१६

अवन's picture
अवन in काथ्याकूट
22 Jul 2008 - 7:24 pm
गाभा: 

१६
हे काय आहे?

हा सरकारला टिकून राहण्यासाठी हवा असलेला कोणताही आकडा नाही किंवा गझलांमधली "बाली उमर" नाही.

तर आजपासून १६दिवसांनी चीन मध्ये ऑलिंपिक सुरू होणार आहे. चीन मध्ये प्रथमच एक आंतरराष्ट्रीय सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या स्पर्धेकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
चीन १९८४ मध्ये पहिल्यांदा ऑलिंपिक सामील झाला. त्यावेळी चीनने ३२ पदके मिळवली. तर मागच्या २००४च्या ऑलिंपिक मध्ये, ६३ पदके मिळवून दुसरे स्थान पटकावले. २० वर्षातली ही चीनची कामगिरी.

या उलट भारताची स्थिती आहे. २००४ मध्ये १, २००० मध्ये १ पदक.
याचे कारण काय आपल्याला काय वाटते?
समाजात क्रिकेट शिवायच्या खेळाबद्दलची असलेली अनास्था? खेळांमध्ये ही राजकारणी लोकांची ढवळाढवळ?

दुवा: उत्तर शोधायचे असेल तर google मध्ये "Indian Olympic Association" शोधून पहा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

22 Jul 2008 - 7:49 pm | विजुभाऊ

यालेखातुन कोणती बहुमोल माहिती मिळाली याची कृपया महिती द्यावी
अज्ञानी विजुभाऊ

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

ध्रुव's picture

23 Jul 2008 - 10:08 am | ध्रुव

सदर लेखन हे लेखकाने काथ्याकूट व्हावा या हेतुने टाकल्यासारखे वाटते. त्याचा माहिती मिळण्यासाठी उपयो होईलच असे नाही व दर वेळी कुठल्याही लेखनातुन माहिती मिळतेच असेही नाही. राग नसावा पण कदाचित अश्याने नवे लोक पुढच्या वेळी लेख टाकताना विचार करतील असे वाटते.

--
ध्रुव

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Jul 2008 - 12:58 am | llपुण्याचे पेशवेll

या लेखातून को णतीही उपयुक्त माहीती नाही मिळाली. पण लाज तर नक्कीच वाटली की माझा देश ऑलिंपिक मधे एकही पदक मिळवू शकत नाही आणि त्यासाठी मी काही करू शकत नाही याची.
पुण्याचे पेशवे

मराठी_माणूस's picture

23 Jul 2008 - 10:57 am | मराठी_माणूस

अतिरेकि क्रिकेट प्रेम हे एक कारण.

त्यातुन एखद्याने ऑलिंपिक मधे पराक्रम गाजवल तर काय होते ते वाचा http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3261567.cms

पक्या's picture

23 Jul 2008 - 1:20 pm | पक्या

>> यालेखातुन कोणती बहुमोल माहिती मिळाली याची कृपया महिती द्यावी
अज्ञानी विजुभाऊ

तुम्हाला नसेल हो मिळाली माहिती. म्हणजे असा अर्थ नाही की इतरांना मिळणार नाही. वरील वा़क्य नवीन सदस्यांना निरूत्साही करणारं वाटतय. लेख काथ्याकूट सदरात आहे म्हणजेच लेखकाचा सखोल माहिती पुरवणे हा हेतू नसून त्यावर चर्चा व्हावी हा आहे हे सरळ आहे.

>>दर वेळी कुठल्याही लेखनातुन माहिती मिळतेच असेही नाही
ध्रुव शी सहमत.

भारत ऑलिंपिक मधे एकही पदक मिळवू शकत नाही - क्रिकेट चे अति प्रेम , खेळातील राजकारण, खेळाडूंना आवश्यक अशा अत्याधुनिक सोयीसुविधांची कमतरता, खेळाडुंच्या प्रखर जिद्दीचा अभाव? .....आणखीही बरीच कारणे असतील.

येत्या ऑलिंपिक मध्ये भारतीय टीम ने चांगली कामगिरी करून देशाची शान वाढवावी अशी आशा करतो.

अनिल हटेला's picture

23 Jul 2008 - 2:29 pm | अनिल हटेला

चक दे इन्डीया तील कबीर आठवतो !!

आणी हॉकी सन्घटना !!!!

कसलही लॉजीक नाही ,प्लॅनीन्ग नाही !!

खेळाडू कडुन अपेक्षा तरी कशाची ठेवावी ?

असो...

जाणकाराकडून अधिक माहिती मिळेल अशी अपेक्षा करतो !!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

बाजीरावाची मस्तानी's picture

23 Jul 2008 - 3:03 pm | बाजीरावाची मस्तानी

अरेच्चा!...आम्हाला माहीतच नव्हते.....!......काय असते बरे हे ऑलिम्पिक?

जाणकार's picture

23 Jul 2008 - 4:26 pm | जाणकार

कोणच्याहि खेळात मागे पडले कि ते खेळाडु,त्यांच्या संघटना आणि काहि आपल्यासारखे तज्ञ नेहमिच क्रिकेट च्या नावानि शिमगा करतात,पण खरच सगळे खेळ क्रिकेट मुळेच मागे पड्ले कि त्यांना चालवणार्या संघटनांना आपल्या खेळाचे मार्केटिंग क्रिकेट वाल्यांसारखे निट आणि आक्रमक नाहि करु शकले म्हणुन मागे पडले हे कोणि विचारात घेत नाहित्,एका वेळेस क्रिकेट पेक्षा हॉकी लोकप्रिय होते आता हॉकी कुठे आहे आणि क्रिकेट कुठे आहे हे आपण पाह्तोच आहे.बाकि खेळांच्या संघटना कश्या आहेत हे सगळ्यांनाच माहिति आहे.
क्रिकेट चे अति प्रेम हे पण एक कारण आहेच पण आपल्या सगळ्यांना जो श्रिमंत तो वाइट हेच माहिति आहे.त्यामुळे चालु द्या क्रिकेट च्या नावनि शिमगा.

सुचेल तसं's picture

23 Jul 2008 - 4:34 pm | सुचेल तसं

जाणकार,

अतिशय मार्मिक प्रतिसाद.

http://sucheltas.blogspot.com

विकास's picture

23 Jul 2008 - 11:32 pm | विकास

गुगल वरील दुवा उघडून पाहीला आणि शरम वाटणे म्हणजे काय ते अनुभवले.

आपण आपली तुलना चीनशी करावी का एक मुद्दा होऊ शकतो.

ऑलिंपिक्समधे पदके न मिळायला कारण हे नष्ट चक्र आहे - या खेळात पैसे दिसत नाहीत म्हणून लोकांना असलेली अनस्था त्यात राजकीय व्यक्तींना त्यात काही पडलेले नाही म्हणून ते प्रोत्साहन देत नाहीत, म्हणून पैसे नाहीत, म्हणून...