पीनट बटर

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in पाककृती
26 Nov 2013 - 10:44 pm

आपण सगळेच जाणतो, की, जर व्यायाम ही नाण्याची एक बाजू असेल, तर दुसरी बाजू अर्थातच सकस आहार आहे. सकस आहाराचा एक अविभाज्य भाग म्हणजे प्रथिनं. आपल्या शरीराला (पुरेसा व्यायाम करत असल्यास) प्रतिदिन १ ग्रॅम प्रति किलो (६० किलो वजन असलेल्या व्यक्तीला प्रतिदिन ६० ग्रॅम प्रथिनं) इतकी प्रथिनांची गरज असते. शरीरसौष्ठव, वजनवाढ किंवा इतर विशेष उद्दिष्ट असल्यास १.५ ग्रॅम प्रति किलो.

आता, शाकाहारीं मंडळींना प्रथिनांची गरज भागवण्याचे स्त्रोत कमी असतात. कम्प्लीट प्रोटीन जे म्हणतात ते शाकाहारात फार कमी मिळतं. त्यामुळे वेगवेगळ्या स्त्रोतांतून प्रथिनं शरीरात जावी लागतात. शाकाहारी मंडळींची प्रथिनांची गरज भागवणारा एक मस्त पदार्थ म्हणजे पीनट बटर. हे आपल्याकडे तसं कमी प्रचलित आहे. या पीनट बटर चं माझं व्हर्जन मी तयार केलंय, ते तुम्हाला सांगतो.

साहित्य:
२ वाट्या भाजलेले दाणे
१/२ वाटी बदाम
१ वाटी ओट्स (ओव्हन मधे ४० सेकंद भाजून घ्या)
१/४ वाटी तीळ
१/२ वाटी डाळं (भाजलेली चणाडाळ)
साधारण १-१/२ वाटी तिळाचं तेल
१/२ वाटी चॉकलेट किंवा कोको पावडर

कृती:

प्रथम दाणे, बदाम, डाळं, ओट्स, व तीळ मिक्सर मधे ३-४ वेळा फिरवून बारीक पावडर करून घ्या. मग त्यात कोको पावडर किंवा चॉकलेट घालून पुन्हा एकदा फिरवून घ्या. मग अंदाजाने तेल घालत मिश्रण मिक्सरमधे फिरवत रहा, जोवर मिश्रणाला चटणीइतपत प्रवाहीपणा येत नाही.
सकस, प्रथिनांनी भरपूर, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स ने भरपूर असं पीनट बटर (माझं व्हर्जन बरं का) तयार आहे.

पोळीला लावून गुंडाळी खा, किंवा पावाला लावून सॅंडविच खा, किंवा व्यायामाच्या आधी/नंतर एक मोठा चमचा चवनप्राश सारखं खा....छान लागतं. नक्की कळवा कसं वाटलं.

आअ
आआ
आआआ

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

26 Nov 2013 - 10:49 pm | राघवेंद्र

माझा आवडता प्रकार पीनट बटर, फोटो व पाककृतीसाठी धन्यवाद.

कवितानागेश's picture

26 Nov 2013 - 11:00 pm | कवितानागेश

यात मीठ नाही का?

वेल्लाभट's picture

27 Nov 2013 - 6:29 am | वेल्लाभट

नाही; आवश्यकता नाही आणि प्रयोजनही नाही.

सूड's picture

26 Nov 2013 - 11:11 pm | सूड

धन्यवाद !!
एक शंका. तिळाचं वेगळं तेल घालण्यापेक्षा दाणे आणि तीळ तेल सुटेपर्यंत मिक्सर मध्ये फिरवले तर ??

कवितानागेश's picture

26 Nov 2013 - 11:42 pm | कवितानागेश

मिक्सरमध्ये फिरवताना तेल सुटलेले मी कधी पाहिले नाही. खलबत्त्यात सुटतं.
दगडी खलबत्त्यात हळूहळू कुटलं तर नक्कीच सुटतं..

वेल्लाभट's picture

27 Nov 2013 - 6:28 am | वेल्लाभट

बरोबर आहे. मिक्सर मधे तेल असं सुटत नाही, आणि सुटलं जरी, तरी स्प्रेडेबल कन्सिस्टन्सी येण्याइतपत सुटेल असं वाटत नाही. त्यामुळे, तेल घालावं लागतं.

तिळाचं अशासाठी वापरतो मी, कारण त्यातील जीवनसत्वांचं मिश्रण बाकी तेलांपेक्षा सरस असतं.

बाकी आंतरजालावर अनेक दुवे मिळतील. ऑलिव्ह ऑईलही वापरू शकता. मी एकदा साजुक तुपातही बनवलं होतं; तेही भारी लागलं. जबरदस्त.

सूड's picture

27 Nov 2013 - 2:21 pm | सूड

सुटतं. बारीक झाले तरी मिक्सर बंद करायचा नाही. हां पण ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी का काय ती येण्याची शक्यता कमी आहे.

सानिकास्वप्निल's picture

27 Nov 2013 - 2:04 am | सानिकास्वप्निल

पाकृ आवडली ...धन्यवाद :)
ह्यात जवसाचा (ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्ससाठी जवस उत्तम) ही उपयोग केला तर जास्तं हेल्दी होईल असे वाटते.

जवस (Flax Seed)

वेल्लाभट's picture

27 Nov 2013 - 6:21 am | वेल्लाभट

तुम्ही व्हेरिएशन कराल तितकी आहेत. फक्त अंतिम कन्सिस्टन्सी (म्हणजे, प्रवाहीपणा) वर परिणाम होणार नाही एवढं बघितलं की बास.

वेल्लाभट's picture

27 Nov 2013 - 9:36 am | वेल्लाभट

ओट्स म्हणजेच मराठीत जवस :P

सानिकास्वप्निल's picture

27 Nov 2013 - 5:52 pm | सानिकास्वप्निल

जवस म्हणजे ओट्स नाही
जवस/ अळशी एकच.
इंग्रजीत फ्लॅक्स सीड्स म्हणतात.

अवांतर :जवसाची/ अळशीची चटणी खाल्ली नाही का कधी??
इथे पहा

वेल्लाभट's picture

27 Nov 2013 - 7:33 pm | वेल्लाभट

oats

सानिकास्वप्निल's picture

27 Nov 2013 - 9:39 pm | सानिकास्वप्निल

ओट्स ला हिंदित जई म्हणतात पण मराठीत जवस नक्कीच नाही म्हणत.
तुम्ही वापरलेले ओट्सच आहेत त्याबद्दल माझे काहीच म्हणणे नाही मी फक्त जवस हे ओट्स नाही असे म्हणतेय.

हे बघा http://answers.yahoo.com/question/index?qid=20110915051630AARZA0p
http://nutrition.indobase.com/articles/oats-nutrition.php

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2013 - 9:22 am | अत्रुप्त आत्मा

झकास रे दोस्ता! :)

पैसा's picture

27 Nov 2013 - 9:53 am | पैसा

फायनल प्रॉडक्ट तिळाच्या वड्यांसारखं दिसतंय!

मी_आहे_ना's picture

27 Nov 2013 - 12:20 pm | मी_आहे_ना

धन्स् ह्या पाकृसाठी (भारतात पीनट बटर फारच महाग मिळतंय, हे नक्कीच करून बघायला हवं)

त्रिवेणी's picture

27 Nov 2013 - 1:29 pm | त्रिवेणी

याची चव साधारण कशी लागते?

मी_आहे_ना's picture

27 Nov 2013 - 1:49 pm | मी_आहे_ना

(शेंगदाण्यांचे प्रमाण जास्त असल्याने...) दाण्याचे कूट लोणकढ्या तूपात घालून लागेल तशी.

इष्टुर फाकडा's picture

27 Nov 2013 - 2:47 pm | इष्टुर फाकडा

जाता जाता, 'क्वार्क' हाही वेज लोकांसाठी अतिशय ब्येष्ट असा प्रथिन स्त्रोत आहे. कर्बोदके कमी करून आहारात प्रथिने वाढवायची असतील तर रोज तीनशे ग्राम क्वार्क थोडे पाणी, जिरेपूड, हिंग आणि मीठ घालून ढवळून जेवताना घेतले तर पोट लवकर भरते आणि जेवण कमी होवून प्रथिने जास्त खाल्ली जातात. शंभर ग्राम क्वार्क मध्ये १२ ग्राम प्रथिने (सहज पचणारी) असतात. आणि मेद अर्धा ग्राम ! ३६+३६+३६ असे तीन वेळा झाले तरी चिंता नाय काय :)
शिवाय बाकी प्रथिने नेहमीची असतातच.
अर्थात वरील प्रमाण हे बायसेप्स ची पप्पी घेवू इच्छिणार्यांसाठी आहे हेवे… etc ;)

सूड's picture

27 Nov 2013 - 3:09 pm | सूड

'क्वार्क' म्हंजे??

इष्टुर फाकडा's picture

27 Nov 2013 - 5:22 pm | इष्टुर फाकडा

हे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Quark_(dairy_product)

ही लिंक काही भलतंच दाखवत आहे.

गुगलून बघा आणि गुगलोबाने सर्च रिझल्ट्स दिले की 'Quark (Dairy Product)' वाली लिंक उघडा.

आयुर्हित's picture

9 Apr 2015 - 4:02 pm | आयुर्हित

Quark म्हणजे आपल्या मराठमोळ्या भाषेतला चक्का (ज्यात साखर, वेलची घालून श्रीखंड तयार होतो)

अनिरुद्ध प's picture

27 Nov 2013 - 3:29 pm | अनिरुद्ध प

पा क्रू वेल्लाभट्,करुन बघण्यात येईल.

मुक्त विहारि's picture

27 Nov 2013 - 6:44 pm | मुक्त विहारि

आता हा नविन प्रकार पण करून बघीन.

मस्त दिसतं आहे! पुण्यात कधी आलात तर हे पीनट बटर करुनच घेऊन या, कसे? :)

वेल्लाभट's picture

27 Nov 2013 - 7:15 pm | वेल्लाभट

जरूर जरूर. धन्यवाद...

रेवती's picture

27 Nov 2013 - 7:20 pm | रेवती

छान पाकृ.

आपल्या सांगण्याप्रमाणे पीनट बटर बनवायचा प्रयत्न केल्या गेला आहे. फक्त एक चीटिंग केलंय यात, पाच चमचे साखर दळून घातलीये कोको पावडरची चव आणखी नीट येत्ये का बघायला. तीळाचं तेल मात्र जरा भीतभीतच घातलंय.

खालील दोन फोटो दाणे मिक्सर मध्ये बारीक करतानाही किती तेल निघू शकतं त्याचा नमुना दाखवायला डकवलेत. कॉलिंग जेटमाऊली, बघत्येस ना गो !! ;)

सूचना: स्वयंपाकाच्या ओट्यावर हळदीचे डाग पडले आहेत, नेमके त्यावरच बोट ठेवून सदस्यांनी धाग्याचे काश्मीर करु नये. ;)

स्वयंपाकाच्या ओट्यावर हळदीचे डाग पडले आहेत, नेमके त्यावरच बोट ठेवून सदस्यांनी धाग्याचे काश्मीर करु नये.

असे म्हणून स्वतःच वाघा बॉर्डर खुली करून दिल्यावर धाग्याचे काश्मीर झाल्यास दोष कुणाचा =))

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jan 2014 - 12:34 pm | अत्रुप्त आत्मा

@स्वतःच वाघा बॉर्डर खुली करून दिल्यावर
धाग्याचे काश्मीर झाल्यास दोष कुणाचा>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif काय डाग'लाय बाण! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif

वेल्लाभट's picture

1 Jan 2014 - 8:49 pm | वेल्लाभट

लई बेस झालंय की ! एन्जॉय.......

ओक्के. धन्यवाद वेल्लाकाका!!

@ब्याट्या: जेटमाऊलीचा उल्लेख झाल्याने तसं लिहावं लागलं. मागं नान्याच्या 'कार्बोरेटर कसा साफ करावा' या छायाचित्रात्मक प्रतिसादात तिने 'नखे कापा' असा उपप्रतिसाद दिला होता. सो इ वस जुस्त चोवेरिन्ग म्य्सेल्फ!! ;)

कवितानागेश's picture

3 Jan 2014 - 12:31 am | कवितानागेश

..पण त्यामुळे कार्बोरेटर काश्मिरला गेला नव्हता. :D
असो.
माझे प्रतिसाद कुणीतरी लक्षात ठेवतंय हे पाहून मला गहिवरुन येतंय! :P

कार्बुरेटरच्या धाग़्यावर नख़े का़पा? धन्य आहे ती मौली =))

कवितानागेश's picture

2 Jan 2014 - 1:00 pm | कवितानागेश

हायला!! मस्त चमकतंय दाण्याचं कूट. :)
करुन बघते.

ब़जरबट्टू's picture

3 Jan 2014 - 4:26 pm | ब़जरबट्टू

अंगठा वर !!

मी चुकुन "पनीर बटर" असे वाचले आणि धागा उघडला, पण हे बटर सुद्धा भारी दिसतय ! :)

(चीज प्रेमी) ;)

आ हा हा!!! अगदी भन्नाट पदार्थ आहे हा!!!
फोटो पाहूनच तोंडाला पाणी सुटलंय. आज पहिल्या दिवशीच "मिपा म्हणजे मेजवानी" हि तर खात्री झाली माझी!
खरं तर खूप सोपी रेसिपी असून घरी करता येण्यासारखा आहे. मुलांनाही नक्कीच आवडेल खायला.
लक्ष लक्ष धन्यवाद!!!
आपला लाडका : आयुर्हीत

वेल्लाभट's picture

4 Jan 2014 - 10:39 am | वेल्लाभट

नक्कीच.... धन्यवाद

स्पा's picture

9 Apr 2015 - 2:30 pm | स्पा

किती दिवस टिकते हे ?

शीतकपाटात अनेक दिवस. महिनाभर सहज.

वेल्लाभट's picture

9 Apr 2015 - 2:37 pm | वेल्लाभट

आणि खपलं नाही समजा, तर एखाद्या रसभाजीत घालावं दोन मोठे चमचे. मस्त दाटसर रस्सा होतो. :) वेगळा स्वाद येतो आणि छान.

स्पा's picture

9 Apr 2015 - 3:19 pm | स्पा

कुल

मस्त कृती. बाजारात मिळणार्‍या पीनटबटरपेक्षा चव नक्की छान असणार याची.
ओटस न घालता केलं तर? प्रथिनांच्या / पोषणमूल्यांच्या प्रमाणामध्ये लक्षणीय फरक पडत असेल तर ओटस ना नेहेमीच्या स्वयंपाकघरात असणार्‍या जिन्नसांंमधला पर्याय आहे का?