Skip to main content

दुचाकी विकत घेण्यासाठी मदत हवी आहे

लेखक खटपट्या यांनी बुधवार, 18/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मैत्रीण पुण्यामध्ये शिक्षणासाठी वास्तव्यास आहे. ती उत्तर भारतीय असून तिला पुण्यातील काहीही माहिती नाही. तिला जुनी स्कुटी विकत घेण्यासाठी पुण्यातील मिपाकरांची मदत हवी आहे. पुण्यातील कोणा मिपाकराला जुनी स्कुटी विकायची असल्यास कृपया व्यनि करा. जुनी दुचाकी विकत घेताना काय कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात या बद्दल माहितीची अपेक्षा. पुण्यात जुन्या दुचाकीची दुकाने कोणाला माहिती असल्यास पत्ते कळतील काय ?

वाचने 4506
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

होय ते तर करेनच पण त्याही आधी आपल्या माणसांकडून काही मदत मिळाली तर बरे

खरडफळ्यावर टाकायचा मजकूर आहे हा. मुख्य फलक आणि खरडफळा ह्यात कांहीतरी फरक असवा.

In reply to by खटपट्या

>>>>पुढच्या वेळेला काळजी घेईन. धन्यवाद खटपट्या. मी पुण्यामुंबईत राहात नसल्याने कांही कल्पना नाही. पण 'सकाळ' ह्या दैनिकातील 'छोट्या जाहिराती' तपासल्यास कदाचित कांही माहिती मिळू शकेल.

हो मलाही माहीती हवी आहे. पण मला जुनी होंडा युनिकॉअर्न किंवा शाइन हावी आहे. जर मुम्बैकर मी.पा.कर विकाणारे कोणी असतील तर तसे सुचवावे. धन्स

In reply to by प्रमोद देर्देकर

दर्दुकाका... सॉरी सॉरी पम्याराव आधी तुमचा तो गरुड उडवा. उडवा पक्षी...अर्र पक्षी म्हणजे म्हणजे.. उडवा म्हणजे आकाशात नव्हे. डिलीट करा. तुमची विचारझेप शब्दातून जाणवतेय परत बोधचिन्ह कशाला? लैच डिस्टर्ब पण करतोय वाचताना. ;)

पेठकर काकांशी सहमत . आजकाल अश्या मदतीसाठी धागे काढणारे वाढलेत .

शिर्षक वाचुन वाट्ल आता मिपाकरांवर वर्गणी काढायची वेळ येतेय की काय ?