मरीज़े मुहोब्बत उन्हींका फ़साना
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
उस्ताद क़मर जलालवींची ही दिलकश ग़ज़ल, ग़ुलाम अलींनी यमनच्या माहौलमधे जी काय बेहद्द रंगवली आहे ती पुन्हा पुन्हा ऐकण्याजोगी आहे.
इश्काचा बिमार तिचीच कहाणी अखेरपर्यंत गात राहिला. पण (गीतात) जेंव्हा संध्याकाळच्या (तिच्या समवेत व्यतीत झालेल्या भेटीच्या आठवणींचे) उल्लेख (दाटून) आले तेव्हा (मात्र माहौल इतका व्याकूळ झाली की) पहाटपर्यंत साथ देणार्या दिपीका सुद्धा निमावून गेल्या.
दुसर्या ओळीतल्या `शामे-अलम' या शब्दावर गुलाम अलींनी केलेली तीव्र मध्यमाची जादू निव्वळ श्रवणीय.
मरीज़े मुहोब्बत उन्हींका फ़साना सुनाता रहा दम निकलते निकलते
मगर ज़िक्रे-शामे-अलम जबके आया चराग़े सहर बुझ गया जलते जलते |
_________________________________
तिच्याशी फारकत घ्यावी (आणि तिला विसरुन जावं) असा इरादा (कैकदा) केला पण तिच्या त्या लाघवी हास्याची पुन्हा (पुन्हा) मोहिनी पडली. असा (मी) किती वेळा स्वत:ला सावरत गेलो आणि (आता) जरा कुठे सावरत होतो तर... पुन्हा तोल गेला, (पुन्हा तिच्या प्रेमात पडलो).
इरादा था तर्के़ मुहोब्बतका लेकिन
फ़रेबे तबस्सुमें फिर आ गए हम
अभी खाके ठोकर संभलने ना पाए
के फिर खाई ठोकर संभलते संभलते |
_________________________________
(सखे) जर बेईमानीची परिसिमा असेल (तर असे मिलनाचे संकेत तू किती वेळा चुकवलेस ते) स्वत:च्या हृदयाला विचार. भेटीचे वायदे तू असे काही बदलत नेलेस की मिलनाचा दिवस पुढे सरकत सरकत (आज) जगाच्या अंताचा दिवस आला.
या कडव्यात गुलाम अलींनी सरगम काय केलीये, कमाल!
मगर कोई वादा खिलाफ़ी की हद है
हिसाब अपने दिलमे लगाकर तो देखो
क़यामत का दिन आ गया रफ्ता रफ्ता
मुलाक़ात का दिन बदलते बदलते |
________________________________
दिल बेचैन आहे असं तिला कळवलं तर ती (साफ) म्हणाली, तुझ्याशी प्रेम करणार नाही. जर (मला) दिल बहेलवायचं होतं तर (ते) तिच्यावर कुर्बान करायची काय गरज होती? (आयुष्य तसंही सरलं असतं आणि) दिल तर काय कसंही बहेललं असतं.
`बहेल जाएगा दिल बहेलते बहलते' ही जागा निव्वळ लाजवाब!
उन्हे ख़तमें लिखा था दिल मुश्तरिब है
जवाब उनका आया मुहब्बत ना करते
तुम्हें दिल लगानेको किसने कहा था
बहेल जाएगा दिल बहेलते बहलते |
____________________________
ती माझी सहचराणी झाली ती किती वेळासाठी तर दिपमाला आणि तारका विझेस्तोवर. (मला वाटत होतं ती माझं मन भरेस्तोवर साथ देईल पण) तिला घरी जायची अशी काही घाई होती की चांदणं निमावायला आलं (आणि आता पहाटेचा माहौल तयार होतच होता इतक्यात)... ती निघून गेली.
इथे `जल्दी' या शब्दोचारणावरची नजा़कतदार लगबग ऐकण्यासराखी आहे
वो महेमां रहे भी तो कबतक हमारे
हुई शम्मा गुल और ना डूबे सितारे
क़मर इस क़दर उनको जल्दी थी घरकी
वो घर चल दिए चांदनी ढलते ढलते |
प्रतिक्रिया
लेख आवडला...
+१
क्या बात...
व्वा
तिमा, तुमच्या सकारात्मकतेचा मी नि:सीम चाहता आहे
संजय सर फारच सुंदर तुमच्या ग्रेस वरील लेखाची आठवण झाली !
ग्रेस च्या लेखाची लिंक ज्यांनी वाचला नसेल त्यांनी जरुर वाचावा
पूर्ण चर्चा वाचली आणि आपले
छान लिहिलय. आवडलं!
मस्त...
सुंदर!!!
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
बहोत अच्छे
फारच सुंदर गजल आणि त्याचे
वाह संक्षी
शब्द ज्याकडे संकेत करतात तो अर्थ जेंव्हा लिहायचा असतो
मूळ गझलीमध्ये जे शब्द नाहीत
आज सकाळी कंसांकडे संपूर्ण दुर्लक्ष करून वाचून बघितला....
क्या बात ...
सुरेख रसग्रहण...
+ १ हेच म्हणतो
छान रसग्रहण. आवडले.
फार छान! मराठीतहि भीमराव
तुम्ही दिल लगाने को किसने कहा था ?
पुन्हा एकदा सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद!
सुंदर
"ग़ज़लांची अशी मैफिल नक्की जमवत जाईन."वाट पाहतो.सुरेख!
बहोत खूब!
मिस्यु
अप्रतीम रसग्रहण