✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शेअर मार्केट आणि मी.

ज
ज्ञानव यांनी
Mon, 12/09/2013 - 12:12  ·  लेख
लेख
वास्तविक शेअर मार्केट हा सगळ्यांचा वादाचा, समज - गैरसमजाचा असा विषय आहे. पण मला कळलेले मार्केट (जे प्रत्येकाचे वेगवेगळे असणार कारण ते चक्रधर स्वामींच्या दृष्टांतासारखे आहे. )थोडेसे असे की ज्यात दोन प्रकारचे पैसे कमावण्याचे मार्ग लोक ढोबळपणे अवलंबतात. अत्यंत किचकट ट्रेडिंग प्रणाली पासून लांब राहून मी माझे काही ट्रेडिंग आणि गुंतवणुकीचे साधे प्रयोग केले ते हि मांडतो आहे. तर १) गुंतवणूक योग्य मार्केट २) ट्रेडिंग योग्य मार्केट. दोन्ही पद्धतीच्या मार्केट मध्ये अभ्यास हा अपेक्षित आहे. म्हणजे जेव्हा मी बाजारात जाऊन वांगी घेऊन येतो तेव्हा ती खराब निघतात आणि बायको बदडून काढून माझ्या पाठीचे भरीत करते. आता तुम्ही म्हणाल की बाजारात वांगी खरेदी करणे आणि एखादा शेअर खरेदी करणे सारखेच का? तर मी म्हणेन होय कारण इथे सुद्धा दोघे आहेत एक विकणारा आणि एक घेणारा. आता घेणारा जर मी असेन जो फारसा कधीही बाजारात जाऊन भाजी घेत नाही आणि घेणारी माझी बायको असेल जी रोज बाजारात जाऊन भाजी खरेदी करते तर विकणारा जो एकाच जागी कित्येक वर्ष बसून भाजी विकतोय तो तुम्हाला लगेच ओळखतो की हा बकरा चांगला आहे आणि त्याची ना खपणारी वस्तू तो तुमच्या गळ्यात मारतो पण बायको हा प्राणी जगात फार हुशार असतो (ती नावारासुद्धा एका नजरेत जोखते हो !)ती भाजी बरोबर पाहून, भाव करून घेते मी भाजीवालीकडे पाहून(हे फार महत्वाचे आहे बरे का!) भाजी घेतो. थोडक्यात मी ज्या चुका तिथे करतो त्याच सर्वत्र करत फिरत असतो त्याला अपवाद एकाच प्रांताचा ज्या प्रांतात मी मुरलेलो आहे. तिथे मला कुणी फसवू शकत नाही (आणि इथे सगळे क्रेडीट मला बर का. आणि तिथे मात्र भाजीवालीने फसवले हो...हल्लीचे भाजीवाले...आणि स्वातंत्रपूर्व काळात वगैरे गप्पा मारायला मी मोकळा ) तर जी गत भाजीवालीकडे तीच शेअर मार्केटमध्ये. कुणीतरी मला सांगितले हॉट टीप आहे आणि मी घेतले शेअर्स आणि नंतर आपटला की हो शेअर!! झाले मग मार्केट कसे वाईट माणूस कसा फसतो जु गा र आहे जू गा र ..वगैरे वगैरे मग मार्केट मध्ये टीप येते ती हॉट असते तरी मला का मिळत नाहीत पैसे : - ह्याचे विवेचन नको का करायला. मुळात टिप्स ह्या ब्रोकर,ओपेरेटर (च्यायला म्हणजे काय आणि नवीन ?!!) जनरेटेड असतात. म्हणजे मार्केट जर कंपनीच्या आर्थिक निकषांवर चालत असते तर त्यात चढ उतार (आणि आपल्याकडे जरा जास्तच चढ उतार) आलेच नसते किंवा फारतर जेव्हा कंपन्याचे आर्थिक निकाल जाहीर होतात तेव्हाच ते चढ उतार झाले असते. मग हे गुजराती (पिढ्यानपिढ्या) कमावतील कसे ? मग एखादा शेअर जमा करून ठेवायचा असेल तर मार्केटमध्ये वाईट बातमी सोडायची ती बातमी पूर्वी कर्णोपकर्णी पसरत असे आता सी एन बी सी आणि तत्सम तज्ञ आहेत ते करायला तर आपण कुठे होतो हं वाईट बातमी सोडायची आणि सामान्य माणसाला शेअर्स विका म्हणून सांगायचे (मग त्यांनी विकले ते घेतात कोण?) जेणे करून शेअर्स गडगडले पाहिजेत आता हे गडगडणारे शेअर्स एकट्याने घेणे शक्य नाही मग ग्रुप करून विकत घ्यायचे (इथे हि अनेक प्रकार आहेत) आणि आपला पूर्ण पैसा त्यात लागला की मार्केट मध्ये चागल्या बातम्या सोडायच्या आणि खरेदी करा म्हणून सांगायचे हे करत असतानाही त्यांची गणिते असतात म्हणजे किती रुपये किती काळ गुंतून पडणार आहेत त्यावर किती व्याज मला द्यावे लागणार आहे त्यानुसार शेअरचा भाव ठरलेला असतो त्या भावापर्यंत शेअर पळवत नेला कि लोकांनाही त्या शेअरबद्दल विश्वास निर्माण होतो आणि जिथे हि मंडळी बाहेर पडणार तिथे तुम्ही आम्ही आत जाण्यासाठी धडपडतो. ह्या सगळ्यांचे प्रतिबिंब ग्राफ्सद्वारे मांडले जाते पण पडद्यामागचे खेळ सामान्य लोकांपुढे न ठेवता त्याला सपोर्ट-रेझिस्टन्स अशी नावे दिली जातात आणि आणखीन गुंगवले जाते. हे सगळे अतिशय जवळून पाहिले असल्याने आणि पार मार्केट रिंग मध्ये काम केल्याने हे खेळ करणाऱ्याबद्दल मनात राग ठासून भरलेला आहे.(निधड्या छातीचा मराठी मुठी आवळणे आणि रागावणे हेच करू शकतो) पण सर्व अर्थशास्त्र आणि अर्थ क्षेत्र हे मारवाड्यांच्या (होय गुजरात्यांच्यातर अजीबात नाही )हातात का आहे? त्यांच्याकडे पैसे आहेत रे ?आरे मग माझ्या कडे का नाहीत ? तीर्थारुपानी ठेवले नाहीत काय करणार ?आपल्या रक्तातच नाही काय करणार ? शेअर्स असोत कि मेटल असो किंवा रियल इस्टेट असो.सर्व मारवाड्यांच्या हातात. पण त्यांच्यात राहून मी एक शिकलो कि आपण अभ्यास करतो ते हि अभ्यास करतात पण ते करतात तो वेगळा अभ्यास (ज्याच्या कडे मी काम केले तो तर मला हिणवून हिणवून सांगायचा तू बी कॉम मी आठवी जेमतेम पण मी बघ आणि तू बघ....पण त्यानेच बरेच हिंडवले मला मार्केटमध्ये अर्थ क्षेत्राची ओळख करून दिली वाणिज्य म्हणजे नुसतेच अकाउंटीग नाही रे हे मला शिकवले ) मी करतो ती खर्डेघाशी. मग इकडचा लाडू तिकडे करताना पडणार्या पाकळ्या खाऊन जगलेल्या कैद्याची गोष्ट मला आठवते. तेव्हा आपणही तेच करायचे ठरवून मी ट्रेडिंग आणि गुंतवणूक ह्या दोघांची सांगड घातली. इथे येऊन माझा प्रवास सुरु झाला की गुंतवणूक योग्य मार्केटमध्ये ट्रेडिंग योग्य मार्केटमधून पैसे कमवायचे आणि गुंतवत राहायचे. आता मी जी पद्धत अवलंबली त्यात पैसे हळू हळू मिळतात कारण मी ही मराठीच सुरक्षितता आधी. मग नवीन नवीन सुरुवात करणार्यांसाठी कशी सुरवात करावी किती पैसे लावावेत ? हे प्रश्न येतात (वास्तविक लावावेत असे विचारल्यावर विचारणार्याची मानसिकता कळते कि आज तंगडी येणार कि बंगला ह्या पद्धतीने तो मार्केट कडे हि जुगार म्हणूनच बघतोय मग त्याला सांगावे लागते "बाला ! जल्ला कवरे लाऊ नाय रे कवरे गुंतवू म्हण हं ) तर त्यावर माझे उत्तर हे की तुझ्याकडचे पैसे १० वर्ष अडकून पडले तरी चालतील असे असतील तेवढे लाव किंवा भरपूर असतील तर तुझी उद्दिष्टे वगैरे ठरवून त्याप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने गुंतव. तुमचे पैसे ठरले आता शेअर्स कोणते घेऊ? शेअरची निवड करण्याआधी सेक्टर, इंडस्ट्रीजवगैरे समजून घ्या म्हणजे फार्मा सेक्टर,बँक सेक्टर वगैरे नंतर त्यातल्या कंपनीज. मला विचारले तर (म्हणजे होमियोपाथकडे जाऊन मी कुठली मुळी चोखाल्यावर बरे वाटेल हो....चुकतय हो ) मी म्हणेन बँक हा सेक्टर बेस्ट कारण तिथे जोखीम इतर कंपनींच्याबाबतीत असलेल्या जोखमीपेक्षा कमी असते. (मी फार ढोबळपणाने इथे हे लिहितोय ह्यावरचे विवेचन मी नंतर करीनच ). पण एखादा माणूस फार्मा सेक्टर मध्येच कामाला असेल किंवा ज्या सेक्टर मध्ये कामाला असेल त्याच सेक्टरचा विचार त्याने करावा कारण त्याला त्यात अधिक माहिती असण्याचा संभव आहे. मी वाणिज्य म्हणजे व्यापार करणार आणि व्यापाराच्या खेळात लहान असल्यापासून बँक बनून बाजूला बसणेच आवडत आले आहे.(दुसर्या शब्दात महाआळशी प्राणी ) आता एखादी बँक ठरली तर थोडा अभ्यास करा कसला ? किमतीतले चढ उतार कमीत कमी गेल्या ३ महिन्यांचे आणि....... १) जर १० शेअर्स घेणार असाल तर २ च घ्या आणि हळू हळू घेत १० पूर्ण करा आणि लिहून ठेवा कितीला पडले ते म्हणजे ब्रोकरेज वगैरे सगळे मिळवून उदा. रु. १०० ला एखादा शेअर घेतला तर १००*१० = १०००/- आता ह्यच्या १०% शेअर्स सरळ डीमेट करा म्हणजे ९ राहिले आता १०००/९ = १११ भाव आल्यावर तुम्ही ९ शेअर्स पूर्ण विकून टाका जमलेला १ शेअर तुमच्याकडे नाहीच असे समजून डीमेटला पडला राहू देत जेव्हा जेव्हा डीमेट स्टेटमेन्ट येईल तेव्हा तो त्यातला फक्त आणि फक्त प्रोफीटच दाखवेल. जर भाव १११ आलाच नाही तर...तर तुमचा अभ्यास कमी पडतोय. अभ्यास वाढवा हेच त्याला उत्तर आहे. आणि जरी १११ ला भाव नाही गेला तरी शेअर्स लाभांश देईलच म्हणून थांबू शकता त्याचा दुष्परिणाम म्हणजे ट्रेडिंग बंद. (पुन्हा स्वातंत्र्योत्तर काळात......सुरु ) २) रोज एका बँकेचा एकाच शेअर घ्या त्यासाठी भाव पाहू नका, अभ्यास करू नका आणि वर्ष संपल्यावर किंवा चांगला परतावा मिळेल (३६% वर्षाला....मारवाडी म्हणतो )तेव्हा बाहेर पडा. ३) आता जानेवारी ते मे सुगीचा काळ आहे मिळणाऱ्या लाभांशावर नजर ठेऊन आणि आपले भांडवल लक्षात घेऊन थोडा अभ्यास करून लाभांश देणारे शेअर्स घ्या आणि येणारा लाभांश परत त्याच कंपनीत गुंतवत राहा. (माझा १४ वर्षाचा मुलगा हेच करतो आणि लाभांशाच्या रुपात पैसे पासबुकात वाढलेले दिसले कि जो आनंद मी त्याच्या चेहऱ्यावर पाहतो तो अवर्णनीय आहे.) मला माहित आहे वरील लिखाण त्रोटक आहे.विस्तृत आता खाली प्रतिसादाद्वारे होईलच.... (ढिशक्लेमर : वरील लिखाण ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. प्रेमभंग झालेल्यांनी....म्हणजे मार्केट मध्ये पोळलेल्यानी लांब राहावे किंवा बोध घ्यावा )
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
अर्थकारण
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
43693 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

हल्लीच्या संगणक युगात,

प्रसाद१९७१
Mon, 12/16/2013 - 17:43 नवीन
हल्लीच्या संगणक युगात, आर्बिट्रेज च्या संधी मिळत नाही. जो काही थोडा फरक दिसतो तो सगळा ब्रोकरेज मधे जातो. ब्रोकर लोकांना जमत असेल कारण त्यांना ब्रोकरेज नसते ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नक्कीच.

ज्ञानव
Mon, 12/16/2013 - 16:45 नवीन
श्री चिदंबरम कृपेने आज अनेक अडचणीही आहेत पूर्वी मी स्वतः जोब्बिंग मध्ये १५-२० प्रती शेअर नफा काढलेला आहे पण एस टी टी , महाराष्ट्र सरकारचे tax ह्याने मार्जिन कमी होत गेले. तेव्हा, मी फक्त वरील प्रश्नाला उत्तर म्हणून काही मार्ग सांगितले होते. पण कमोडीटी मध्ये आर्बिट्रेजला भरपूर वाव आहे आम्ही सिंडीकेटने(हा हि बदनामच आहे शब्द) मसाल्यात आर्बिट्रेज केलेले आहे. फ्युचर्सचे वाटेला मी आजतागयात गेलेलो नाही त्यामुळे आणि अ‍ॅझम्प्शनवर काम करू नये कारण इक्विटी म्हणजे काही "लॉटरी" नाही. नाहीका?
  • Log in or register to post comments

धन्यवाद सर. प्रश्न इतकाच होता

बॅटमॅन
Mon, 12/16/2013 - 17:35 नवीन
धन्यवाद सर. प्रश्न इतकाच होता की जे वाचले आहे त्यापेक्षा वास्तव वेगळे आहे किंवा कसे. कमोडिटी मार्केटातले आर्बिट्राजही लै अल्पजीवी असते असे वाचनात आलेले आहे. तुम्ही सांगताहात ते मला नवीन आहे. या क्षेत्रात मी नवखाही नाही, कारण नवख्याने किमान एंट्री तरी केलेली असते, माझं तेही नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

धन्यवाद

ज्ञानव
Mon, 12/16/2013 - 18:09 नवीन
कमोडीटी मार्केट मध्ये आम्ही जेव्हा केले तेव्हा तरी बराच फरक मिळाला आम्हाला आणि मग काही "मुंगळे" आमचा गुळ आम्ही शोधू म्हणू लागले आणि सिंडीकेटचा बोर्या वाजला. वेलची कोचीनला मी स्वतः जाऊन गोडाऊन ला भरून आणि नंतर संगणकाच्या माध्यमातून विकून किंवा कधी उलट करून पैसा मिळतो त्यात पण ते एकट्याचे काम नाही हे निश्चित आणि पुन्हा "लफडी" जमायला लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सर!!!!

ज्ञानव
Mon, 12/16/2013 - 18:12 नवीन
प्लीज "सर" वगैरे नको. मी हि एन्ट्री मारलेला नवखा आणि विद्यार्थीच आहे. कदाचित एक वर्ग पुढे असेन एखाद्याच्या आणि अनेक वर्ग मागे आहे बर्याच जणांच्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ब्योर्र !!

ब़जरबट्टू
Tue, 12/17/2013 - 09:35 नवीन
मास्तर म्हणतो, पण तुमचे लेख मार्गदर्शक आहेतच... ( शेअरमार्केटमध्ये लाख गुतंवुन लात खाल्लेला ) बज-या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

धन्यवाद

ज्ञानव
Tue, 12/17/2013 - 10:36 नवीन
धन्यावाद
  • Log in or register to post comments

पुढील सरसरी 3 वर्षासाठी

बर्फाळलांडगा
Sun, 01/05/2014 - 17:36 नवीन
किंगफिशर एरलाईनच्या शेअरचे भवितव्य काय वाटते? स्वस्त आहेत तो पर्यन्त बल्क खरेदी करायची तीव्र इच्छा आहे, पुढे बरे दिवस येतील का?
  • Log in or register to post comments

चुकिचा प्रश्न

कपिलमुनी
Mon, 01/06/2014 - 19:45 नवीन
अशा प्रकारच्या वैयक्तिक प्रशनामुळे कोणत्याही अर्थ विषयक धाग्याची वाट लागते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बर्फाळलांडगा

वैयक्तिक सल्ला ?????

ज्ञानव
Mon, 01/06/2014 - 19:27 नवीन
इथे देणे माझ्या नियमात बसत नाही. पण न राहवून सांगेन एकतर एविअशन ha आपला प्रांत नाही मग त्या धंद्यात पैसे घालावे का ? आणि बल्क मध्ये ? त्यापेक्षा त्याच विमानाचे तिकीट काढून चारधाम फिरून येणे मला पसंत आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा