घातक स्युडोमार्ग
In reply to ..वाचतेय, by कवितानागेश
In reply to आभार! by ऋषिकेश
तर्काच्या कसोटीवर मतांना जोखावे. ते कोणी मांडले आहे ते गौण!बेवड्यांनी दारूबंदीवर (मद्यप्रेमी लोक्स तूर्तास माफ करा, नंतर सवडीने भांडूच) , हिटलरने अहिंसेवर, अल कायदाने दहशतवादविरोधावर, इ. प्रवचन केले तर ते ऐकायला कुणी जावे हा ज्याचात्याचा प्रश्न. पण आपल्या विचारांची, त्यांच्या प्रसाराची समाजाला गरज आहे इ. म्हणायचे असेल तर आचारविचारांतली थोडी तरी सुसंगती असणे गरजेचे वाटते. नपेक्षा त्या व्यक्ती आणि ते विचार दोघेही तेल लावत जातील. हां आता माझे असे असे विचार आहेत, समाजाला त्याची गरज आहे की नाही त्याने मला वट्ट फरक पडत नाही असा स्टान्स असेल तर मग चालूदे. मग दारुड्यांच्या झिंगत केलेल्या दारूबंदीवरच्या प्रवचनाला मीही हजेरी लावतो आणि त्यांना चखणाही सप्लाय करतो. पण जर लिबरल विचार समाजासाठी गरजेचे आहेत आणि त्यांचा प्रसार करणे अवश्य आहे तर मग आचाराचे थोडेही उत्तरदायित्व स्वीकारायला लोकांना अडचण काय असते हे समजत नाही. (आणि हो, ते एक वाक्य सोडलं तर अख्खा लेख 'तुम्ही आमच्या आचरणावर बोट ठेवता' या अॅक्यूझेशननेच भरलेला आहे.)
In reply to हम्म by पैसा
ही परिस्थिती या लोकांच्या वागण्यामुळेच आली आहे असं नाही वाटत तुला?ते आत्मपरीक्षण का काय ते करणं लिबरल लोकांना मानवत नाही असं ऐकून आहे. अपचन होतं म्हणे त्यानं!
In reply to हम्म by पैसा
आणि अशा बडबडीचा ना या लोकांना फायदा, ना समाजाला.असहमती इथेच आहे. प्रत्येक वेळी मत मांडणार्यावरच त्याच्याशी साजेशी कृती करण्याचे बर्डन टाकता येत नाही. त्याला कित्येक नोन/अननोन कारणाने ती करणे शक्य असेलच असे नाही. पण म्हणून त्यातील विचाराकडे दुर्लक्ष करणे समोरच्या व्यक्तीच्या/समाजाच्याच अहिताचे असु शकते. निव्वळ एखादा योग्य, विधायक विचार व्यक्त करणारी व्यक्ती "कर्ती" नाही म्हणून तिची टिंगलच व्हावी हे नवे विचार येण्यास पोषक वातावरण निर्माण करणारे नसते असे वाटते. नी असे नवे विचार मांडणार्यांना गप्प करणे समाजास घातक आहे. नव्या विचारांबरोबरच तशी कृती कोणी केली तर त्याचा परिणाम अधिक असतो किंवा अधिक जलद असतो वगैरे अमान्य नाही हे लेखात म्हटले आहेच
In reply to 'कर्तृत्त्व' या गुणाला इथे by ऋषिकेश
In reply to लक्षात घे by पैसा
In reply to टिंगल करू नये व त्यांचे मत by ऋषिकेश
In reply to टिंगल करू नये व त्यांचे मत by ऋषिकेश
In reply to थोडा फरक आहे. माणूस किती खरा by आनन्दा
In reply to पण एखाद्या माण्साची एखाद्या by कवितानागेश
In reply to माझी व्याख्या सरळ आहे. जो by आनन्दा
In reply to याच न्यायाने मी दिग्गीराजांचे by आनन्दा
In reply to याच न्यायाने मी दिग्गीराजांचे by आनन्दा
तो माणूस स्वतःशी प्रामाणिक आहे
??? !!!In reply to वॉव ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हो. म्हणजे मी ज्या न्यायाने by आनन्दा
दैवायत्तं कुले जन्म म्हणणार्या कर्णाला आद्य पुरोगामी म्हणावे का?किंवा सत्यकाम जाबाल याच्या आचार्याला. त्याची जात, त्याचा बाप कोण हे माहिती नसतानाही त्याने त्याला ब्राह्मण करून घेतले.
In reply to हो. म्हणजे मी ज्या न्यायाने by आनन्दा
In reply to 'कर्तृत्त्व' या गुणाला इथे by ऋषिकेश
निव्वळ एखादा योग्य, विधायक विचार व्यक्त करणारी व्यक्ती "कर्ती" नाही म्हणून तिची टिंगलच व्हावी हे नवे विचार येण्यास पोषक वातावरण निर्माण करणारे नसते असे वाटते. नी असे नवे विचार मांडणार्यांना गप्प करणे समाजास घातक आहे.विचार हे व्हॅक्यूममध्ये असते तर हे ठीक होतं. समाजात बदल घडवू पाहण्याची इच्छा असलेल्यांकडून कृतीची थोडीसुद्धा अपेक्षा करणं गैर का आहे ते समजत नाही.
In reply to निव्वळ एखादा योग्य, विधायक by बॅटमॅन
In reply to सहमत by पैसा
In reply to निव्वळ एखादा योग्य, विधायक by बॅटमॅन
समाजात बदल घडवू पाहण्याची इच्छा असलेल्यांकडून कृतीची थोडीसुद्धा अपेक्षा करणं गैर का आहे ते समजत नाहीअपेक्षा गैर नव्हे. पण कृतीअभावी कोणाला Write-off करु नये. असा विचार करुन बघा की विचार (Idea generation) ही एक प्रक्रीया आहे. त्याची अंमलबजावणी (execution) ही पुढील प्रक्रीया आहे. एकच मनुष्य सर्वच प्रक्रियांमधे निष्णात नसतो. एखादा उद्योजक स्वतः एखादा विचार करण्यास समर्थ नसेल पण अंमलबजावणी चोख करु शकेल. विचार करणार्याने अंमलबजावणी करण्यात अडथळा येइल असे वर्तन करु नये इतकी अपेक्षा असणारच. बेवड्याच्या दारुबंदीवरील व्याख्यानाच्या उदाहरणावर..
In reply to समाजात बदल घडवू पाहण्याची by बाळ सप्रे
In reply to समाजात बदल घडवू पाहण्याची by बाळ सप्रे
"अलौकिक बुद्धिमत्ता, दीर्घ व सतत व्यासंग, देशहिताची खरी कळकळ, विद्यार्जनाचे व्यसन,अचूक कल्पकपणा हे रानड्यांचे मुख्य गुण होते. तरी पण हे गुण अंगी असलेल्या इतर लोकांहून रानड्यांविषयी विशेष हळहळ वाटण्याचे कारण हे की, त्यांनीच महाराष्ट्रात राष्ट्रकार्याचे वळण लावले आणि सर्व प्रकारच्या अडचणी सोसून देशोतीच्या कार्याकरिता, उत्साहाने हाती भगवा झेंडा घेऊन नेहमी आघाडी सांभाळली. जन-समाजाला शहाणे करून ठेवण्याचा क्रम अखंड चालू ठेवला. समाजाचे गुरूत्व स्वीकारले व पार पाडले. तात्पर्य रानड्यांसारखा पुरुष इंग्रजी राज्य आल्यापासून महाराष्ट्रात झाला नाही व त्याची जागा यापुढेही भरून येणार नाही. या राज्यात जुनी सर्व कर्तृत्व, परंपरा नष्ट होऊन, लोक तेजोहीन, बलहीन, स्वहितपरायण असे झाले व महाराष्ट्र हा एक थंड गोळा होऊन पडला होता, त्या गोळ्यात प्रथम चैतन्य व उष्णता रानड्यांनी उत्पत्ती केली.''याचा अर्थ काय? तर रानड्यांनी ज्या समाजात काम करायचे ठरवले त्यांच्याशी फटकून वागायची भुमिका घेतली नव्हती. पण समाजाला चेतना देण्याचे आणि जागे करण्याचे काम त्यांनी चालूच ठेवले. बदल एकदम घडणार नाहीत हे टिळकही जाणून होते आणि रानडे देखील. त्यांनी आचरणात सातत्य ठेवले पण घाई केली नाही आणि सामान्यांना तुच्छ ठरवले नाही. दुर्दैवाने ती घाई आगरकरांनी केली, पण तो वेगळा विषय आहे. तशी घाई केल्याने ते काही स्युडो ठरले नाहीत. आत्ताच्या काळात जे लिबरल अर्थात "निधर्मी" समाजसुधारक आहेत त्यांच्याबद्दल असे म्हणता येईल का? एखादा दाभोळकरांचा अपवाद सोडावा लागेल. तरी त्यांना देखील अनुभवानेच समजायला लागले असे म्हणावे लागेल. पण त्यासाठी सातत्याने ते काम करत राहीले केवळ तुच्छ वागत राहीले नाहीत. बरं असं आहे का की केवळ सेक्यूलर्स, निधर्मीं, लिबरल्सच्या बाबतीतच टिका होते? फक्त काही संस्थळावर लिहीण्यात सक्रीय असलेल्या माझ्या सारख्या सामान्य व्यक्तीने, स्वतःस हिंदू म्हणवून घेतले आहे, हिंदूत्ववादी म्हणून घेतले आहे, त्यावर इथे आणि इतरत्र अनेकांनी कसले दिवे लावले आहेत (ते देखील स्युडो आयडी तयार करून!) हे सांगायला हवे का? मधे मी मिपावर येऊ शकलो नव्हतो, पण आत्ताच एक "वन नाईट स्टँडवरून" चर्चा बघितली. त्यात देखील त्याला विरोध करणे म्हणजे "आमची संस्कृती" वगैरे टोमणे आलेच आहेत. असे कशाला हा प्रश्न पडतो का? विचारावासा वाटतो का? बाकी भारतात आणि अमेरीकेत लग्नाची गरज काय म्हणणारे पण बघितले आहेत... लग्नाबाबत तुच्छ बोलणारे पाहीले आहेत. गंमत म्हणजे आता अमेरीकेत असेच लिबरल्स हे समलिंगिंना लग्नाचा हक्क मिळावा म्हणून ओरडताना देखील पाहीले आहेत! आता हे स्युडो का रिअल? (मला कोण कुणाशी लग्न करतोय/करतेय याच्याशी काही देणंघेणं नाही. तो व्यक्तीगत प्रश्न आहे आणि सर्वांना सर्व हक्क असायला हवेत असेच माझे स्वतःस लिबरल न म्हणता मत आहे!) थोडक्यात - समाजसुधारणेची गरज प्रत्येक काळातच असते. आणि तशी सुधारणा कालानुरूप होणे देखील महत्वाचे असते. पण तशी सुधारणा सुचवणारे नक्की कशी घडवू इच्छितात यावर बरेच काही अवलंबून असते.
In reply to प्रच्छन्न by विकास
पण तशी सुधारणा सुचवणारे नक्की कशी घडवू इच्छितात यावर बरेच काही अवलंबून असतेसुधारणा सुचवणार्यांवर ती घडवण्याचे उत्तरदायित्त्व नसावे असे माझे मत आहे. त्यांनी ती योग्य ती कृती करून घडवली तर ते निश्चितच कौतुकास्पद आहे, नुसते विचार मांडणार्यापेक्षा अधिक महान/थोर आहे. पण म्हणून तशी कृती करणे येनकेनकारणाने शक्य नसणार्यांना राईट ऑफ करू नये, त्यांचे मत विचारासाठी ग्राह्य ठरवावे (स्वीकारावे असे नाही) हा मुख्य पॉइंट आहे. एखाद्या व्यक्तीने काहीही लिहिले की "हे आले विचारजंत!" इतकाच प्रतिवाद निव्वळ त्या व्यक्तीला झिडकारतो, विचारांचा प्रतिवाद होतच नाही, तेव्हा हे वातावरण अजिबात पुरेसेही नाही आणि समाजासाठी आरोग्यपूर्णही!
कोणत्याही समाजाला नवे विचार, नवी दिशा हवी असेल, समाज प्रवाही हवा असेल तर चाकोरी मोडणार्या नव्या विचारांची समाजाला आत्यंतिक गरज असते.स्युडो लिबरल, स्युडोसेक्युलर, विचारजंत, हस्तीदंती मनोर्यातील मूर्ख अश्या शब्दांनी हल्ली अनेकदा व्यक्तीला दूर केले जाते.यातील पहिल्या भागाशी--नव्या विचारांची गरज याविषयी फारसे दुमत नाही. तरीही ’नवे’ विचार हे केवळ ’नवे’ असतात म्हणून ते समाजाला प्रवाही बनवतील असे अजिबात नाही.तेव्हा नक्की कोणते विचार घेण्याजोगे आणि नक्की कोणते टाकण्याजोगे?हे ठरवायचे कोणी? कोणत्या निकषांवर?तेव्हा महत्वाचे काय? जे चांगले ते स्विकारणे की परंपरेतले ते टाकणे? दुसरे म्हणजे असे नवे विचार मांडणारे भारतातच कित्येक लोक होऊन गेले.अगदी अमूलच्या व्हर्गिस कुरियनपासून अण्णा हजारे, सेवा फाऊंडेशनच्या इला भट इत्यादी अनेक.इतकेच काय तर गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा या गावातील समस्या ग्रामसभेच्या माध्यमातून कशा सोडविल्या हा पण एक नवा विचारच.असे लोक अगदी प्रत्येक क्षेत्रात दिसतील.यापैकी किती जणांना स्युडो लिबरल, स्युडोसेक्युलर, विचारजंत, हस्तीदंती मनोर्यातील मूर्ख अश्या शब्दांनी संबोधले गेले आहे?तेव्हा अशा शब्दात संभावना होणे हे पुरोगामी असल्याचे लक्षण आहे असे अपेक्षित आहे का?
पुरोगामी किंवा अभिजन वर्ग हा मुठभर उच्चजातीतील किंवा उच्चभ्रुंचा अट्टाहास आहे किंवा त्यांची नाटकं आहेत, हि प्रतिमा उभी करणे हा मला देशद्रोह वाटतोही गोष्ट ’हजम’ झाली नाही. वर म्हटल्याप्रमाणे नवे विचार मांडणारे लोक अगदी प्रत्येक क्षेत्रात आढळतील.पण तरीही अशा सगळ्यांना स्युडो कोणी म्हणत नाही.मग कोणाला स्युडो म्हटले जाते?ज्या लोकांना असे म्हटले जाते त्यातली बरीचशी मंडळी डाव्या विचारांची असतात.आणि डावी मंडळी म्हटली की देश वगैरे कल्पना त्यांना मान्यच नाहीत.मग या मंडळींच्या समर्थनार्थ बाकी कशाचाही आसरा घेता येऊ शकेल पण इतरांवर देशद्रोहाचा आरोप नक्कीच करता येणार नाही.कारण देश हा प्रकार त्यांनीच अडगळीत काढला आहे.मग इतरांवर देशद्रोहाचे आरोप कसे करणार? कर्णाने जन्मभर धर्माची बाजू घेतली नाही तेव्हा रथाचे चाक अडकल्यानंतर मात्र त्याला धर्म आठवत असेल तर ते कसे चालेल? दुसरे म्हणजे ज्या लोकांना स्युडो म्हटले जाते त्यांच्या समर्थनार्थ हा लेख असेल तर ते नक्कीच अमान्य. स्युडो म्हटले जाते त्या अनेक लोकांमध्ये एक आहे अरूंधती रॉय.तिच्या तथाकथित ’नव्या’ विचारांनी कसला डोंबलाचा फायदा होत आहे? स्युडो म्हटले जाते स्वयंघोषित मानवाधिकारवाल्यांना. संसदेवर हल्ला होण्याइतकी महाभयंकर घटना घडूनही त्या घटनेसाठी देशाच्या कायद्याने फाशीची शिक्षा ठोठावली आणि त्या शिक्षेची अंमलबजावणी झाल्यानंतर मानवाधिकारांच्या नावाने गळे काढणारे हे !! समाजाला काय डोंबलाचे प्रवाही बनवतात हे अस्तनीतले निखारे? असल्यांचे समर्थन करणे तर सोडाच यांना गितमोच्या कॅम्पमध्ये नेऊन हजारवेळा वॉटरबोर्डिंग केले तर मी मिपावर जेवढ्या सदस्यांना ओळखतो त्या सगळ्यांना पेढे वाटीन. असो. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की हा लेख बराच गंडलेला वाटला.
In reply to लेख पटला नाही by क्लिंटन
तेव्हा सांगायचा मुद्दा हा की हा लेख बराच गंडलेला वाटला.आभार. अभिप्रायाचे स्वागत आहे. मुख्य आक्षेप हा आहे की "पुरोगामी" ची व्याख्या पुरेशी दिलेली नाही. हा आक्षेप मान्य आहे नी ते हेतुपुरस्सर आहे. कारण पुरोगामी म्हणजे कोण आणि त्यांचे प्रश्न असा लेखाचा मुख्य विषय नाही! तर १. व्यक्तीला बोलल्याप्रमाणे कृती करता येणे प्रत्येक वेळी शक्य असतेच असे नाही २. प्रय्तक्ष कृती नसतानाही व्यक्ती त्या विषयात काही विचार मांडते अशावेळी त्या व्यक्तीला राईट-ऑफ न करता तो विचार "ग्राह्य" ठरवावा. त्या व्यक्तीला राईट ऑफ करू नये! साजेशी कृती असणे हे उत्तमच! पण ती नसल्यास लगेच मत चुकिचे किंवा अग्राह्य ठरत नाही. मताचे महत्त्व हे तितकेच असते. बाकी शेवटच्या परिच्छेदातील अस्मितेने भारलेली मते म्हणून वाचनीय आहेत. प्रत्यक्षात तशी कृती करण्याचे आवाहन (गितमोच्या कॅम्पमध्ये नेऊन हजारवेळा वॉटरबोर्डिंग वगैरे) सिरीयसली नसावे अशी आशा (व बर्यापैकी खात्री) आहे!
In reply to प्रतिसादकांचे आभार. वेळ by ऋषिकेश
In reply to पुन्हा एकदा by पैसा
बरे एखादा माणूस एका बाबतीत पुरोगामी आणि एका बाबतीत प्रतिगामी असू शकतो. तिथे दर वेळी काळेपांढरे वेगळे करता येईल असे नव्हे.अतिशय म्हणजे अतिशयच सहमत आहे. नेमक्या याच कारणासाठी व्यक्तीवर हा काय स्युडोयंव, हा काय विचारजंत, हा काय अमुक असे शिक्के न मारता मत ग्राह्य ठरवावे. ती व्यक्ती एरवी जी कृती करते ती योग्य की अयोग्य आहे याचा प्रभाव मत जोखताना करू नये. त्या व्यक्तीच्या वागण्यात विरोधाभास असेल तर तो दाखवून द्यावा, त्यावर गरज असल्यास टिका करावी मात्र त्या व्यक्तीस साईट ऑफ केल्याने त्या व्यक्तीशी संवादाचा मार्ग बंद होतो. अशी व्यक्तीगत हेटाळणी करून वेगवेगळे विचार व्यक्त करणार्यांशी संवादाचे मार्ग बुजवण्याने समाजाचा फायदा होत नाही हे तुम्हाला मान्य असेलच!
In reply to सहमती! by ऋषिकेश
त्या व्यक्तीच्या वागण्यात विरोधाभास असेल तर तो दाखवून द्यावा, त्यावर गरज असल्यास टिका करावी मात्र त्या व्यक्तीस साईट ऑफ केल्याने त्या व्यक्तीशी संवादाचा मार्ग बंद होतो. अशी व्यक्तीगत हेटाळणी करून वेगवेगळे विचार व्यक्त करणार्यांशी संवादाचे मार्ग बुजवण्याने समाजाचा फायदा होत नाही हे तुम्हाला मान्य असेलच!विरोधाभासावर टीका केली की व्यक्तिगत व्यक्तिगत म्हणत क्यँव क्यँव करत चर्चा बंद करणारेही हेच लोक असतात. अशा लोकांचे तोंड बंद करण्यात समाजाचा प्रचंड फायदा आहे.
In reply to प्रतिसादकांचे आभार. वेळ by ऋषिकेश
In reply to प्रतिसादकांचे आभार. वेळ by ऋषिकेश
In reply to प्रतिसादकांचे आभार. वेळ by ऋषिकेश
त्या व्यक्तीच्या विचारांचा प्रतिवाद हा विचारांनी करण्याची धमक नसलेले विचारषंढ लोक मग त्या व्यक्तीलाच झाडून टाकायला हा 'स्युडोमार्ग' अवलंबतात.आचारषंढ असण्यापेक्षा विचारषंढ असलेले कधीही बरे!!
In reply to अजून एक राहिले by ऋषिकेश
प्रत्येक विचाराला कृतीची जोड हवी तरच तो विचार ग्राह्य समजणारे, स्वतः मात्र कित्येक विषयांवर त्या त्या क्षेत्रात अजिबात कृतीची जोड नसताना आपापली मते देत असतात / विचार मांडत असताना दिसतात हा विरोधाभास त्यांना जाणवतो का?"समाजात यँव पायजे नि त्यँव पायजे" छाप विचारांना हे विशेषेकरून लागू आहे इतके सांगतो. बाकी चालू द्यावे.
इथे एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पुरोगाम्यांची भलामण करणे मंडळींना खपत नाहीये.तुमच्या 'विचारांना विरोध करणारे ते प्रतिगामी का? का अश्या प्रतिगाम्यांना (पुरोगाम्यांना विरोध करणारे ते प्रतिगामी या अर्थाने) 'त्यांचे विचार' मांडायची मुभा नाही? वर पैसातै म्हणतात त्याप्रमाणे नवीन विचारांना विरोध हा होणारच. बदल हा हळूहळू असावा. १०० जणांमध्ये एकाने नवा विचार मांडला तर ९९ लोक विरोध करणार हे ओघानेच आले. या ९९ लोकांपुढे तुमचे मत मांडायची क्षमता 'फक्त विचारांपेक्षा' कृतीतून जास्त येते हेच मत इथे प्रतिसाद देणार्या लोकांचे असावे असा अंदाज आहे. जर विचारांची प्रॅक्टीकॅलिटी लोकांपर्यंत पोहचली नाही, तर लोकांनी बदल का स्वीकारावा? अन ही प्रॅक्टिकॅलिटी आचारातून प्रतीत होणार नाही असं धागाकर्त्यास वाटते का?
In reply to इथे एक गोष्ट जाणवली ती म्हणजे by अन्या दातार
तुमच्या 'विचारांना विरोध करणारे ते प्रतिगामी का? का अश्या प्रतिगाम्यांना (पुरोगाम्यांना विरोध करणारे ते प्रतिगामी या अर्थाने) 'त्यांचे विचार' मांडायची मुभा नाही?अं? असा अर्थ होतोय त्या विधानाचा? माझ्या मते असा अर्थ होत नाही. असो.
वर पैसातै म्हणतात त्याप्रमाणे नवीन विचारांना विरोध हा होणारच. बदल हा हळूहळू असावा. १०० जणांमध्ये एकाने नवा विचार मांडला तर ९९ लोक विरोध करणार हे ओघानेच आले.विचारांना विरोध करू नये असे कसे म्हणेन? कुठे म्हटले आहे? उलट विचारांचाच विरोध करावा व्यक्तीचा नाही हेच तर सांगतोय
या ९९ लोकांपुढे तुमचे मत मांडायची क्षमता 'फक्त विचारांपेक्षा' कृतीतून जास्त येते हेच मत इथे प्रतिसाद देणार्या लोकांचे असावे असा अंदाज आहे.माझेही तेच मत आहे. कृतीची जोड असल्यास विचार अधिक जलद व अधिक जणांपर्यंत पोचतो. पण येनकेनकारणाने कृती करणे विचार मांडणार्याला शक्य नसेल तरीही तो विचार टाकाऊ होत नाही.
In reply to तुमच्या 'विचारांना विरोध by ऋषिकेश
जर विचारांची प्रॅक्टीकॅलिटी लोकांपर्यंत पोहचली नाही, तर लोकांनी बदल का स्वीकारावा? अन ही प्रॅक्टिकॅलिटी आचारातून प्रतीत होणार नाही असं धागाकर्त्यास वाटते का?अधोरेखित भागाला बगल दिल्याची नोंद घेतल्या गेली आहे.
In reply to अन्याच्या प्रतिसादातील by बॅटमॅन
ही प्रॅक्टिकॅलिटी आचारातून प्रतीत होणार नाही असं धागाकर्त्यास वाटते का?होईलही किंवा होणारही नाही. विचार प्रॅक्टिकल नाही ही विचारावरील टिका असल्यास ती योग्यच आहे. मात्र "एखादी व्यक्ती इप्रॅक्टिकलच आहे तिचे काय ऐकायचे?" असा मोड मात्र गैर आहे!
In reply to त्याचे उत्तर वेगळे दिलेले by ऋषिकेश
In reply to तुमच्या 'विचारांना विरोध by ऋषिकेश
In reply to येनकेनकारणाने कृती करणे विचार by कवितानागेश
In reply to या स्वयंघोषित by बॅटमॅन
In reply to अं? by ऋषिकेश
मत मांडताच समाजाने आचरण करावे असा अट्टाअहास का? मत योग्यच असेल कशावरून? त्यात भयंकर तृटि असु शकतात, विचार प्रत्यक्षात आणण्यात काही बाधा असु शकतात. कोणीही म्हणजे अगदी कोणीही मत मांडले म्हणजे लगेच समाजाने तसे आचरण करावे अशी अपेक्षा का धरावी?धन्यवाद, मग कायच प्रॉब्लेम नाय. सोताची कबर सोताच खणून ठेवलेली आहे. :) बाकी, पायजे ते बडबडायचा हक्क व्यक्तीला पायजे असेल तर त्याला राईट ऑफ करायचा हक्क समाजालाही पायजेच!
In reply to मत मांडताच समाजाने आचरण करावे by बॅटमॅन
In reply to समाजाला त्या मताला राईट ऑफ by ऋषिकेश
In reply to असहमत by बॅटमॅन
मतच नव्हे, तर व्यक्तीलाही राईट ऑफ करायचा हक्क हवाआभार! मताबद्दल असहमती व्यक्त करतो.
In reply to मतच नव्हे, तर व्यक्तीलाही by ऋषिकेश
In reply to मतच नव्हे, तर व्यक्तीलाही by ऋषिकेश
In reply to अं? by ऋषिकेश
In reply to पण तथाकथित नवीन विचार by कवितानागेश
In reply to लिबरलांपुढे वाचली गीता, कालचा by बॅटमॅन
In reply to असा निराश होउ नकोस ब्याट्या.. by कवितानागेश
In reply to पण तथाकथित नवीन विचार by कवितानागेश
In reply to व्यक्ती, व्यक्तीमत्व, by प्यारे१
In reply to लै प्रगल्भ होत चाललाय हा by कवितानागेश
In reply to कुणीतरी मराठीत सारांश लिहा रे by धन्या
In reply to कुणीतरी मराठीत सारांश लिहा रे by धन्या
In reply to आणि विचार मांडण्याशिवाय दुसरं by कवितानागेश
In reply to आणखी थोडं by पैसा
In reply to आणखी थोडं by पैसा
In reply to बदल... by डॉ सुहास म्हात्रे
प्रत्येकाने आपला संघर्ष आपण स्वत: करायचा असतो. नवीन बदलांमुळे होणारे फायदे ज्यांना अजून नीट समजले नाहीत किंवा बदलांमुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले जाणार आहेत त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा करणे फारसे हुशारीचे नाही. किंबहुना या दोन्ही विरोधी गटांच्या बरोबर रस्सीखेच करून त्यात वरचढ होण्याची इच्छा किंवा ताकद असल्याशिवाय कोणत्याही बदलांचे दिवस येत नाहीत... मग ते बदल कितीही क्रांतीकारी असले तरी.हे पटले!
In reply to मूळ प्रश्न असा आहे by अवतार
In reply to परिवर्तनाची गरज कोणाला वाटते? by कवितानागेश
वेळ मिळाताच एकेकाला उत्तरे देतो.चून चून के मारूंगा, बच के रहना, बाब्बौ...|
In reply to बाब्बौ! by होकाका
चून चून के मारूंगालहानपणी आमचा येक भाऊ हाच ड्वायलॉक बोबडेपणे 'चुल चुल के मारूंगा' असा म्हणत असे ते आठवले.
..वाचतेय,