Skip to main content

सामान्य

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 04/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
तसा कविता हा माझा प्रांत नाही. फार्फार वर्षांपूर्वी कोणे एके काळी लिहिलेली ही कविता आज जुने कागद धुंडाळताना समोर आली. म्हटले टाकूया मिपावर. होऊ द्या खर्च, मिपा आहे घर्चं :) तुझ्यासाठी, आकाशातील नक्षत्रे काही मी खूडून आणणार नाही कारण मला हातच नाहीत पायपीट करणार नाही सातासमुद्रापलिकडिल सुवर्णकमळासाठी कारण मला पायच नाहीत तुझे उखाणे, तुझी कोडी गोडगोड लाडीगोडी अय्या आणि इश्श्य् गडे मला आहे समजणार थोडे(च) ? कारण मला डोकेच नाही नाक नाही श्वासाकरिता धुंदावणाऱ्या गंधाकरिता कान नाहीत नादाकरिता जीभ नाही स्वादाकरिता हुरहुरणारे स्पर्श नाहीत रंगाकरिता डोळे नाहीत मुळी काही काहीच नाही मात्र असे खास नाही पोट माझे आहे खासे छान आणि छोटेसे खपाटिशी पोचेसे त्याला मात्र सगळे आहे दोन हात, दोन पाय आणि आहे डोकेसुद्धा सुरकुतलेल्या मेंदूसकट कान, नाक, डोळे आणि डोळ्यातले त्याचेच पाणी श्वास त्याचा, भास त्याचा नित्याचाही घास त्याचा सर्व काही त्याला आहे असे मात्र खास नाही त्यालाही माझ्यासारखे मात्र एक हृदय नाही नसणारच म्हणा हृदय थोडेच पोटात असते? ते तर असते छातीत आणि ती छाती आहे कोण्या लेकाला?
लेखनविषय:

वाचने 3747
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

एक्का साहेब. हि तर माझीच व्यथा मांडलीत. सुंदर लई भारी.....

सामान्यांची व्यथा, योग्य शब्दांत मांडलीत,

आवडली. (आणि म्हणे कविता माझा प्रांत नाही. कायतरी लोकं एकएक)

जमलीय की ! (नुकतेच वयात येताना केली होती का की प्रेमात पडल्यावर ;) हे आमचे येडेचाळे http://misalpav.com/node/19918 )

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे धन्यवाद !

मस्तच की! फार जुनी असणार!!

जुनी असो किंवा नसो, सार्वकालिक आहे. कोवळ्या वयात रचली असेल तर वयाच्या मानाने परिपक्व आहे.

In reply to by arunjoshi123

जेव्हा कविता केली तेव्हा जे डोक्यात आले ते खरडले. कोणते केंद्र अथवा दिशा घेऊन कविता कशी काय करतात ते अजून कळले नाही :( असो. मात्र आता इतके नक्की सांगू शकतो की, "सर्व मानवजातीच्या गेल्या २ लाख वर्षापासून आजपर्यंतच्या" आणि "प्रत्येक मानवाच्या जन्मापासून मरणापर्यंतच्या" वाटचालीत पोट (भूक) आणि सुरक्षा या कायमच्या प्राथमिक गरजा राहिल्या आहेत. म्हणजे त्याबाबतित माणूस अजून जेथे होता तेथेच आहे. मात्र कोणत्याही गरजेची खात्रिची सुरक्षा मिळाली की माणूस तिचे महत्व विसरतो... हाही मनुष्यस्वभावच !

पहिले प्यार-व्यार की कविता :) वाचतांना मजा आली. -दिलीप बिरुटे

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे धन्यवाद !