इमारत..
इमारत..
मी टकमक पाहतो
त्या उच्चभ्रु अलिशान इमारतीकडॆ
जीला गर्व जाणवतो
स्वत:च्या उच्च्भ्रु अस्मितेचा आणि
तिच्या प्रस्थापित संस्कॄतीचा
म्हणुनच;
ती हसते
माझ्य़ा खुज्या अस्तित्वाकडॆ बघुन..
रंगबेरंगी प्रकाशात ती सजते
पिवळ्य़ा कांतीची नववधु भासते
आता तीलाही जाणवते
स्वत:मधील एक हुकमी अस्तित्व
मग;
ती स्वत:च्या साहेबांचे अनुकरण करते आणि
काही फ़ुटाच्या अंतरावर असलेल्या
माझ्य़ाकडॆ व माझ्य़ासारख्या असंख्य
लहान खुराड्य़ांकडॆ बघुन
ती स्वत:ताला पुन्हा एकदा प्रस्थापित करते....!
वैभव देशमुख २३८
खुप छान कविता!
चांगला प्रयत्न