणार्
In reply to समाजात बदल घडवू पाहण्याची by बाळ सप्रे
विचारात बदल घडवू
In reply to समाजात बदल घडवू पाहण्याची by बाळ सप्रे
बाकी, तर्कावर मत जोखावे इ.इ.
आभार
टैम प्लीज
प्रच्छन्न
संपूर्ण प्रतिसादात खंडन
In reply to प्रच्छन्न by विकास
लेख पटला नाही
तेव्हा सांगायचा मुद्दा हा की
In reply to लेख पटला नाही by क्लिंटन
लिबरल लोकांना नक्की गुस्सा
who cares !!
अरे दुसरा आणी तिसरा पॅरा '
लेखाचा आशयाशी सहमत
लेख काहि पटला नाहि.
व्यक्ति विषेश स्युडो असेल तर
स्युडो, पुरोगामी व प्रतिगामी
प्रतिसादकांचे आभार. वेळ
पुन्हा एकदा
In reply to प्रतिसादकांचे आभार. वेळ by ऋषिकेश
सहमती!
In reply to पुन्हा एकदा by पैसा
त्या व्यक्तीच्या वागण्यात
In reply to सहमती! by ऋषिकेश
(जसे वरती क्लिंटन यांनी
In reply to प्रतिसादकांचे आभार. वेळ by ऋषिकेश
मत मांडण्याचे धैर्य आणि इच्छा
In reply to प्रतिसादकांचे आभार. वेळ by ऋषिकेश
अरुंधती रॉय
In reply to प्रतिसादकांचे आभार. वेळ by ऋषिकेश
त्या व्यक्तीच्या विचारांचा
अजून एक राहिले
प्रत्येक विचाराला कृतीची जोड
In reply to अजून एक राहिले by ऋषिकेश
इथे एक गोष्ट जाणवली ती म्हणजे
तुमच्या 'विचारांना विरोध
In reply to इथे एक गोष्ट जाणवली ती म्हणजे by अन्या दातार
अन्याच्या प्रतिसादातील
In reply to तुमच्या 'विचारांना विरोध by ऋषिकेश
त्याचे उत्तर वेगळे दिलेले
In reply to अन्याच्या प्रतिसादातील by बॅटमॅन
म्हणजे आचारविचारांत जराही
In reply to त्याचे उत्तर वेगळे दिलेले by ऋषिकेश
येनकेनकारणाने कृती करणे विचार
In reply to तुमच्या 'विचारांना विरोध by ऋषिकेश
सहमत आहे!
In reply to येनकेनकारणाने कृती करणे विचार by कवितानागेश
या स्वयंघोषित
अं?
In reply to या स्वयंघोषित by बॅटमॅन
मत मांडताच समाजाने आचरण करावे
In reply to अं? by ऋषिकेश
समाजाला त्या मताला राईट ऑफ
In reply to मत मांडताच समाजाने आचरण करावे by बॅटमॅन
असहमत
In reply to समाजाला त्या मताला राईट ऑफ by ऋषिकेश
मतच नव्हे, तर व्यक्तीलाही
In reply to असहमत by बॅटमॅन
बाकी कायपण चालतं तर या
In reply to मतच नव्हे, तर व्यक्तीलाही by ऋषिकेश
व्यक्तीला राईट ऑफ
In reply to मतच नव्हे, तर व्यक्तीलाही by ऋषिकेश
पण तथाकथित नवीन विचार
In reply to अं? by ऋषिकेश
लिबरलांपुढे वाचली गीता, कालचा
In reply to पण तथाकथित नवीन विचार by कवितानागेश
असा निराश होउ नकोस ब्याट्या..
In reply to लिबरलांपुढे वाचली गीता, कालचा by बॅटमॅन
ओक्के मौतै..तुम्ही म्हणता
In reply to असा निराश होउ नकोस ब्याट्या.. by कवितानागेश
सहमत आहे.
In reply to पण तथाकथित नवीन विचार by कवितानागेश
व्यक्ती, व्यक्तीमत्व,
लै प्रगल्भ होत चाललाय हा
In reply to व्यक्ती, व्यक्तीमत्व, by प्यारे१
हितकरच. सोयीस्कर स्वीकारुन
In reply to लै प्रगल्भ होत चाललाय हा by कवितानागेश
कुणीतरी मराठीत सारांश लिहा रे
लेख सारांशानंच आलेला आहे.
In reply to कुणीतरी मराठीत सारांश लिहा रे by धन्या
सुरुवात अशी आहे,
In reply to कुणीतरी मराठीत सारांश लिहा रे by धन्या
आणि विचार मांडण्याशिवाय दुसरं
आणखी थोडं
In reply to आणि विचार मांडण्याशिवाय दुसरं by कवितानागेश
माझीही भर...
In reply to आणखी थोडं by पैसा
विचारांचा अभाव म्हणजे अंतिम
In reply to आणखी थोडं by पैसा
खालील संवाद वाचुन मला मी
ज्यांचे लोक ऐकतात, ज्यांना
ओके.. कृतीला बाजूला ठेऊन फक्त
बदल...
सारांशात्मक प्रतिसाद आवडला.
In reply to बदल... by डॉ सुहास म्हात्रे
मूळ प्रश्न असा आहे
परिवर्तनाची गरज कोणाला वाटते?
In reply to मूळ प्रश्न असा आहे by अवतार
अर्थातच !
In reply to परिवर्तनाची गरज कोणाला वाटते? by कवितानागेश
बाब्बौ!
चून चून के मारूंगा
In reply to बाब्बौ! by होकाका