तसा कविता हा माझा प्रांत नाही. फार्फार वर्षांपूर्वी कोणे एके काळी लिहिलेली ही कविता आज जुने कागद धुंडाळताना समोर आली. म्हटले टाकूया मिपावर. होऊ द्या खर्च, मिपा आहे घर्चं :)
तुझ्यासाठी,
आकाशातील नक्षत्रे काही
मी खूडून आणणार नाही
कारण मला हातच नाहीत
पायपीट करणार नाही
सातासमुद्रापलिकडिल सुवर्णकमळासाठी
कारण मला पायच नाहीत
तुझे उखाणे, तुझी कोडी
गोडगोड लाडीगोडी
अय्या आणि इश्श्य् गडे
मला आहे समजणार थोडे(च) ?
कारण मला डोकेच नाही
नाक नाही श्वासाकरिता
धुंदावणाऱ्या गंधाकरिता
कान नाहीत नादाकरिता
जीभ नाही स्वादाकरिता
हुरहुरणारे स्पर्श नाहीत
रंगाकरिता डोळे नाहीत
मुळी काही काहीच नाही
मात्र असे खास नाही
पोट माझे आहे खासे
छान आणि छोटेसे
खपाटिशी पोचेसे
त्याला मात्र सगळे आहे
दोन हात, दोन पाय
आणि आहे डोकेसुद्धा
सुरकुतलेल्या मेंदूसकट
कान, नाक, डोळे आणि
डोळ्यातले त्याचेच पाणी
श्वास त्याचा, भास त्याचा
नित्याचाही घास त्याचा
सर्व काही त्याला आहे
असे मात्र खास नाही
त्यालाही माझ्यासारखे
मात्र एक हृदय नाही
नसणारच म्हणा
हृदय थोडेच पोटात असते?
ते तर असते छातीत
आणि ती छाती
आहे कोण्या लेकाला?| लेखनविषय: |
|---|
वाचने
3747
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
जियो .....
झक्कास!
छान आहे....
मस्त
जमलीय की !
धन्यवाद !
In reply to जमलीय की ! by सुहास..
कविता आवडली.
धन्यवाद !
अहा!
सुंदर
कविता आवडली.
जगप्रवासी साहेबांचा अजून एक
कविता आवडली. काहीशी अपेक्षित
chhaan.
पोटकेंद्रित कविता. स्वत्व
धन्यवाद !
In reply to पोटकेंद्रित कविता. स्वत्व by arunjoshi123
आवडेश !
छान
धन्यवाद !