✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जिजामाता उद्यान कट्ट्यासाठी सर्वांना सहकुटूंब आमंत्रण.....

म
मुक्त विहारि यांनी
Sat, 01/18/2014 - 21:18  ·  लेख
लेख
भायखळ्याचं जिजामाता उद्यान. जवळजवळ ५० एकर विस्तीर्ण परिसरावर दीडेकशे वर्षांपासून उभं असलेलं हे उद्यान मुख्यता प्राणिसंग्रहालय म्हणून प्रसिद्ध. इथे लोक येतात ते प्राणी-पक्षी बघायला. हल्ली तिथे फार थोडे प्राणी शिल्लक आहेत. मात्र प्राणिसंग्रहालय असलेल्या या उद्यानात अनेक दुर्मीळ आणि आगळेवेगळे वृक्षही आहेत, हे फार थोड्यांना माहीत असेल. हे एक समृद्ध बोटॅनिकल गार्डनच आहे. निसर्गाने फुलांच्या रूपाने रंगांची मुक्त उधळण केली की इथलं वृक्षवैभव जास्तच खुलून दिसतं. अगदी न चुकवण्यासारखी ही रंगपंचमी निसर्गवेडे दर वर्षी बघतातच. आता फुलोरा यायला सुरुवात झाली आहे, मग रसिक मिपाकरांनाही तो बघायला नक्कीच आवडेल, म्हणून हा ‘भटकंती कट्टा’. दिनांक : २६ जानेवारी २०१४ वेळ : सकाळी ९:३० ठिकाण : जिजामाता उद्यान , भायखळा येथील तिकीटाची खिडकी. साधारण वेळे नुसार कार्यक्रम. सकाळी १० ते ११:३० पर्यंत झाडांची माहिती घेणे. त्या दिवशी माटूंगा येथील "उडिपी श्रीक्रुष्ण बोर्डींग" ह्या हॉटेल मध्ये फीस्ट आहे.जवळ पास १६ ते १८ पदार्थ ते १६० किंवा १८० रु.त देणार आहेत.त्यांनी १२ वाजेपर्यंत यायला सांगीतले आहे.तेथे जेवून मग कट्ट्याचे विसर्जन करण्यात येईल.खर्च प्रत्येकाने आपला आपण करायचा आहे. दरवेळी आपण फक्त मिपाकरच भेटतो.ह्यावेळी आपण आपल्या कुटुंबासकट भेटू या. मी आणि माझी बायको मुले नक्की येत आहोत.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
13446 वाचन

💬 प्रतिसाद (81)

प्रतिक्रिया

येणार

लीलाधर
Sun, 01/19/2014 - 23:12 नवीन
कोणी काही म्हणो लील्या येणार म्हंजे येणार काय ओ वल्लीदा काय म्हणताय ?
  • Log in or register to post comments

लील्या सौ. वैनिना अनाहिताचे

अभ्या..
Sun, 01/19/2014 - 23:53 नवीन
लील्या सौ. वैनिना अनाहिताचे सदस्यत्व मिळाले का बे? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

नाही अजूण

लीलाधर
Mon, 01/20/2014 - 00:03 नवीन
मिळेल तेव्हा मिळेल णाही का? आणि काय कसा हैस ?
  • Log in or register to post comments

अजुन नाही ना? मग मिळाल्यावरच

अभ्या..
Mon, 01/20/2014 - 02:47 नवीन
अजुन नाही ना? मग मिळाल्यावरच कट्टा वगैरे बर का? तोपर्यंत निट संसार करा. आणि म्य़ा मजेत बघ. पार्टी कवा देणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

कोणता मी झेंडा घेऊ हाती हा

कंजूस
Mon, 01/20/2014 - 05:41 नवीन
कोणता मी झेंडा घेऊ हाती हा प्रश्न २६ जानेवरीला तरी येणार नाही . काही मुलांचे शाळेत झेंडावंदन असणार सकाळी .
  • Log in or register to post comments

मस्त!

संजय क्षीरसागर
Tue, 01/21/2014 - 13:48 नवीन
याला म्हणतात नांवाला जागणं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

नवीन सभासदाला सांभाळून घ्यावे

रोहन अजय संसारे
Mon, 01/20/2014 - 09:38 नवीन
मी या वेळी यायचे नक्की तारवले आहे. तरी विंनती कि सगळ्या मिपा कारानी नवीन सभासदाला सांभाळून घ्यावे.
  • Log in or register to post comments

कट्ट्याचे निमित्त प्रचंड

ऋषिकेश
Mon, 01/20/2014 - 10:57 नवीन
कट्ट्याचे निमित्त प्रचंड आवडले आहे. घरी कओंतुंबिक कार्यक्रम असल्याने येता येणार नाही. मात्र हे फुलोरे बघायाला एक मुंबईवाॠ नक्कीच करेन येत्या दोन-चार आठवड्यात. हा फुलोरा असतो कधीपर्यंत?
  • Log in or register to post comments

उशीरा फुलतो.

राही
Mon, 01/20/2014 - 12:47 नवीन
राणी बागेत ऊर्वशी (Amherstia Nobilis) हा एक दुर्मीळ असा छोटा वृक्ष आहे. त्याची फुले अत्यंत सुंदर दिसतात. पण तो बहुधा मार्चमध्ये फुलतो. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

अ‍ॅमहर्स्टिया

सुधांशुनूलकर
Mon, 01/20/2014 - 13:58 नवीन
उद्यानात दोन अ‍ॅमहर्स्टिया आहेत. दोन्ही सध्या फुलले आहेत.
पण तो बहुधा मार्चमध्ये फुलतो.
तो जानेवारी-फेब्रुवारीत फुलतो. सर्वांचाच, सुधांशुनूलकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

होय.दोन आहेत

राही
Mon, 01/20/2014 - 15:10 नवीन
फुलला आहे का? वा छानच. वृक्षवेड्यांसाठी ही एक बातमी आणि पर्वणीच आहे. राणी बागेत गेल्या काही वर्षांत मूळ झाडापासून दुसरे रोपटे तयार करून लावलेले आता चांगले तराराले आहे. बियाही क्वचित रुजतात असे गूगलवर आहे. मागच्या वर्षी एका वृक्ष-निरीक्षणभेटीदरम्यान एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यातही तुरळक फुले होती तेव्हा आमच्या मार्गदर्शकांनी तो मार्चमध्ये चांगला फुलतो असे सांगितले होते. अर्थात हवामानानुसार बहराचा काळ थोडा मागेपुढे होतोच. गेल्या वर्षी नोवेंबरमध्ये उत्तर बंगालात पेल्टोफोरम वेड्यासारखा बहरलेला पाहिला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधांशुनूलकर

वृक्षांचे फोटो टाकाल का?

यशोधरा
गुरुवार, 01/23/2014 - 09:26 नवीन
वृक्षांचे फोटो टाकाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधांशुनूलकर

नाही !!!

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 01/23/2014 - 11:56 नवीन
नाही !!! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

वा मु.वि. साहेब मान गये आपको.

प्रमोद देर्देकर
Mon, 01/20/2014 - 13:02 नवीन

मुला बरोबर शाळेत झेंडावंदना साठी जायचे आहे, नाहीतर सह़कुटूंब आलो असतो. कट्ट्याला हार्दिक शुभेछा.

अवांतरः- आयला लय भारी हां! त्यांनी आत्ता पर्यंत जेवढे कट्टॅ काढले तेवढे सगळे कट्टे यशस्वी करुन दाखवले आहेत. (ए कोण रे तो म्हणतोय की मु.विं.ना सं.पा.मं.ने कट्टा नियोजन अधिकारी करुन टाकावे. ( आमचे ही अनुमोदन))

  • Log in or register to post comments

प्रयत्न केल्या जाईल !!

सूड
Mon, 01/20/2014 - 14:29 नवीन
प्रयत्न केल्या जाईल !! गुरुवारपर्यंत काय ते फायनल कळवतो.
  • Log in or register to post comments

काही अपरिहार्य कारणास्तव येणे

सूड
गुरुवार, 01/23/2014 - 14:23 नवीन
काही अपरिहार्य कारणास्तव येणे शक्य होत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

नक्की

प्रसाद गोडबोले
Mon, 01/20/2014 - 14:49 नवीन
या वेळेला नक्की भेटुया !! :)
  • Log in or register to post comments

अरे वा..

स्वाती दिनेश
Tue, 01/21/2014 - 13:36 नवीन
कट्ट्याचे निमित्त आवडले, शुभेच्छा! स्वाती
  • Log in or register to post comments

कट्ट्यासाठी शुभेच्छा.

सन्दीप मुम्बई
Tue, 01/21/2014 - 15:17 नवीन
राणीबाग जवळची हॉटेल पर्शिअन दरबार - नॉन वेज खास करून बिर्याणी Gloria हॉटेल - इराणी हॉटेल - चिकन बिर्याणी व पाणी काम चहा , सकाळी खिमा - नाष्ट्या साठी उत्तम ( my Fav ) भायखळाबेकरी - केक ,पुडिंग , बन मस्का , प्याटीस. किंवा taxi ने सरळ माटुंगा गाठ , १० मिनिटात पोहचाल ,( नवीन उड्डाणपुल) -संदीप
  • Log in or register to post comments

रिगल ब्रेकरी

सचिन तेली
गुरुवार, 01/23/2014 - 01:02 नवीन
रिगल ब्रेकरी म्हनायचे आहे का तुम्ह्हाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्दीप मुम्बई

रिगल ब्रेकरी

सन्दीप मुम्बई
गुरुवार, 01/23/2014 - 13:23 नवीन
पर्शिअन दरबार शेजारी भायखळा बेकारी व palace सिनेमा शेजारी , स्टेशनाला लागून रिगल बेकारी - दोन्हीही उत्तम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन तेली

याच उद्यानात डॉ भाऊ दाजी लाड

खटपट्या
Tue, 01/21/2014 - 22:57 नवीन
याच उद्यानात डॉ भाऊ दाजी लाड संग्रहालय सुद्धा आहे. पण बराच वेळ लागेल.
  • Log in or register to post comments

ज्यांना यायचे आहे, त्यांनी खालील व्यक्तींना व्य.नि. करावेत...

मुक्त विहारि
गुरुवार, 01/23/2014 - 09:37 नवीन
१. सुबोध खरे २. सिधांशू नुलकर ३. मुक्त विहारि ४. अजया
  • Log in or register to post comments

अरे, महापालिकेचे फळे आणि

काजुकतली
गुरुवार, 01/23/2014 - 15:34 नवीन
अरे, महापालिकेचे फळे आणि वृक्ष्जांचे प्रदर्शन पार पडले काय? यावर्षी लवकर ठेवले. २४-२६ जान किंवा फेब्रुअवारीचा पहिला आठवडा असे आयोजन अस्ते नेहमी. मला जायचे होते, यावर्षी चुकले. ज्यांना फुलोरा पाहण्यात रस आहे त्यांचा १०-११.३० या वेळेत माहितीसकट फुलोरा पाहुन होणार नाही. मी अनेकदा गेलेय फुलोरा पाहायला. आणि १० वाजता सुरू करुन आम्हाला १ ते २ वाजलेत बाहेर पडायला.
  • Log in or register to post comments

अहो मग तुम्ही येऊन आम्हाला

सुबोध खरे
Sat, 01/25/2014 - 20:40 नवीन
अहो मग तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करा की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काजुकतली

येणे शक्य नाही! कट्ट्याला

अजया
गुरुवार, 01/23/2014 - 16:42 नवीन
येणे शक्य नाही! कट्ट्याला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

ओह! सध्या मुंबईत असूनही २६ ला शक्य नाही.

किलमाऊस्की
Sat, 01/25/2014 - 22:05 नवीन
:-( कट्ट्याचे निमित्त आवडलं. प्रचंड इच्छा असूनही २६ ला शक्य नाही. कट्ट्याला शुभेच्छा! १ फेब, ते १४ फेबच्या मधे कधी झाला कट्टा तर नक्की कळवा.
  • Log in or register to post comments

@हेमांगीके मॅडम....

मुक्त विहारि
Sat, 01/25/2014 - 22:37 नवीन
व्यनि केला आहे. "अजया" ताईंच्या उत्तराच्या अपेक्षेत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किलमाऊस्की

यायचं होतं ...पण शक्य नाहि,

जोशी 'ले'
Sat, 01/25/2014 - 23:52 नवीन
यायचं होतं ...पण शक्य नाहि, कट्ट्याला शुभेच्छा
  • Log in or register to post comments

छान. समजा काही पक्षी प्राणी

शिल्पा ब
Sun, 01/26/2014 - 05:53 नवीन
छान. समजा काही पक्षी प्राणी असलेच तर त्याचे फोटोही टाका नंतर.
  • Log in or register to post comments

खुप प्रयत्न करुनही नाही जमलं.

शैलेन्द्र
Sun, 01/26/2014 - 10:45 नवीन
खुप प्रयत्न करुनही नाही जमलं.. नेमकं पुण्याला यायला लागलयं आज.. :(
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा