म्हातारी पण मेली आणि काळ तर कधीच गेला.......
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
खालील धागा हा तद्दन फालतु आणि विनोदी धागा आहे. मी स्वतः पण तो फारसा मनावर न घेता लिहीला आहे.भाऊ, जरी माझ्या लेखनकलेसाठी गुरु असले तरी, खालील लेखांत कुठलेही कूट नाही.मराठी भाषा हवी तशी वळवता येते आणि एकाच केथे कडे विविध नजरेने बघता येते.कथा लिहीणे हे लेखकाचे काम, तर कथेचा बोजवारा उडवणे हा वाचकाचा अधिकार आहे, मला मान्य आहे.जमेल तितका मायबोलीचाच वापर केला असल्याने, ज्यांना मिंग्लीश भाषाच आवडते आणि तीच जमते, त्यांनी हा लेख न वाचल्यास उत्तम.
===========================================================
माझ्या लहानपणी आमच्याकडे बरेच पाहुणे येत असत.काही खट्याळ तर काही नाठाळ.आता मुळात आम्ही टवाळ्,त्यामुळे असल्या नाठाळ आणि खट्याळ माणसांबरोबर आमचे जमायचेच.
साहजिकच असे ४ लोकांना जमवून कुठे जिलब्या, तर कुठे मक्याच्या लाह्या किंवा तत्सम पदार्थ खात खात आणि एकमेकांची खेचत आणि वेळ प्रसंगी एकमेकांना मदत करत करत आम्हा सगळ्यांची वाटचाल सुरु होतीच.रगेल आणि रंगेल माणसेच सभोवताली असल्याने, जीवनांत पैसा महत्वाचा की,माणसे? किंवा हजारी शाबसक्या महत्वाच्या की, सोनाराचे कान टोचणे महत्वाचे? हे असले निरुपयोगी प्रश्र्न आम्हाला पडत न्हवते.
छान चमचमीत जेवायला, वेळप्रसंगी लाळकाढू कोंबडी आणि सर्वांगाला त्रुप्त करणारे डुकराचे मांस पण आम्हाला वर्ज्य न्हवते.तसे शिक्रण आणि भेंडीची भाजी खायला पण आमची जीभ तयार होतीच.वेळ जायला आणि चार नाखट (नाठाळ्,खट्याळ आणि टवाळ) लोक जमवून कुठे भटकंती कर आणि फोटो काढ....कसे गेलो,काय बघीतले आणि मुख्यतः काय अनुभव आले आणि त्यातून काय धडे घेतले, हे कुटंबातील इतर लोकांना सांगायला आम्हाला संकोच वाटत न्हवता.
भटकंती आणि खादाडी, हा आमच्या ग्रुपचा एक अनुमोल ठेवा होता.कुटुंबातील काही सदस्य काम-शास्त्र-विनोदांत पण गर्क असायचे.कधीकधी आम्ही पण तिथे जावून त्या मंडळींमध्ये चालणारी चर्चा ऐकत असू.हे असे गाढे व्यासंग करायला जी साधना लागते ती आमच्या कडे न्हवती.ह्या मंडळींना खायला करून द्यायला आम्ही एका पायवर तयार होतोच.आम्ही त्यांना खायला घालावे आणि त्यांनी त्यांच्या पोतडीतले ज्ञान आम्हाला द्यावे असा साधा सरळ बिनखर्चिक मामला होता.
खवय्ये गिरीसाठी आमचे कुटुंब आमच्या मराठी भाषीक नगरांत फारच प्रसिद्ध झाले.(अरे हो, आमच्या नगरांत की नाही, विविध भाषीक लोक राहतात.अगदी चायनीझ,जापनीझ लिहीणार्यांपासून ते हिंदी,गुजराथी लिहीणार्यांपर्यंत.)काही काही मराठी कुटुंबातील इतर सदस्य पण आमच्या घरात येवून जायचे.मी पण कधी कधी त्यांच्या घरांत डोकावत असे, पण तिथे चालणार्या मालिकां वरच्या आणि कोंडाळे बनवून चालणार्या चर्चांत मला काही रस न्हवता.
(जाता जाता, एकदा मालिकांमध्ये काम करत असलेल्या एकाने, मला , माझे नांव विचारलेले, मला आठवत आहे.तो एक वेगळा किस्साच आहे.कधी पक्षीतीर्थाला जमलो तर नक्की सांगीन.)
अन्न्,वस्त्र आणि निवारा, ह्या जीवनावश्यक गोष्टी आहेत्,असे शाळेत शिकवलेले आमच्या लक्षांत आहे.कारण, शाळेत असतांना ..."जीवनावश्यक गोष्टी कुठल्या?" ह्या प्रश्र्नाचे उत्तर, मी "टी.व्ही. वरच्या मालिका, हिंदी सिनेमा आणि मोबाईल" असे दिले होते.
तर असा हा अन्नाचा ठेवा, पुढच्या पिढीला पण द्यावा ह्या उदात्त हेतूने आम्ही खायच्या पदार्थांच्या क्रुतीचे आणि ते समजायला कठीण जावू नये , शिवाय इतर लोकांना पण त्याचा आस्वाद घेता यावा म्हणून ते पदार्थ बनवतांना लागणार्या सामानाचे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे....तो पदार्थ नक्की कसा दिसतो,ह्याचे पण फोटो टाकायला सुरुवात केली.घरातील वडील-धारी मंडळींना पण आमचे कौतूकच वाटले.त्यांनी दिवाणखान्याच्या भिंतीवर पण आमच्या पदार्थांचे फोटो लावले.
आमच्या घरांतील माणसांना आमच्या ह्या उठाठेवीला काही आक्षेप न्हवता आणि ह्या अशा सुखी वातावरणाला आम्ही सगळेच नाखट सोकावलो होतो.थोडेसे मद्यपान आणि चमचमीत जेवण जेवले की थोडा-फार दंगा होणारच ना?
आता वयोमानानुसार आणि बदललेल्या राहणी मानामुळे घरातील काही जणांचे वजन मात्र वाढायला लागले.स्वतः व्यायाम करायचा नाही आणि कोपर्यावरच्या भाजीवाल्याकडून भाजी आणायला पण गाडी वापरायची,असे जीवन जगणार्या माणसांचे वजन वाढेल नाही तर काय? (शाळेत बरेच विषय शिकवत नाहीत.आता हेच बघा ना, वजन वाढू नये, म्हणून नक्की काय करावे? हे शालेय काळात न शिकवल्यामुळे बराच त्रास होवू शकतो.)
दैवाने करणी केली आणि त्याच सुमारास आमची दुरदेशी राहणारी मावशी आली.ही जरी मराठी असली तरी वरून इंग्रजी भाषेचा चांगला मुलामा दिला होता.एक-दोन तासांतच तिच्या लक्षांत आले, की इथल्या चमचमीत आणि बहारदार पदार्थांनी तिचे वजन नक्कीच १/२ मिली ग्रामने वाढणार.अशावेळी तिने जास्त न खाता किंवा बाहेरून जेवणाचे डबे मागवून गप्प बसावे ना?तिच्या डब्यातील एक-दोन पदार्थ आम्ही पण बघून ठेवले असते.आणि हे पदार्थ खायची वेळ येवू नये म्हणून परत दोन-चार गड जवळ केले असते.पण नशीबात हे असे होणे न्हवते.
पण त्या व्यक्तीने असे न करता.घरच्या वयस्क मंडळींची वजन-मापे घेतली आणि जाहीर केले की, तुमचे वजन वाढले आहे आणि आपले अनुमान सांगीतले की, हे असे पदार्थांचे बहारदार फोटो दिवाणखान्यात लावल्याने, तुमची भूक चाळवली जाते.तेंव्हा तुम्ही हे असे फोटो दिवाणखान्यात लावु नका आणि पदार्थ बनवतांना त्यांचे फोटो किंवा पदार्थ बनवल्या नंतरचे फोटो इतरांना दाखवू नका.
तेंव्हा पासुन आम्ही फोटो न काढता पदार्थ बनवतो आणि साबदाण्याची लापशी,मैद्याचा ब्रेड खावून संगणकावर खेळ खेळत बसतो.(म्हणजेच शुद्ध मराठीत, पीसी वर गेम एंजॉय, करतो).कंटाळा आला की रद्दड आणि भुक्कड सिनेमे बघत आणि मालिकांवर चर्चा करत दिवस दिवस बसून राहतो.असे जगतच मी मोठा झालो.
आता, चमचमीत आणि सणसणीत लाळगळू, जेवण न जेवता देखील माझे वजन मात्र वाढतच आहे.दिवाण्खान्यातील खाण्याच्या पदार्थांचे फोटो काढल्यामुळे भूक अधिकच चाळवली गेली आहे.ते फोटो आणि पदार्थांच्या बहारदार क्रुती बरेच दिवसांत न लिहील्यामुळे , ते बघायला आणि त्यावर होणार्या चर्चा ऐकायला येणारी पाहुणे मंडळी पण गेली कित्येक वर्षे आमच्या कडे आलेली नाही आहेत.
आज-काल आमच्या कडे रव्याची खीर आणि उकडलेले बटाटे संपवत-संपवत (अद्याप मला ह्यांचा आस्वाद घेता आलेला नाही.) "मी जातो.मी येतो" अशा मूक चर्चा होतात.
इतके लिहून, मी आता माझे मनोगत, कधीतरी माझ्या मित्रांसमोर, माझ्या मायबोलीतून, लिहून माझा तुर्तास एक उपक्रम संपवतो.
प्रतिक्रिया
मु वी
(नाखट) जेपी
तुमच्या दु:खात सहभागी आहे.
हा हंत हंत !
अरेरे.....
अरेरे! फार्र वाईट झालं....
खायला हरकत नाही... पण...
सुईनं होऊ शकणार्या कामासाठी
सोप्पा उपाय आहे .
इथेच तर तुमच्या सद्गुणांना वाव आहे.
अरेरे फार म्हणजे फारच वाईट अवस्था
खंग्री!