माझी आजी
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
माझी आजी
माझी आजी जिने नुकतीच वयाची ९६ वर्षे पूर्ण केली. हि माझ्या वडिलांची आई ,तिच्यासाठी हा लेख .
गोदु आजी म्हटलं कि माझ्या मनात एक करारी व्यक्तिमत्व उभं राहत . लहानपणापासून आजीचा एक दरारा वाटत आला आहे .तिचं व्यक्तिमत्वच तसं आहे. तिचि या वयातही स्वतःची कामं स्वतः करण्याची सवय, वाचनाची आवड ,सतत कामात गुंतवून ठेवण्याची आवड सगळंच थक्क करणारं आहे . या वयातही तिने स्वतःला ताज तवानं ठेवलेलं आहे . आम्हा सर्व तरुण मंडळींसाठी ती एक मोठी प्रेरणाच आहे.
ती एक fighter आहे . Cancer बरोबरची लढाई तिने सहज जिंकली . आणि आम्हा सर्वांना एक सकारात्मक मेसेज दिला .
ती खूप चांगली manager आहे . सर्व नाती गोती तिने एका हाती सांभाळली . सर्वांना तिने एकत्र बांधून ठेवले.सुखाच्या दुःखाच्या प्रसंगांना हसत मुखाने सामोरी गेली . मला वाटतं ती जर आजच्या काळात जन्मली असती तर ती नक्कीच एखाद्या कंपनीची CEO असती .
ती आजी असली तरी ती पारंपारिक जुनाट विचारांची नाही . नवीन जुन्याची सांगड घालून काय उत्तम आहे ते ती करते . नवीन उत्तम विचार , नवीन आत्मसात करण्याची तिची प्रवृत्ती आहे . ती नवीन युगाची आहे . मुलीनी खूप शिकावं , नोकरी करून स्वतःच्या पायावर उभे राहावं यासाठी ती कायम ठाम राहिली .
अश्या माझ्या आजीला माझा प्रणाम . तिला उत्तम आरोग्य आणि आयुष्य लाभो हीच देवाजवळ प्रार्थना . तिच्यासाठी एक छोटीशी कविता .
आजी ग आजी
करतेस पुरणपोळी
मऊसूत तुझ्या हातापरी
चवदार इतकी
आठवली की
चव रेंगाळे जीभेवरी
तुझ्या ग गोष्टी
मोलाच्या किती
देई शिकवण जगण्यावरी
तुझी ग लढाई
जिद्द जिंकण्यापरी
देई उभारी आम्हासही …
प्रतिक्रिया
राखी
शुभेच्छा!
खूप धन्यवाद
राखीताई,
नक्कीच हि माझी कमतरता