✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मी केलेला एक प्रयत्न !!

ख
खटपट्या यांनी
गुरुवार, 06/26/2014 - 12:14  ·  लेख
लेख
संजय क्षीरसागर आणि प्रशांत आवले यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे मी काढलेल्या चित्रावर स्वतंत्र धागा काढत आहे. - --------------------------------------------------------------------------------- बरेच दिवसापासून आमच्या हिचे म्हणणे होते कि आपण हॉल मधील या दर्शनी भिंतीवर काहीतरी चांगले चित्र लावले पाहिजे. बाजारात बरेच फिरलो पण चित्र काही पसंत पडेना. देवाचा/गणपतीचा मोठा फोटो लावावा तर त्या भिंतीपलीकडे नेमके बाथरूम आणि शौचालय येत होते. याच भिंतीवर चित्र लावण्याचे कारण हे कि पलीकडच्या बाथरूम ची ओल सदैव भिंतीच्या पायथ्याशी दिसते व कोणी आले कि तिकडे लक्ष जाते. ते लक्ष विचलित करण्यासाठी छानसे चित्र काढावे/लावावे जेणेकरून घरात आलेला पाहुणा चित्राकडे बघेल व पायथ्याशी असलेल्या ओलाव्याकडे त्याचे लक्ष जाणार नाही. आंतरजालावर शोध घेत असता या वाघोबांनी माझे लक्ष वेधून घेतले. आणि हेच वाघोबा भिंतीवर विराजमान करण्याचे ठरवले. भिंतीवर बिल्डर ने मारलेला डिस्टम्पर कलर होताच त्यावर ओईल पेंट चा पृष्ठभाग तयार करून त्यावर चित्र काढायचे ठरवले. ओइल पेंट चा वापर यासाठी कि पाण्याने चित्र पुसता येईल. बाजारात सहजासहजी उपलब्ध होणारा एशियन अप्कोलाइट चा १०० ग्राम चा डबा घेवून आलो. दोन इंच रुंद ब्रश ने सफेद रंगाचा पहिला हात मारला. (रंग थोडा घट्ट असतो तो पातळ करण्यासाठी त्यात डायरेक्ट केरोसीन/टर्पेण्टाइन ओतू नका. केरोसीन जास्त पडल्यास रंग पातळ होतो जो परत घट्ट करण्याचा काहीच उपाय नाही. यासाठी ब्रश केरोसीन मध्ये ओला करून रंगात बुडवावा.)सुकल्यावर आतील भगवा कलर डोकावत होता म्हणून अजून एक कोट चढवला. रंग ओला आहे कि सुकला आहे हे बघण्यासाठी आमच्या दोन्ही कन्या त्यावर आपल्या बोटांचे ठसे उमटवू लागल्या. असे करता करता चांगले चार ते पाच कोट चढवून दोन ते अडीच दिवसात पृष्ठभाग तयार झाला. स्केच करण्यासाठी ग्लास मार्किंग पेन्सिल वापरली (बाजारात ग्लास मार्किंग पेन्सिल लाल व सफेद रंगात उपलब्ध आहेत) साधी पेन्सिल ओईल पेंट च्या पृष्ठभागावर तितकीशी चालत नाही. ग्लास मार्किंग पेन्सिल नसल्यास मुलांचे क्रेयोन चे खडू सुद्धा चालतात. ग्लास मार्किंग ने स्केच केल्यावर जर ते मनासारखे नाही झाले तर कपडा केरोसीन मध्ये ओला करून आपण स्केच पुसू शकतो. एकदा मनासारखे स्केच झाल्यावर काळ्या रंगाने स्केच भरून टाकले. बाकीचे प्रतिबिंबाचा भाग राखाडी रंगाच्या वेगवेगळ्या छटांनी रंगवला. झाले घरच्या घरी चित्र तयार. पाच वर्षे झाली अजूनही काल परवा काढल्या सारखे वाटतेय. हेच तंत्र वापरून मुलांची खोली रंगवण्याचा विचार आहे. बघू कधी योग येतोय. test
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
116793 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

चित्र दीसत नसल्यामुळे पुन्हा

खटपट्या
Sun, 01/01/2017 - 06:12 नवीन
चित्र दीसत नसल्यामुळे पुन्हा इथे देत आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त... सुरेख चित्र....

कैवल्यसिंह
Sun, 01/01/2017 - 07:22 नवीन
मस्त... सुरेख चित्र....
  • Log in or register to post comments

चित्र दिसत नाही, काय कारण?

मी कोण
Sat, 07/22/2017 - 09:34 नवीन
प्रतिक्रिया छान वाटल्या.
  • Log in or register to post comments

फेस्बुक ला लोगिन करून पहा

खटपट्या
गुरुवार, 08/10/2017 - 10:12 नवीन
फेस्बुक ला लोगिन करून पहा एकदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी कोण

चित्र दिसत नाही.

किसन शिंदे
गुरुवार, 08/10/2017 - 10:50 नवीन
चित्र दिसत नाही.
  • Log in or register to post comments

चित्र दिसत नाही.

नितिन५८८
गुरुवार, 08/10/2017 - 12:24 नवीन
चित्र दिसत नाही..नाही.....नाही.
  • Log in or register to post comments

चित्र दिसत नाही

सरल मान
गुरुवार, 08/10/2017 - 17:24 नवीन
चित्र दिसत नाही......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन५८८

चित्र दिसत नाही

माम्लेदारचा पन्खा
Tue, 08/22/2017 - 23:35 नवीन
काय करू ?
  • Log in or register to post comments

काय करू मी

चौथा कोनाडा
Mon, 08/28/2017 - 18:43 नवीन
चित्र दिसत नाहीय.
  • Log in or register to post comments

चित्र दिसत नाहीय.

जेडी
गुरुवार, 09/14/2017 - 18:48 नवीन
चित्र दिसत नाहीय.
  • Log in or register to post comments

नमस्कार बरेच दिवस मिपावर येणे

खटपट्या
Mon, 10/09/2017 - 13:00 नवीन
नमस्कार बरेच दिवस मिपावर येणे झाले नव्हते म्हणून उत्तर देता आले नाही. ज्यांना चित्र दिसत नाही त्यांच्यासाठी चित्र परत देत आहे. क्रुपया एका टॅबमधे फेसबुक लॉगइन चालू ठेवा आणि दुसर्‍या टॅबमधे मिपा उघडा. बघा दिसते का... Image removed.
  • Log in or register to post comments

चित्र दिसलं ! चित्र दिसलं ! चित्र दिसलं !

चौथा कोनाडा
Tue, 10/17/2017 - 19:12 नवीन
लै भारी ! चित्र दिसलं ! चित्र दिसलं ! चित्र दिसलं ! माझी दिवाळी सत्कारणी लागली !
  • Log in or register to post comments

चित्र दिसलं ! चित्र दिसलं ! चित्र दिसलं !

चौथा कोनाडा
Tue, 10/17/2017 - 19:12 नवीन
लै भारी ! चित्र दिसलं ! चित्र दिसलं ! चित्र दिसलं ! माझी दिवाळी सत्कारणी लागली !
  • Log in or register to post comments

चित्र दिसलं ! चित्र दिसलं ! चित्र दिसलं !

चौथा कोनाडा
Tue, 10/17/2017 - 19:13 नवीन
लै भारी ! चित्र दिसलं ! चित्र दिसलं ! चित्र दिसलं ! माझी दिवाळी सत्कारणी लागली !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा