किती हे शांत होते गाव ,जेव्हा मी नवा होतो
अता भेटीस मी आलो तुझ्या की गवगवा होतो
किती गावे इथे सूरात मी, पण दाद ना मिळते
किती केलास तू कल्ला तरीही वाहवा होतो
इशार्यावर इशारे ते कुणाचे सांगना होते
जरा मी हात धरला तर पराचा पारवा होतो
तुझ्यामाझ्यातला हा वाद आता सोडवावा तू -
जरा मी बोललो हलके तरीही वाढवा होतो
अता कळते, कशासाठी मला तू टाळले तेव्हा ..
तुला मी नेहमीसाठी तुझ्याजवळी हवा होतो
डॉ.सुनील अहिरराव
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2045
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर !
चांगलय . यावरुन आख्या कवितेची
मस्त
अहाहा काय मजेशीर दृष्य असेल
In reply to मस्त by मिसळलेला काव्यप्रेमी
ओ
In reply to अहाहा काय मजेशीर दृष्य असेल by ज्ञानोबाचे पैजार
(No subject)
@जरा मी बोललो हलके तरीही
छान!
परा आजकाल येत नाही इकडे ...