Skip to main content

पराचा पारवा होतो

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 05/05/2014 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
किती हे शांत होते गाव ,जेव्हा मी नवा होतो अता भेटीस मी आलो तुझ्या की गवगवा होतो किती गावे इथे सूरात मी, पण दाद ना मिळते किती केलास तू कल्ला तरीही वाहवा होतो इशार्यावर इशारे ते कुणाचे सांगना होते जरा मी हात धरला तर पराचा पारवा होतो तुझ्यामाझ्यातला हा वाद आता सोडवावा तू - जरा मी बोललो हलके तरीही वाढवा होतो अता कळते, कशासाठी मला तू टाळले तेव्हा .. तुला मी नेहमीसाठी तुझ्याजवळी हवा होतो डॉ.सुनील अहिरराव
लेखनविषय:

वाचने 2045
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

सुंदर ! आवडले.

चांगलय . यावरुन आख्या कवितेची एका वाक्यात वाट लावणारी गावाकडची म्हण आटवली . स्वतंत्र पुरुषविभाग नसल्यामुळे इथ देत नाय. इच्छुकानी व्यनी टाकावा.

मस्त कविता. अवांतरः बाकी पराचा "पारवा" अवतार किती मजेशीर असेल हा विचार आला आणि हसू आवरेना झालं.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

अहाहा काय मजेशीर दृष्य असेल ते. परा गुटरगुं गुटरगुं करत एखाद्या छतावर बसला आहे आणि छाती फुगवुन आणि पिस फुलवुन एका जागेवर गोल गोल फिरतो आहे. Parva

आवडली कविता