पगडी
गाव तिथे चावडी
चावडी तिथे वावडी |
गोर्या गोर्या हातात
सखु भरते बांगडी |
लगबगीने चालताना
सांडली तीची बुगडी |
पायवाटेच्या धुळीने
माखली हिरवी साडी |
डोईवरती पदर घेता
डोळ्यात टोचली काडी |
उन्हाची काहीली
काळजास घरं पाडी |
ओरडून ओरडून कोणी
देतो पहा दवंडी |
गुलाल, बुक्का उधळीत
दंडवत घाली बेगडी |
आंधळ्याच्या हातात
होती एक तागडी |
पण नवलच घडले
पडली दाजीबाची माडी |
सांगोवांगीचीच कहाणी
ऐकते सारी वाडी |
गाव बोले चांगभलं
नवस देवाचा फेडी |
कशी , कुठे, कधी, कुणी
जोडली कडीला कडी |
रंगला कलगी-तुरा
मिरवते पुणेरी पगडी |
लेखनविषय:
याद्या
2410
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
यु रोक़!
जबरी !!!
मस्त!
मला बी सांगा की इस्कटुन
In reply to मस्त! by पैसा
नाय नाय!
In reply to मला बी सांगा की इस्कटुन by अभ्या..
पगडीला शॉट !!
डी डी चा यमक जुळवत शेवटी
भारुड
आवडेश
छान...