Skip to main content

चिंता

लेखक देशपांडे विनायक यांनी रविवार, 23/02/2014 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
''वंदनाला दोन दिवस फोन करत आहे पण ती उचलत नाही . mobile वर काहीच उत्तर येत नाहीये . तू जरा तिला फोन करून बघ ना. आणि मला कळव.'' मी केलेला फोन उचलला गे ला नाही तेव्हा वंदनाच्या मुलाला फोन केला . वंदना आणि तिचे यजमान कोकण ट्रीपला गेले असून दोन दिवसांनी येतील असे समजले . काही मित्र मैत्रीणीना चिंतेची मिळालेली झुळूक मग एका नियमाला जन्म देऊन गेली . '' कुणी गाव सोडून जाणार असेल तर एक दोन जणांना तरी details कळवायचे '' प्रदीपचा कालच message आला.तो आणि बायको मेहुण्याच्या कारने देवीच्या दर्शनाला तुळजापूरला जात आहेत .पठ्ठ्याने कार नंबरही कळवला . ''कारचा नंबर माझ्या जन्मसालाचा होता म्हणून लक्षात राहिला .'' शेजारचे तात्या तुळजापूरच्या देवीचा प्रसाद देताना सांगत होते मी वारंवार प्रदीपला फोन लावत होतो आणि बायकोची नजर चुकवत message मधला कार नंबर पहात होतो तात्यांचे कार अपघात वर्णन बायको ऐकत होती आणि मी प्रदीपचा आवाज ऐकण्यासाठी पुन्हा फोन लावत होतो
लेखनविषय:

वाचने 1484
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

मस्त