शकू
शकू पिंपळाच्या पारावर शांतपणे बसली होती..हळुवार वा~याने पिंपळपान सळसळत होती...गर्द काळसर हिरवी सावली पिंपळाने तिच्या मस्तकार धरली होती..उन्हे कलायला आली होती..सोकावलेला अंधार वाड्यावर पडणार होता...स्त्रीत्वाच्या अपूर्णतेची लक्तरे तिच्या तनूवर लोंबत होती..
लग्न होऊन ७ वर्षे झाली होती..पण कूस उजवली नव्हती..प्रथम प्रथम पाळी येण्याच्या वेळी ति उत्सुकतेने पाळी चुकेल अश्या आशेवर असायची...पण दिवसा मागून दिवस जात होते..पाळी चुकत नव्हती..
तिने पाहिले ...मांडीवर कोवळ पिंपळपान पडले होते..हळुवार पणे तिने ते उचलले..नवजात अर्भकाच्या कोवळ्या तनु सारख ते कोवळ पान होते..पानाच्या शिरा तिला दिसत होत्या..
गोदाक्का खांबाला टेकून ओसरीवर काहीतरी वाचत बसल्या होत्या..
तिला एकदम हसू फुटले..गोदाक्कांना पारावर बसलेले आवडत नसे..मुंजाची वस्ती असते.."धरले तर आमची उतार वयात पंचाईत करून ठेवशील" त्या नेहमी म्हणायच्या...एकदा तिने गोदाक्का जवळ विषय काढला होता..नको काळजी करू शके..गोदाक्का म्हणाल्या.. ओलेत्याने प्रदक्षिणा घाल २१ परसदारीच्या औदुंबराला..लाइन लागेल मुलांची..
शकुने पण ओलेत्याने प्रदक्षिणा घातल्या होत्या..आता सारे देवाच्याच हातात होते..
वाडा जुना होता..३ नच माणसे शकू..गोपाळ व गोदाक्का...गोपाळ राव म्हणजे शकुचा नवरा...
२ वर्षा पुर्विच सासरे आप्पा गेले..सासूबाई तर गोपाळ एक वर्षाचा असतानाच गेल्या..
गोदाक्का म्हणजे आप्पांची बहीण....लग्न झाल अन वर्षाच्या आतच वैधव्य आले..सासरचे जाच करू लागले...गोदा पांढरे कपाळ घेऊन माहेरी आली ति इथेच राहिली..गोपाळाला तिनेच वाढवले.मुला सारख गोदाक्कांचा गोपाळावर भारी जीव...खुप मायाळू..
तस गाव मध्यम आकाराच..३-४ भटांचे उंबरे...एक गोपाळराव दिक्षित..दुसरे पंडितराव..तिसरे देशपांडे
पंडिंतांशी दिक्षितांचा घरोबा होता....गोपाळचे वडील आप्पा दिक्षितांच्या पिढ्या गावत गेल्या होत्या..निष्णात वैद्य होते आप्पा व गावच्या शंकर मंदिराचे पुजारी पण त्यांच्याच कडे..शिवाय पाटिल देशमुखांच्या घरी पौरोहित्य त्यांचेच..
आप्पाच्या वैद्यकिचा विषय निघाला की गोदाक्का चिडायच्या.."जळ्ळल मेल..कसला वैद्य ,घरच्या बाईला वाचवू शकला नाही..काय चुलीत घालायचे?" आप्पांना ऐकू जाईल अश्या आवाजात म्हणायचे..
त्यांतून राग म्हणजे आप्पा पैसे घेत नसत..औषधाचे..मिळेल त्यात समाधान..
शकुने पाहिलं..गोदाक्का आत गेलेल्या होत्या..
गोपाळरावांची येण्याची वेळ झाली होती..शकू उठून आत गेली..
स्वयंपाक घरात आवरावा आवर चालली होती..
रात्र होत आली होती..गोपाळ ओसरीवर शत पावल्या घालत होता..
माडीवर जाताना गोपाळच्या पावलांचा आवाज शकुने एकला..हात धुऊन तांब्या भांडे भरून ति शयन गृहात प्रवेशली..
गोपाळ कंदिलाच्या प्रकाशात वाचत पडला होता...
शकू बाजूलाच त्याचे वाचन संपण्याची वाट बघत पहुडली होती..
गोपाळाला हि मुलाची ओढ होतीच..त्याने विषय काढला...
ऐकताय का? का झोपलात?
ऐकतेय..बोला..शकू कूस न बदलता म्हणाली..
...
शकुच्या थंड प्रतिसादाने गोपाळला पुढे बोलावेसेच वाटेना..
त्याने कंदिलाच्या वांतीवर फुंकर मारली अन तो पण झोपी गेला..
**********************
बिछान्यावर पडल्या पडल्या शकुला एक प्रसंग आठवला...
नुकतंच लग्न झाला होत..दुपारच्या वेळी प्रणय रंगला होता..
सहज तिच लक्ष गोपाळच्या मांडीकडे गेले..
जांघेच्या खाली गो~यापान मांडीवर एक बिल्व पत्रासारखी खूण तिला दिसली..
त्यावर हळुवार हात फिरवत तिने विचारल्यावर गोपाळ म्हणाला..
"अहो ति आमची जन्म खूण आही..बेलाचे पान पाहिल्यावर आप्पा तर शंकर असेच नाव ठेवणार होते.."
पण आई म्हणाला नको ते नाव स्मशानात रहाणारा देव...मग गोपाळ नाव ठरले..."
शकू ऐकत होती..
हि गुप्त गोष्ट आई..आप्पा..आत्या अन तुम्हालाच माहीत आहे फक्त...
त्यात आई आप्पा गेले आतात तुम्ही..मी अन आत्या...गोपाळ हसत म्हणाला..
आपल्याला बाळ झाले की त्याच्या मांडीवर पण अशीच जन्मखुण नक्की असेल..शकू म्हणाली..
गोपाळ काही बोलला नाही तिला बाहुपाशात घेतले..
शकुचा डोळा लागला होता...
ओसरी वरील झोपाळ्यावर ति बसली होती..तेवढ्यात एक ३-४ वर्षाचा बालक तिच्याकडे धावत येताना तिला दिसला...
ति पटकन झोपाळ्यावरून खाली उतरली..
व त्याला जवळ घेतले.."अरे कोण आहेस तू? अन नंगु बाबा सारखा हिंडतो आहेस..."
तिने पाहिले त्याच्या मांडीवर तिच बिल्व पत्राची खूण होती..
तिने त्याला छातीशी आवळत वात्सल्याचा त्याच्यावर वर्षाव केला...
पण तो लब्बाड निसटला व पळत गेला अन अंतर्धान पावला...
शकू खाडकन जागी झाली,,बाजूला गोपाळ झोपला होता..
स्वप्नच होते ते पण किती सुखावणारे...
**************
शकुला पंडित रावांचा परिवार आवडत नसे..
म्हणजे खर तर पंडित चा छोटा भाऊ माधव व गोपाळ समवयस्क..लहान पणा पासून चे दोस्त..
पण गोपाळची पंडित शी जस्त मैत्री होती पंडित साधारण गोपाळ पेक्षा५ वर्षाने मोठा होता..
माधव मात्र वयात आला अन घरातून निघून गेला एका साधूच्या टोळी बरोबर ..त्याचा पत्ता कुणालाच माहीत नव्हता..
हिमालयात साधू बनून हिंडत आहे अश्या बातम्या होत्या..
सरस्वती म्हणजे सरू पंडित ची भार्या..२ मुले होती..तिला गोपाळच्या वयाची.
पंडित पोस्टात कामाला होता पंचक्रोशीत एकच पोस्ट ऑफिस .. पंडित सांभाळत असे..
शकुचा खरा राग सरू वर होता..म्हणजे एकदा गप्पा मारताना शकुने "२ मुले म्हणजे खूप दगदग होत असेल असे सरूस म्हटले"..त्या वर होना कंबरडं मोडून जाते.. असे म्हणत सरू पुढे म्हणाली..तुला काय कळणार म्हणा?"
ते शब्द शकुच्या जिव्हारी लागले..
नंतर ति गेल्यावर गोदाक्काने तिची समजूत काढत म्हटले "अग तिच बोलणं काय मनावर घेते? मुलखाची तोंडाळ बाई ति..अन वागायचा अन बोलायचा पोचच नाही मेलीला..३ पोर झाली तरी बघ ना कशी नटत असते..केसाचे फुगे काय? नटमोगरी आहे मेली"
शकुला आत्याच्या बोलण्याचे हसू आले...
*********
दुपारची वेळ टळून गेली तरी गोपाळ जेवायला आलेला नव्हता..खर तर इतका उशीर त्याला होत नसे.
शकुच्या ओसरीवर येरझा~या चालू होत्या..
"अग येईल असेल काम ..त्यात अडकला असेल" गोदाक्का म्हणाल्या..
१ वाजून गेला ...अन गोपाळ आला..
अंगणातल्या पिंपात पाणी होते ,,त्याने हात पाय धुतले..टोपि खुंटीला अडकवली..
शकु बाहेर आली.गोपाळला पाहताच ति म्हणाली"अहो किती उशीर..इकडे जीव टांगणीला लागतो ना काळजीने"
शकुचा आवाज ऐकताच गोदाक्का पण ओसरीवर आल्या.
झोपाळ्यावर बसत व उपरण्याने चेहरा पुसत गोपाळ म्हणाला.."अहो सकाळीच पंडित देवळात आला होता..त्याला पोस्टाच्या कामासाठी आठवडाभर जिल्ह्याचा जागी जावयाचे होते..निघताना आला होता म्हणाला घरावर लक्ष ठेव वाहिनी एकटी आहे..हवं नको बघत जा"
सरु चे नाव ऐकताच शकूच मस्तकाची शिर तडाडली..फणका~याने ति म्हणाली" तुम्हीच मिळालात का? गावातले सारे लोक मेले का?"
वातावरण तापतेले पाहून गोदाक्का मध्ये पडल्या..’ अग शके अस काय बोलाव?? पंडित गोपाळचा लहान पणा पासूनचा मित्र..अश्या वेळी जनरित पाळावी लागते..
शकू काहीच बोलली नाही..मान उडवत ओसरीवरून निघून गेली..
दुस~या दिवशी तर कहरच झाला..गोपाळ ४ वाजता घरी आला..शकू गोदाक्का ना म्हणत होती मी बघून येऊ का?..पण आत्या म्हणाल्या राहू देत येईल..तू नको जाऊस..उगाच भांडण व तमाशा कशाला?? ..
घरी आल्यावर कुणी बोलायच्या आत गोपाळ म्हणाला" अग सरू वहिनी नी जेवायचा आग्रह केला..मग गप्पा ..वेळ झाला"
’तिकडेच राहायचे होते ना" शकू रागाने म्हणाली...
गोपाळ काहीच बोलला नाही...
३ ~या दिवशी गोपाळ उशिराच पण जेवायला मात्र घरी आला..
"का आज मेजवानी नव्हती का वाहिनीने केली?" शकुनी टोमणा मारला...
४था दिवशी मात्र शकुनी ठरवले होते गोपाळला चांगले खणकावयाचे..ति तयारीत होती..
पण गोपाळ १२ च्या आत घरी...
"सुटलो एकदाचा जबाबदारीतून..पंडित आला घरी" शकू कडे बघत तो म्हणाला..
"पण कार्यक्रम तर ७ दिवसाचा होता ना" शकू
" हो पण सरकारी काम आपण कोण बोलणारे?"
तुम्ही नाही थांबलात पंडित च्या घरी? शकू म्हणाली..
इतक्या दिवसांनी घरी आला.. विरह संपला असताना माझी कशाला अडचण?" गोपाळ हसत म्हणाला
यावर शकू काहीच बोलली नाही..सुंठी वाचून खोकला गेला होता..
************************
काळ पुढे सरकत होतो..
शके बातमी ऐकलीस का?..सरू ४थ्यां दा गरोदर आहे..
का कुणास ठाऊक शकुच्या मनात मत्सराची लहर उमठुन गेली...
*********
सरुला मुलगा झाला..गोदाक्का सांगत होत्या..
पण शकुचे लक्षच नव्हते..
*********
जेवण झाल्यावर सुपारी चघळताना शकुला ऐकू जाईल अश्या स्वरात तो गोदाक्काला म्हणाला...
पंडित भेटला होता..
तुला न हिला नाव ठेवण्यासाठी आमंत्रण दिले आहे..घरीच येणार होता पण मीच म्हटले नको.निरोप पोहोचवेन,,
**********
आत्या मी काही नाव ठेवण्याच्या कार्यक्रमाला येणार नाही..तिथे आले की तेच प्रश्न..मला नाही सहन होत..शकू म्हणाली..
ठीक आहे मी जाईन घेईन सांभाळून विचारले तर सांगेन.."ति बाजूला बसली " म्हणून..गोदाक्का म्हणाल्या
***************
शंकर नाव ठेवले...अन हो शकु तू पण वेळ काढून एकदा सरू कडे जाऊन ये..गोदाक्का म्हणाल्या
****************
३ महिने उलटले होते..
आत्या मी सरू वहिनी कडे जाऊन येते..ब~याच दिवसात जाण झाल नाही.. शकू म्हणाली..
जा गं बाई.. बर झाल तुच म्हणाली..मी आठवण करुन देणारच होते..
शकुने घरात प्रवेश करताच..शकू किती दिवसांनी भेटत आहे?..सरू उद्गारली..बस ..मी हातातलं काम उरकून येतेच..
शकुने पाहिले पालण्यात बाळ खेळत होते..
सरु वहिनी मी बाळाला घेऊ का???...
अग घे की ..सरु म्हणाली..
सरुनी बाळाला जवळ उचलून घेतले..त्याच्या कोवळ्या स्पर्शाने ति मोहरली..मांडीवर घेऊन खेळवताना बाळ चुळबुळू लागली.
सरुने पाहिले दुपटे ओलसर लागत होते...
वहिनी ह्याने शू केली बघ...
आलेच मी कोरडे दुपटे घेऊन ..सरु म्हणाली...
शकुने बाळाला खाली ठेवले अन ओले दुपटे बाजुला केले..
अन ति चमकलीच..त्याच्या कोवळ्या मांडीवर..बेलाच्या पानाची जन्म खुण होती..
दे माझ्या कडे म्हणत सरुने बाळाला जवळ घेतले..आग थंडीचे दिवस आहेत ना सारखा शू करतो..
शकुचे बोलण्याकडे लक्ष नव्हते..
सरु वाहिनी..ह्याच्या मांडीवर कसली खूण आहे??शकुने विचारले..
अग जन्म खूण आहे..इतर मुलाच्या नाही पण ह्याच्या आहे..हे म्हणाले शंकर नाव ठेवू ..म्हणून शंकर नाव ठेवले....
शकू खाडकन उभी राहिली...वहिनी मी निघती.. आत्या एकट्या घरी आहे....
अग आलीस काय जातेस काय थांब न तुला खायला करते..सरू म्हणाली..
नको वहिनी..मी निघती.म्हणून शकू निघाली...रस्त्याने ति पाय ओढत चालली होती.. उन्हे कलली होती..
तिला काहीच सुचत नव्हते..
ति आली अन पारावर बुंध्याला पाठा टेकवून बसली....
सारे प्रसंग तिच्या डोळ्या समोर आले..
सारे जुळवल्यानंतर एक आकृती बंध तयार झाला अन तिच्या समोर सत्याचा लख्ख प्रकाश पडला.
सारी रहस्ये तिला उलगडली.
तो प्रकाश तेजस्वी व दाहक होता..तिला सहन नाही झाला..
तिने डोळे मिटले ते कायमचेच...
संध्याकाळ झाली होती..कंदील घेऊन गोदाक्का शकू शकू करत ओसरीवर आल्या..
कंदिलाच्या अंधुक प्रकाशात शकू त्यांना पारावर बसलेली दिसली अन गोदाक्का चिडल्या..
किति पण कानी कपाळी ओरडा हि शकु ऐकणा~यातली नाही...असे म्हणत त्या पारावजवळ आल्या..शकू म्हणून त्यांनी २-३ वेळा हाक मारली पण एक नाही २ नाही...
आत्याने कंदील पारावर ठेवला अन शकुला हालवतं शकू शकू म्हणाल्या.. खांद्यावरील हात काढला अन शकुचे कलेवर पारावर कोसळले..
काही तरी अघटित घडले याची जाणीव त्यांना झाली अन जिवाच्या आकांताने त्या"गोपाळा" म्हणून हाक मारली..
****************************
गोपाळ आला..धावाधाव झाली गावकरी जमले..शकुचे अंत्यसंस्कार झाले..
शकू गेली अन गोपालचे जीवानं उद्ध्वस्त झाले.. त्याचे शकुवर प्रेम होते..
१३ रावा झाला अन जीवन सुरू झाले..
मी जरा पंडित कडे जाऊन येतो आत्या ...
पंडित च्या घरी गोपाळ बसला होता शकुचा विषय निघाला...
माझा तर विश्वास बसत नाही..शकू आली ..तिने शंकरला घेतले.व खेळत होती...अन हो त्या च्या मांडीवरच्या बेलाच्या पानाच्या खुणे बद्दल विचारत होती..नंतर एकदम म्हणाली मी निघते..आत्या घरात एकटी आहे म्हणून...अन काही वेळात हि बातमी आली..सरू गोपाळला सांगत होती...
गोपाळ काहीच बोलला नाही..पंडित निघतो मी आत्या ला पण बरे वाटत नाही...म्हणून तो उठला...
घरी आला जेवणावर तशी वासना नव्हतीच..आत्याच्या आग्रहा खातर १-२ घास खाल्ले..
गोपाळ शकू गेल्यापासून खाली ओसरीवरच झोपत असे..
कंदिलावर फुंकर मारली अन तो बिछान्यावर पडला.
सरुचे ते शब्द त्याच्या कानात घुमत होते..
पंडित घरी नसताना काढलेली ति दुपार त्याला आठवत होती..
त्याला अपराधी पणाच्या भावनेने घेरले..व छातीवर ताण आला...
शकू मला क्षमा कर मी अपराधी आहे तुझा..असे तो पुटपुटला..अन डोळे मिटले...
*********
गोपाळ अरे उठ..उन्हे वर आली..गोदाक्का म्हणत होत्या..
पण गोपाळ प्रतिसाद देईना..
गोपाळ म्हणून गोदाक्काने हंबरडा फोडला...
"पत्नि विरहाने गेला बिचारा...गावकरी हळहळत होते...
*******************
शकू गेली..गोपाळ हि गेला गोदाक्का ला घर खायला उठले होते...
दोनही तरणी मुले डोळ्या देखत गेली..तिची जगण्याची इच्छाच मरुन गेली होती..
*********
३-४ महिने गेले अन गोदाक्का पण देवाघरी गेल्या..
वाडा ओसाड पडला होता...
मातीच्या भिंती होत्या वाड्याच्या ..त्या कोसळू लागल्या उंदीर डुकराच घर झाला वाडा..
अंगणातला पिंपळ व परसदारीचा औदुंबर शांत पण या सा~या घटना पहात उभा होता...
*****
पौर्णिमेचा दिवस असावा..
आप्पा सोनाराची न्हाती धुति कमळा धापा टाकत घरी आला अन ओरडली आये...
अग काय झाल? अन घाबरलीस का भूत बघितल्या वाणी..आई म्हणाली..
आये बामणाच्या वाड्यावरून येत होते अन त्या झाडाला एक बाई ओल्याने फे~या मारत होती...
असे म्हणून ति बेशुद्ध झाली..
बामणाच्या वाड्यात शकुचे भूत ..म्हणून गावगप्पांना उत आला.
**********
आता गाव बदलले आहे एस,टी आली..रस्ते झाले..
कधे मधे वयस्कर मंडळीचा पारावर शकुच्या भुताचा विषय चांगलाच रंगतो.....
वाचने
3947
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
कथा आवडली
कथा छान रंगवली आहे.
अकुंची शकु आवडली.
हं!
आवडली कथा!