इतकेच मला जाताना...
(भटसाहेबांची जोरदार क्षमा मागून...)
इतकेच मला जाताना घर सोडून कळले होते
सजणाने केली सुटका, नवर्याने छळले होते
लांबवलेल्या पैशांचा, मधुचंद्र गडे उरकू या,
मी दागदागिने घरचे, पिशवीत टाकले होते
मी ऐकवली दुनियेला माझी सगळी रडगाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते
याचेच हसू आले की, दारू देता नवर्याला
मी औषध जुलाबाचे ग्लासात मिसळले होते
प्रेमिक माझा शोधाया मी भलती वणवण केली
जे दार खुले दिसले ते, तुझ्या बंगल्याचे होते
मी एकटीच त्या रात्री गच्चीवर जागत होते
मी पळून गेले तेव्हा सासरचे घोरत होते...
जल्लां!
>>>प्रेमिक माझा शोधाया मी
(No subject)
विडंबन आवडलं