फंडे
लेखनविषय (Tags)
हिस्सार रोड रोहटक मधे लक्ष्मी प्रिसिजन नावाच्या नावाचा कारखाना आहे तिथे वसुलि साठी गेलो असता गुप्ता नावाच्या फायनांस मधल्या अधिका~याशी मैत्री झाली होति..
तो पण आपल्या सारखाच गप्पिश्ठ होता ..
गप्पा मारताना त्याने व्यवसायातले/व्यवहारातले ३ फंडे(सुत्र) सांगितले
१)साथि साथका पैसा पासका
२)देन सच लेन झुटी.
३)वोह सोना किस कामका? जो कान को काटे
म्हणजे असे...
१)साथि साथका पैसा पासका...म्हणजे..खरा मित्र तोच जो आपणास सुख दुःख्खात साथ देतो..तसे रामराम करणारे अनेक असतात..फेसबुकावर एक म्हण आहेच ना,,फेसबुकावर हजार मित्र बाहेर विचारत नाहि कुत्र..असे मित्र हाय बाय साठीच असतात..
पैसा पासका..म्हणजे जवळ जी रोकड आहे ति खरी आपली..एकाला उसने दिले लाख रु वा २ लाखाच येण आहे ते येई पर्यंत आपले नसते..खरा पैसा तोच जो आपल्या कपाटात असतो.
२)देन सच लेन झुटी...व्यसायात लेन देन चालुच असते..क्रेडिटर व डेटर यांच्या याद्या असतातच..आपल्या नियति बद्दल आपणास खात्री असल्याने आपण लोकांची देणी चुकवत असतो..वेळप्रसंगी कर्ज काढुन आपण ऋण मुक्त होत असतो...त्या मुळे "देन सच्चि".असते..पण समोरचा माल दिलेला डेटर कसा आहे व त्याची केंव्हा नियत फिरेल हे आपणास ठावुक नसते..त्या मुळे हातात पडे पर्यंत येणे हे कागदावरच असते..त्या मुळे "लेन झुटी" अशीच असते.
३)वोह सोना किस कामका? जो कान को काटे..जेंव्हा आपण एखादा व्यवसाय चालु करतो त्या वेळी भांडवला बरोबर भावनिक गुंतवणुक झाली असते..त्या व्यवसायावर आपली सामाजिक पत व प्रतिष्ठा जोडली गेलेली असते..पण काहि वेळा व्यवसायात खोट येते..कर्जाचा व देणेक~यांचा तगादा सुरु होतो..अश्या वेळी आपली भावनिक गुंतवणुक व समाज काय म्हणेल हे न बघता असा व्यवसाय कितिहि प्रिय असला तरी विकुन मुक्त व्हावे.त्यात अडकुन पडु नये..सोन्याचे कानात कितिहि सुंदर दिसत असले तरी त्याच्या वजनाने कानाची पाळी ओघळणार असेल तर असे कर्ण भुषण काढुन टाकलेलेच बरे
प्रतिक्रिया
फार छान!
होणारच हो ...खाली हात लौटेंगे