Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ईट्स अफ्रिका ब्वना -२ !!

ट
टारझन यांनी
Tue, 07/29/2008 - 05:35  ·  लेख
लेख

Book traversal links for ईट्स अफ्रिका ब्वना -२ !!

  • ‹ ईट्स् अफ्रिका ब्वना !
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29520 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

अ
अमित.कुलकर्णी Tue, 07/29/2008 - 06:21 नवीन

दोन्ही भाग आवडले

दोन्ही भाग छान जमले आहेत. -अमित
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Sat, 08/02/2008 - 10:23 नवीन

अगदी असेच...

आताच वाचले बरं का. पहिला भाग तर झकासच (विशेषतः तयारी वगैरे...) आणि दुसर्‍याची लज्जत न्यारीच. टारझनच्या गँगमध्ये सामील व्हायला हवे तर... चीअर्स (दहावीपार घराण्याचा झेंडा फडकविणारा आणि आफ्रिकेत बर्‍यापैकी मित्रमैत्रिणी बाळगून असणारा) एकलव्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित.कुलकर्णी
अ
अनामिक Tue, 07/29/2008 - 06:36 नवीन

अफ्रिकेतल

अफ्रिकेतलं निसर्ग सौंदर्य बघायला नक्किच आवडेल. मस्त झालाय हा लेख पण! ईथे लोक १०-१० वर्षे सुद्धा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड म्हणून एकत्र रहातात. अमेरिकेत आल्यावर सुरवातीला मीपण चाट पडलो होतो. एक मजेशीर गोष्ट आठवतेय - मझ्या एका मित्रा बरोबर मी एका पार्टीला गेलो असता एका अमेरिकन माणसाने त्याला विचारले "तुला मुलं आहेत का?"... हा म्हणाला हो म्हणून. ... त्यावर त्या माणसाचा पुढचा प्रश्न - "तुझं लग्न झालय का?".... मित्र एकदम चाट... !!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 07/29/2008 - 18:12 नवीन

अवांतर... चि

अवांतर... चिमणरावांची एक गोष्ट आठवली... एकदा चिमणराव खानेसुमारीला (जनगनणा करायला) जातात. एका घरात घुसतात. तिथे एक तरूण मुलगी असते. तिला प्रश्न विचारायला सुरुवात करतात. मग एक प्रश्न येतो, 'तुमचं लग्न झालंय?' ती बिचारी लाजून बिजून म्हणते, 'नाही'. पुढचा प्रश्न, 'तुम्हाला मुलं किती?' उत्तर, 'फट्याक, तुझा मुडदा बशिवला मेल्या. ^%#$*(&^' चिमणराव गुल. :)) बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
ध
धनंजय Tue, 07/29/2008 - 06:39 नवीन

मिष्किल

लिहायची पद्धत, चित्रे माहिती - सगळे आवडले.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 07/29/2008 - 07:23 नवीन

मस्तच

मस्तच लिहिलेस!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 07/29/2008 - 07:39 नवीन

+१

असेच म्हणतो..... मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
र
रविराज Tue, 07/29/2008 - 07:28 नवीन

आवडला

पहिल्या भागाप्रमाणेच हा ही भाग मस्तच. पण अजुन क्रमशः करता आलं नसत का? ६ महिन्याच्या अनुभवावरती किमान ६ लेख तरी लिही. बाकी प्रवास वर्णन आणि छाया चित्रे छान. तुझी लिहायची स्टाइल मला आवडली.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 07/29/2008 - 08:05 नवीन

छान,

लिहिलं आहेस रे कुबड्या. सगळी चित्रंही मस्त. खास करून नोटांचं आणि त्या लहानगीच! :) अजूनही अगदी अवश्य लिही, चांगलं लिहितोस तू.... तात्या.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 07/29/2008 - 08:33 नवीन

छान!

इंग्लंड-अमेरिकेला जाणार्‍या लोकांनी लिहिलेले त्यांचे अनुभव खूप वाचायला मिळतात! कधी कधी तर वीट येण्याजोगे!! पण अफ्रिकेत गेलेल्या माणसाचे अनुभव इंटरेस्टिंग वाटले..... यामुळे झालं काय की मी रोज ३०,००० - ५०,०००शिलींगचं एकटा खातो हे मला पचायला जड जात होतं. पण चलन भिकार असलं तरी महागाई फार आहे. हा, हा, हा!!!! अरे चलन भिकार आहे म्हणुनच महागाई फार आहे....... त्यातही मी सेंट-सेंटचा विचार करणारा अट्टल पुणेकर असल्याने ऑर्डर करण्याआधी मोबाईल वर ते किती रूपयांत पडतं याचा विचार करत असे. ५०,०००शिलींग म्हणजे बापरे १२०० रुपयांच जेवण? अबब !!! आता तरी तुझा भारतीयपणा (पुणेरीपणा असं म्हणायचंय पण त्या जाज्वल्य पुणेकरांशी व्यनिची मारामारी नको!!!) आता जरा सोड!! अरे मस्त खाना खिलाना/खाना इज मोस्ट इंपॉर्टंट! कितना पैसा खर्चा किया ये तो बादकी बात है!!!! ईथल्या जंगली लोकांना (जे शेती करतात, पशुपालन करतात) त्यांना मसाई म्हणतात. जरा सांभाळून रे बाबा!! ते लोक फार अभिमानी असतात म्हणे! ज्या गोष्टी ऐकल्यात त्यावरून ते कोणाचाही क्षुल्लक कारणावरून कोथळा बाहेर काढतात असं ऐकलंय!! (आमचा अब्दुलखान तरी काय वेगळा होता म्हणा!!!!:)) या आमची अफ्रिका बघायला , मला विश्वास आहे तुम्हाला अफ्रिका निराश नाही करणार जरूर! पण ते एडसचं जरा थोडं सांभाळायला हवं!!:) ह.घ्या.... असो, उत्तम चित्रण, अजून येऊ दे!!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 07/29/2008 - 08:34 नवीन

वा...

कुबड्या खविसा.. मस्त लिहिलं आहेस. दोन्ही भाग आवडले. वर्णन अगदी सुंदर. माझे बाबा होते काही महिने टांझानिया मध्ये त्यांच्या तोंडूनही बरीच माहिती ऐकली आहे. लेखन आवडलं.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Tue, 07/29/2008 - 08:57 नवीन

कु.ख.

कु.ख. दोन्ही भाग मस्त लिहीले आहेस. http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 07/29/2008 - 09:00 नवीन

मस्त!

प्रशांत मस्त लिहीतोस तू! असाच लिहीता राहा. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 07/29/2008 - 09:00 नवीन

मस्त लेख आहे...

मी त्याचा अपमान करून पण त्याला वाईट वाटलं नसावं. कारण जाताना मला म्हणाला "थिंक ओव्हर ईट अगेन !!" माझा पारा आधिच चढलेला, मी मराठीतल्या चतुर्थ श्रेणीतली स्तुतीसुमनं बिंधास्त हासडली. बाप रे बाप ... :० आई-बापाचे लग्न लावणारा तो ईवलासा शाहिद कपूर पाहून मी धन्य झालो......म्हंटलं भिषी बिशी लावत असतील,,...खायला नसलं चालेलं यांच्या बुडाला कार हवी. =)) =)) ऐकीव माहीतीच्या आधारे, काही लोक आयुष्यभर काहीही ऊद्योग न करता जगतात. हे तर लै आवडलं.... __________________ अवांतर : तो अनेक माणसं मारणारा इदि अमिन नामक प्रशासक / हुकुमशाहा युगांडाचाच ना ? युगांडाच्या एकूणच इतिहासाबद्दल लिहिलं तरी वाचायला आवडेल... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 07/29/2008 - 10:29 नवीन

छान

मस्त लिहिलं आहेस टारझना. दोन्ही भाग छान झालेत. फोटो पण छान आलेत. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
म
मनिष Tue, 07/29/2008 - 10:36 नवीन

दोन्ही भाग मस्त

दोन्ही भाग मस्त झालेत... आधी वाचलेला एक आफ्रिकेवरचा लेख आठवला (लिखिकेचे नाव विसरलो) - त्यांना म्हणे तिथल्या स्थानिक कामवाल्या विचारायच्या त्यांच्या मुलांकडे बघून - "सेम फादर, सेम मदर?" -- त्यांना असाच जोरदार कल्चरल शॉक बसला होता! :)
  • Log in or register to post comments
श
श्रीमंत दामोदर पंत Tue, 07/29/2008 - 10:38 नवीन

दोनही भाग

दोनही भाग उत्तम........... आजुन लिही फार मस्त लिहितोस तु.......... आजुन खूप काही वाचायला आवडेल तु लिहिलेले........
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 07/29/2008 - 11:36 नवीन

मस्त

लेख आवडला. किस्सेही मस्तच. कु. ख. ब्वना औरभी लिखो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 07/29/2008 - 11:48 नवीन

अरे, तू तर

अरे, तू तर म्हणाला होतास की हे कंटाळवाणं होईल का काय... अजिबात नाही रे... छानच लिहिलं आहेस. मुद्देसूद आणि नीटनेटकं. (शेवटी सॉफ्टवेअर वाला ना तू) फोटू पण छानच. आता पुढे आफ्रिकेतल्या वन्यजीवनावर पण होऊन जाऊ दे एखादा लेख. कीप इट अप. बिपिन.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 07/29/2008 - 11:50 नवीन

मस्त...

आफ्रिका आवडली,चित्रेही मस्त.. ते शेवटी संपूर्ण असं लिहिलय ना ते तेवढं क्रमशः कर आणि आफ्रिकेतले अजून अनुभव येऊ देत,:) स्वाती
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Tue, 07/29/2008 - 11:53 नवीन

खूप छान

खविसमहाराज, मस्तच लिहिले आहेत. मला आफ्रिका पाहावयाची खूप इच्छा आहे. बघू कधी जमत॑य ते. जगातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर 'लेक बाईकाल' रशियात आहे. दुसर्‍या क्रमा॑कावर आफ्रिकेतले 'लेक टा॑गानिका' आहे. लेक व्हिक्टोरिया (उजीजीचा समुद्र) हे ब्ल्यू नाईलचे उगमस्थान एकोणिसाव्या शतकात कॅप्टन जॉन स्पेक व रीचर्ड बर्टन ह्या दोन धाडसी प्रवाश्या॑नी शोधले. ह्या शोधाची रोमा॑चकारी कहाणी बाळ साम॑त लिखित 'शापित यक्ष' (परचुरे प्रकाशन) ह्या बर्टन चरित्रात वाचावयास मिळेल.
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 07/29/2008 - 12:30 नवीन

मस्त रे कु. ख.!!!

छायाचित्रे, वर्णन, उपमा, विचार वाचायला खूप मजा आली. असेच अजुन लिहीत जा. अफ्रिकन डायरी असे एक नियमीत सदर होऊन जाऊ दे तुझे. अजुन किती दिवस मुक्काम असणार आहे? एन्जॉय!!!!
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Tue, 07/29/2008 - 12:42 नवीन

लेख आवडला.

लेख आवडला. किस्सेही मस्तच राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
प
प्रगती Tue, 07/29/2008 - 13:07 नवीन

तुमची आफ्रिका आवडली.

लेख खरंच खूप छान झाला आहे, वाचताना एकटीच हसत होते :D आपली लिहीण्याची पद्धत आवडली.
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Tue, 07/29/2008 - 16:11 नवीन

आवडले...

छान च लिहिलं आहेस.. लिहीत जा.
  • Log in or register to post comments
भ
भोचक Tue, 07/29/2008 - 18:02 नवीन

आफ्रिकेची सफारी

वाचून मजा आली. आफ्रिकेची सफारी केल्यासारखे वाटले.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/29/2008 - 19:16 नवीन

मस्त रे !!!

कुबड्या, ( नाव बदल रे :)) आफ्रिकन टूर मस्त, लेखनाची भाषा आवडली त्यामुळे प्रवासवर्णन वाचायचा कंटाळा आला नाही. फोटोही छानच, क्रमश लिहावे यासाठी शुभेच्छा !!! काही जेनेटिक बदल होऊन अफ्रिकन डांबर झाले ह. ह. पु. वा . झाली !!! :) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ध
धमाल नावाचा बैल Tue, 07/29/2008 - 19:37 नवीन

मस्त रे

मस्त रे कुबड्या! और भी लिक्खो!
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Tue, 07/29/2008 - 22:19 नवीन

मस्तच

मस्तच रे. अधे मधे पेरलेले विनोद मस्तच उगवलेत. :) अजुन बरच लिहु शकशील अस वाटत. बघ विचार कर अजुन. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
ट
टिउ Tue, 07/29/2008 - 22:49 नवीन

मस्त

हा भाग पण एकदम झकास जमलाय! ते फार हुषार आहेत. अगदी रूमक्लिनर पण ईंग्लिश मधे बोलतो हाहा पाचवी फ विनोद आठवला...अमेरिकेतले लोक फार हुशार असतात. तिथले लहान मुलं पण फाडफाड इंग्रजी बोलतात म्हणे!
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 07/30/2008 - 01:24 नवीन

मस्त !!!!!!!

मस्त लिहिलंय कुब्ड्या साहेब ! युगांडाचे नावही चारचौघात घ्यायला आम्हाला लाज वाटते ;-) तुम्ही तर सफरच घडवलीत. वा ! - सर्किट
  • Log in or register to post comments
स
सूर्य Wed, 07/30/2008 - 10:11 नवीन

दोन्ही भाग

दोन्ही भाग छान झालेत. आफ्रिकेबद्दल अजुन येउद्यात. - सूर्य
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 07/30/2008 - 15:06 नवीन

एकद्म

एकद्म बढीया!! बेट्या मजा करतोयेस तर !!!! आणी सहा महीन्यात जे पाह्यलस ते २ लेखात सम्पवलयस!!! बाकीचे फोटो काय लोणच घालायला ठेवलेत ? टाक सगळे पूढच्या भागात !! वाट बघतोये !!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 07/30/2008 - 15:36 नवीन

सही

सही लिहलय रे कुबड्या !! लै लै आवडले ! संपवले उगच यार, सहजराव म्हणतात तशी आफ्रिकन डायरी येउदेच !
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 07/31/2008 - 00:03 नवीन

कु.ख. उर्फ टारझन!

युगांडा आणि एथिओपियाची सफर आवडली रे! तू लेका धत्तिंग लिहितोस एकदम! मस्त वाटतं वाचायला. (एक शंका - माझ्या माहितीप्रमाणे केनया आणि टांझानियात राहणार्‍या आफ्रिकन लोकांना मसाई म्हणतात. तू इथे युगांडा आणि एथिओपियन लोकांनाही तोच शब्द वापरला आहेस. त्यामुळे मी थोडा गोंधळलो आहे.) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रियाली गुरुवार, 07/31/2008 - 00:37 नवीन

सफर आवडली - सहमत

युगांडा आणि एथिओपियाची सफर आवडली रे!
सहमत. वेगळ्या जगाची ओळख झाली. नेहमीच्या इंग्लंड-अमेरिका वार्‍यांनी वात आणला होता. आणखी अफ्रिकन किस्सेही वाचायला आवडतील. आता थोडा छिद्रान्वेशीपणा आणि त्याबद्दल आगाऊ माफी :) केनया आणि टांझानियात राहणार्‍या आफ्रिकन लोकांना मसाई म्हणतात - बरोबर जगातले सर्वात मोठे सरोवर/तलाव - १. कॅस्पियन समुद्र २. लेक सुपिरिअर ३. लेक विक्टोरिया - एक नंबरने उतरला तरी समुद्रासारखाच दिसत असावा हे निश्चित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ट
टारझन गुरुवार, 07/31/2008 - 01:48 नवीन

चुक झाली ..

युगांडा च्या एका बाजुला टांझानिया आणि एका बाजुला केनिया आहे. जिंजा केनियाच्याच बॉर्डर वर आहे. मी चित्रीत केलेल्या कलाकृती मसाई आहेत एवढ नक्की .. युगांडात मसाई रहातात का नाही ते नाही माहीत. केनया आणि टांझानियात राहणार्‍या आफ्रिकन लोकांना मसाई म्हणतात - बरोबर शक्य आहे .. मी एकटाच भटकतो आहे ... कोणी खास माहीती देणारं नाही...त्यामुळे त्रुटी असू शकते. मी काही दिवस केनियात पण होतो.. तिथे मसाई समाज वेगळा, जंगला जवळ रहातो .ते शेती करतात आणि गायी (जनावरे) पाळतात.त्यामुळे त्यांना मसाई म्हणतात. आणि त्यामुळे मसाईमारा नावाचे एक मोठे नॅशनल पार्क आहे केनिया मधे. मसाई चा अर्श ' गाय ' असा पण होतो बहूतेक . १. कॅस्पियन समुद्र २. लेक सुपिरिअर ३. लेक विक्टोरिया - एक नंबरने उतरला तरी समुद्रासारखाच दिसत असावा हे निश्चित. चुक सुधारल्या बद्दल धन्यवाद ... ईथे आल्या पासून लोक सांगत .. लेक व्हिक्टोरिया बघुन ये .. ते दोन नंबरचं लेक आहे. त्या आधारे दिली माहिती ... यात आगाऊ पणा नाही हो .. प्रतिक्रिये बद्दल पुनःश्च आभार !!! टारझन (गेल्या जन्मीचा खविस) (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो. तू भारी ...तर जा घरी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
च
चित्रा गुरुवार, 07/31/2008 - 20:57 नवीन

वर्णन आवडले.

एकदम छान, वातावरण डोळ्यासमोर उभे केलेत. मजा आली.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 08/02/2008 - 17:50 नवीन

मस्त

अतिशय मस्त.. दोन्ही भाग एकदम एकामागोमाग वाचले.. प्रचंड आवडले.. एका नव्या देशाची अनोखी सफर!.. इथल्या माणसांविषयीही येऊ देत.. तुम्ही एकटे फिरता पण लोक भेटत असतीलच की.. अशाच खास आफ्रिअकन वल्लीबद्द्ल वाचायला आवडेल. जागतिक मॅरेथॉन मध्ये यांच्या स्टॅमिन्याचा हात(पाय) कोणी धरू शकत नाही हसून दमलो -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
साती Sat, 08/02/2008 - 20:06 नवीन

दोन्ही लेख!

दोन्ही लेख मस्त झालेत. लिहायची स्टाईल छान आहे तुझी. -साती
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 08/02/2008 - 21:36 नवीन

बेश्ट

ओळखीचे असून एक तर वाट बदलतात एक तर त्यांचा मोबाईल तुम्ही दिसले की मगच वाजतो.
ही भानगड आमी एखाद्या कार्यक्रमातुन कल्टी मारायची अस्ली मंग वापर्तो. बरं ते त्से त्से नावाची माशी कुठं भेटली का? आमचे देव गुर्जी म्हनायचे की लई विशारी अस्ते. चावली की मरतयं म्हने मानुस. आन तिथ पाउस बी राईट टायमाला पडतो. मान्स त्याच्यावरुन घड्याळं लावतात. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 08/02/2008 - 23:25 नवीन

हाहाहा

बरं ते त्से त्से नावाची माशी कुठं भेटली का? आमचे देव गुर्जी म्हनायचे की लई विशारी अस्ते. चावली की मरतयं म्हने मानुस. काय सांगता ? अजुन तरी भेटली नसावी .. नाय तर मी लेख कसा लिहीला असता ? थ्यांक्स फॉर सांगिंग आ ? सो नाऊ मी जपुन राहिंग... त्से त्से तर जपानी कोरियन नाव वाटतय!! आमच्या अफ्रिकेत कुठून आली मग ही ? आन तिथ पाउस बी राईट टायमाला पडतो. मान्स त्याच्यावरुन घड्याळं लावतात. ते घड्याळाच नाय माहीत .. पण आपल्या सारखा मिस कॉल नाही देत पाऊस ईथे. एक नंबर पाऊस. ढग आले की पडणारच .. आणि ऊन पण लगेच पडत ... टारझन (गेल्या जन्मीचा खविस) (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी तर जा घरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 08/02/2008 - 21:55 नवीन

लय भारी

कुबड्या (आम्ही काही लोकं तुला कुबड्या नाहितर खवीसच म्हणणार), लेका भारी लिहितोस ... यवढे भारी विनोद लिहितोस तर शौचकूप हा शब्द रे कसा विसरलास? यमी / अदिती/ संहिता / दीदी
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 08/04/2008 - 06:22 नवीन

कंपू

संहिताताई, आता शौचकूप हा शब्द विसरा. कुबड्याने शौचकंपू हा मराठीभाषेला युगांडातून बहाल केलेला नवीन शब्द आहे. तोच आपण वापरूयात. उदा. सकाळी उठून शौचकंपूत गेलो असता, कंपूमध्ये कुणी पाणी टाकलेले नाही, हे लक्षात आले, आणि कंपूबाजीवरील विश्वासच नष्ट झाला. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ध
धमाल मुलगा Mon, 08/04/2008 - 10:59 नवीन

कंपूमध्ये

कंपूमध्ये कुणी पाणी टाकलेले नाही, हे लक्षात आले, आणि कंपूबाजीवरील विश्वासच नष्ट झाला.
=)) फु..ट...लो !!!!! मला अजानुकर्णानं अमिताभवर लिहिलेला लेख आठवला :) अमिताभ परसाकडच्या वाटेने येताना अमरसिंहाच्या हाती टमरेल..इ.इ.... खल्लास!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
ट
टारझन Mon, 08/04/2008 - 11:52 नवीन

ह ह मे

कुबड्याने शौचकंपू हा मराठीभाषेला युगांडातून बहाल केलेला नवीन शब्द आहे. थ्यांक्स ... मी पण सायंटिस्ट लोकांसारखे चुकून लागलेल्या शोधांच क्रेडिट घेतो ... हाहाहा .... उदा. सकाळी उठून शौचकंपूत गेलो असता, कंपूमध्ये कुणी पाणी टाकलेले नाही, हे लक्षात आले, आणि कंपूबाजीवरील विश्वासच नष्ट झाला. =)) =)) =)) जबरा हाणलाय .... -- ( टारझन ऊर्फ खवीस )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
व
वेदनयन Tue, 08/05/2008 - 06:38 नवीन

छान वर्णन

अगदी छान वर्णन केलयस. अजुन येऊ देत. येतांना एकटाच आणी अखंड ये एवढीच अपेक्षा. १२ वर्षापूर्वी मी दक्षिण अफ्रिकेत गेलो तेव्हा असाच अनुभव आला होता. अर्थात काही फरक असणारच. केपटाऊन आणि जोहान्सबर्ग येथे सुमारे दोन वर्ष काढलित. केपटाऊन, क्रिकेट, रग्बी, क्रुगर नॅशनल पार्क, वाईन फार्मस, सन सिटी सगळेच अविस्मरणीय. आता अमेरिकेत अगदी विट आलाय तेच तेच बघुन; पण साहेब मनावर घेईल तर शपथ.
  • Log in or register to post comments
D
diggi12 Sun, 10/17/2021 - 01:03 नवीन

दोन्ही भाग मस्त झालेत.

दोन्ही भाग मस्त झालेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 10/18/2021 - 08:55 नवीन

छानच

टारझन यांचे मिपावरचे लेखन प्रथम वाचले असावे. मध्य आफ्रीकेतल्या लोकांबाबत व निसर्गाबाबतची निरीक्षणे उत्तमपणे मांडली आहे. लेखन वाचून मध्य आफ्रीकेला भेट द्यावीशी वाटत आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 10/18/2021 - 22:37 नवीन

ये की जाऊन

केनिया चे वाईल्ड लाईफ सुंदर आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा