✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सिंहगड व्हॅलीमधील पक्ष्यांचे फोटो - भाग १

ह
हुकुमीएक्का यांनी
Tue, 06/03/2014 - 03:44  ·  लेख
लेख
सिंहगड व्हॅलीमध्ये मी खुप वेळा गेलोय. पण ते फक्त सिंहगडवर जाण्यासाठी. परंतू व्हॅलीमध्ये पक्षी पहाण्यासाठी म्हणून गेलो ते माझ्या एका मित्रासोबत. तेव्हा ठरवले की पुन्हा वेळ काढून नक्की जायचे. ’चॊकटराजे’ ना विचारले, ते तयार झाले. शक्यतो फक्त फोटोग्राफीसाठी एवढा खटाटोप कशाला असे बरेच जणांचे म्हणणे असते. परंतू राजेसाहेब याला अपवाद आहेत. शेवटी ०९ मे ला जायचे ठरले. ०९ मे ला सकाळी ५ वाजता चिंचवड वरून प्रस्थान केले. सकाळी लवकर बाहेर पडण्याचा फायदा हा की रस्त्यावर अजिबात वर्दळ नसते आणि आपण नियोजित स्थळी नियोजित वेळी पोचू शकतो. सकाळी वेगवेगळ्या प्रकारचे फोटो मिळतात. तसेच नॅचरल लाईट असल्याने कॅमेराशी जास्त खेळावे लागत नाही. असो, वाटेत खडकवासला येथे थांबून ’महाराजाचा’ फोटो घेतला. तो खाली पहावा. प्रत्येक फोटोखालीच EXIF डेटा लिहला आहे. जेणेकरून फोटोची टेकनिकल माहिती मिळेल. ’महाराजाचा’ फोटो Maharaja EXIF Data - Camera Mode - Manual Shutter Speed - 1/1000 sec. Aperture - F/6.3 ISO - 100 तिथेच एका Indian Pond Heron किंवा भुऱ्या बगळ्या ने छान दर्शन दिले . . . Indian Pond Heron Camera Mode - Manual Shutter Speed - 1/40 sec. Aperture - F/6.5 ISO - 100 तिथेच शेजारी उगवलेल्या कमळाचा फोटो. वास्तविक हा धागा पक्ष्यांचे फोटो याबाबत आहे. परंतु बगळ्याचा फोटो घेतानाच तिथे हे कमळ दिसल्याने फोटो या धाग्यात दिला आहे.. Lotus Camera Mode - Manual Shutter Speed - 1/80 sec. Aperture - F/5.6 ISO - 100 त्यांनतर सिंहगड व्हॅलीकडे प्रस्थान केले. शक्यतो ७ पुर्वी सिंहगड व्हॅलीमध्ये जावे जेणेकरून नॅचरल लाईट जास्त मिळेल. सिंहगड व्हॅलीमध्ये ६.१८ वाजता पोचलो. चिंचवडवरून सिंहगड व्हॅलीमध्ये पोहोचायला साधारण १ तास २० मिनिटे लागतात. सिंहगड पायथ्याला असलेल्या एका हॉटेल मध्ये चहा व पोहे खुप छान मिळतात...तेथे पोहे व चहा घेऊन पुढे वाटचाल सुरू केली. पायथ्यापासून सिंहगडची वाट चालू लागल्यावर एक मंदीर लागते तिथून डाव्या हाताला गेल्यावर सिंहगड व्हॅली सुरू होते... आणि सरळ वर गेल्यावर सिंहगड ट्रेक सुरु होतो. व्हॅलीमध्ये उतरल्यावर लगेचच एक Green Bee-eater किंवा रानपोपट दिसला त्याचा हा फोटो. Green Bee Eater Camera Mode - Manual Shutter Speed - 1/250 sec. Aperture - F/6.5 ISO - 100 थोडे पुढे गेल्यावर "मल्ल्या कंपनी" चा सिंबॉल White-throated Kingfisher किंवा खंड्या दिसला. त्याची मस्त पोटपुजा चालू होती. त्याचा फोटो. KingFisher Camera Mode - Manual Shutter Speed - 1/50 sec. Aperture - F/6.5 ISO - 160 तिथून थोडे पुढे गेल्यावर दुर झाडावर थोडी हालचाल झाली. तिथे होती Black-shouldered Kite किंवा कापशी घार. तिचा फोटो Kite Camera Mode - Manual Shutter Speed - 1/405 sec. Aperture - F/6.5 ISO - 200 तेथे एका विहीरीजवळ बसलेल्या Spotted Dove किंवा ठिपकेदार होला चा फोटो Spotted Dove Camera Mode - Manual Shutter Speed - 1/500 sec. Aperture - F/5.6 ISO - 400 झाडाच्या शेंड्यावर बसलेल्या Common Sparrow किंवा चिमणी चा फोटो. Common Sparrow Camera Mode - Manual Shutter Speed - 1/50 sec. Aperture - F/6.5 ISO - 100 ज्याची शेपटी बसल्यावर 'V' आकाराची दिसते त्या Black Drongo किंवा कोतवाल चा फोटो. Black Drongo Camera Mode - Manual Shutter Speed - 1/100 sec. Aperture - F/6.5 ISO - 100 निघता निघता काढलेला एका Brahminy Myna किंवा ब्राह्मणी मैना चा फोटो. Brahminy Myna Camera Mode - Manual Shutter Speed - 1/160 sec. Aperture - F/6.5 ISO - 100 त्या दिवशी बरेच फोटो मिळाले. व्हॅलीमधून साधारण १०.०० वाजता पुन्हा एकदा हॉटेलमध्ये चहा घेऊन पुन्हा नक्की यायचे असे ठरवून सिंहगड व्हॅलीमधून चिंचवडकडे प्रयाण केले. ...समाप्त...
  • सिंहगड व्हॅलीमधील फोटो - भाग २

Book traversal links for सिंहगड व्हॅलीमधील पक्ष्यांचे फोटो - भाग १

  • सिंहगड व्हॅलीमधील फोटो - भाग २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण

प्रतिक्रिया द्या
119420 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

सुरेख !

मदनबाण
Wed, 06/04/2014 - 14:00 नवीन
सुरेख ! :)
  • Log in or register to post comments

खूप सुंदर

नि३सोलपुरकर
Wed, 06/04/2014 - 14:35 नवीन
खूप सुंदर छायाचित्रे !!!
  • Log in or register to post comments

सर्वच छायाचित्रे सुंदर !!!

खटपट्या
Wed, 06/04/2014 - 23:56 नवीन
सर्वच छायाचित्रे सुंदर !!!
  • Log in or register to post comments

छान.

एस
गुरुवार, 06/05/2014 - 11:14 नवीन
तुम्हांला जर पक्षीछायाचित्रण वा वन्यजीवछायाचित्रणात रस असेल तर फेसबुकवर Indian Birds नावाचे पेज आहे. त्यावर टाकली जाणारी पक्ष्यांची छायाचित्रे बघा. त्याचबरोबर सुधीर शिवराम, बैजू पाटील, राधिका रामासामी, कल्याण वर्मा वगैरे नावाजलेल्या वन्यजीवछायाचित्रकारांचे कार्य पहा. खूप शिकायला मिळेल.
  • Log in or register to post comments

पेज पाहीले

हुकुमीएक्का
गुरुवार, 06/05/2014 - 22:57 नवीन
@स्वॅप्स. पेज पाहीले. खुप छान आहे. खुप मदत होईल पुढील फोटोग्राफीमध्ये. माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

अप्रतिम...

इशा१२३
गुरुवार, 06/05/2014 - 11:25 नवीन
सुरेख फोटो...
  • Log in or register to post comments

मस्तच आहेत फोटो.

जागु
Fri, 06/06/2014 - 12:27 नवीन
मस्तच आहेत फोटो.
  • Log in or register to post comments

सुरेख

नूतन
Sat, 06/07/2014 - 18:52 नवीन
फोटो आवडले .रानपोपट मस्त.पण कमळाचा इतक सुंदर फोटो बघता बघता नाहीस झाला
  • Log in or register to post comments

पहिल्या फोटोमधले झाड.

नांदेडीअन
Sat, 06/21/2014 - 18:20 नवीन
पहिल्या फोटोमधले झाड. :) Image removed.
  • Log in or register to post comments

वा सुंदर

हुकुमीएक्का
Sat, 06/21/2014 - 21:55 नवीन
सुंदर. EXIF डेटा कळेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन

याला किती अर्थ

चौकटराजा
Sun, 06/22/2014 - 09:06 नवीन
एखादा फोटो चांगला आला की EXIF DATA मागण्याची एक पद्धत झाली आहे. माझ्या मते याचा फारसा काही फायदा नाही. एकतर प्रत्येक लेन्सने मिळणारा, प्रत्येक सेन्सर वर जाणारा व प्रत्येक वेळी च्या प्रकाशाचा परिणाम वेगवेगळा असू शकतो. एवढेच काय पाचेक मिनिटापूर्वी आदशे वाटणार्‍या सेटींगचा हिस्टोग्राम आता आदर्श असेलच असे नाही. शेवटी ज्यानी त्याने आपल्या व्हू फाईंडर व मॅन्योअल मोड वा कुशलतेने वापर करीत आदर्श प्रतिमेपर्यंत पोहोचावे. ( आपल्या कॅमेर्याच्या मर्यादेत अर्थात )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुकुमीएक्का

धन्यवाद.

नांदेडीअन
Sun, 06/22/2014 - 11:02 नवीन
धन्यवाद. :) Nikon D5100 18-55mm lens 30.0 mm F5.6 ShutterSpeed 1/800 ISO 640
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुकुमीएक्का

फोटो आवडला.

यशोधरा
Sun, 06/22/2014 - 11:16 नवीन
फोटो आवडला. मूळ धाग्यावरील व वल्ली, तुम्ही काढलेले फोटोही छान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन

.

गुल्लू दादा
Sun, 08/13/2017 - 06:57 नवीन
जबरी...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन

फोटो आवडले

सुधीर
Sat, 06/21/2014 - 22:19 नवीन
सुंदर छायाचित्रे! (वल्लींची सुद्धा). पावसाळा चालू झाला की लालबुड्या बुलबुल आणि बोटभर लांबीचे बाकदार चोचीचे पक्षी (सनबर्ड कदाचित) मुंबईत दिसू लागतात. (निदान खिडकीच्या जवळपास दिसतात)
  • Log in or register to post comments

मस्त फटू... माझ्या भावाने

मिसळलेला काव्यप्रेमी
Sun, 06/22/2014 - 10:03 नवीन
मस्त फटू... माझ्या भावाने काढलेले हे फटू चेकवा एकदा आवडतील तुम्हाला...
  • Log in or register to post comments

एकच फोटो दिसत आहे, स्वर्गीय

यशोधरा
Sun, 06/22/2014 - 10:26 नवीन
एकच फोटो दिसत आहे, स्वर्गीय नर्तकाचा पिल्लासोबत. नॅशनल जिऑग्राफिकमध्ये निवडला आहे का हा फोटो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

सुंदर फोटो आवडले

विवेकपटाईत
Fri, 07/25/2014 - 10:30 नवीन
सुंदर फोटो आवडले
  • Log in or register to post comments

सिंह गड दरी तील फोटो.

भ ट क्या खे ड वा ला
Mon, 12/29/2014 - 18:30 नवीन
सुंदर. काल या फोटोग्राफर ला भेटण्याचा योग आला. एकदम मस्त माणूस, मजा आली. कंजूस ना धन्यवाद. कालच्या फोटोंची वाट पाहतोय.
  • Log in or register to post comments

सुंदर

उदयकुमार महाजनी
Sun, 02/01/2015 - 16:23 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments

.

गुल्लू दादा
Sun, 08/13/2017 - 06:58 नवीन
  • Log in or register to post comments

.

गुल्लू दादा
Sun, 08/13/2017 - 06:58 नवीन
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा