मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पीनट बटर

वेल्लाभट · · पाककृती
आपण सगळेच जाणतो, की, जर व्यायाम ही नाण्याची एक बाजू असेल, तर दुसरी बाजू अर्थातच सकस आहार आहे. सकस आहाराचा एक अविभाज्य भाग म्हणजे प्रथिनं. आपल्या शरीराला (पुरेसा व्यायाम करत असल्यास) प्रतिदिन १ ग्रॅम प्रति किलो (६० किलो वजन असलेल्या व्यक्तीला प्रतिदिन ६० ग्रॅम प्रथिनं) इतकी प्रथिनांची गरज असते. शरीरसौष्ठव, वजनवाढ किंवा इतर विशेष उद्दिष्ट असल्यास १.५ ग्रॅम प्रति किलो. आता, शाकाहारीं मंडळींना प्रथिनांची गरज भागवण्याचे स्त्रोत कमी असतात. कम्प्लीट प्रोटीन जे म्हणतात ते शाकाहारात फार कमी मिळतं. त्यामुळे वेगवेगळ्या स्त्रोतांतून प्रथिनं शरीरात जावी लागतात. शाकाहारी मंडळींची प्रथिनांची गरज भागवणारा एक मस्त पदार्थ म्हणजे पीनट बटर. हे आपल्याकडे तसं कमी प्रचलित आहे. या पीनट बटर चं माझं व्हर्जन मी तयार केलंय, ते तुम्हाला सांगतो. साहित्य: २ वाट्या भाजलेले दाणे १/२ वाटी बदाम १ वाटी ओट्स (ओव्हन मधे ४० सेकंद भाजून घ्या) १/४ वाटी तीळ १/२ वाटी डाळं (भाजलेली चणाडाळ) साधारण १-१/२ वाटी तिळाचं तेल १/२ वाटी चॉकलेट किंवा कोको पावडर कृती: प्रथम दाणे, बदाम, डाळं, ओट्स, व तीळ मिक्सर मधे ३-४ वेळा फिरवून बारीक पावडर करून घ्या. मग त्यात कोको पावडर किंवा चॉकलेट घालून पुन्हा एकदा फिरवून घ्या. मग अंदाजाने तेल घालत मिश्रण मिक्सरमधे फिरवत रहा, जोवर मिश्रणाला चटणीइतपत प्रवाहीपणा येत नाही. सकस, प्रथिनांनी भरपूर, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स ने भरपूर असं पीनट बटर (माझं व्हर्जन बरं का) तयार आहे. पोळीला लावून गुंडाळी खा, किंवा पावाला लावून सॅंडविच खा, किंवा व्यायामाच्या आधी/नंतर एक मोठा चमचा चवनप्राश सारखं खा....छान लागतं. नक्की कळवा कसं वाटलं. आअ आआ आआआ

वाचने 22316 वाचनखूण प्रतिक्रिया 47

सूड Tue, 11/26/2013 - 23:11
धन्यवाद !! एक शंका. तिळाचं वेगळं तेल घालण्यापेक्षा दाणे आणि तीळ तेल सुटेपर्यंत मिक्सर मध्ये फिरवले तर ??

In reply to by सूड

कवितानागेश Tue, 11/26/2013 - 23:42
मिक्सरमध्ये फिरवताना तेल सुटलेले मी कधी पाहिले नाही. खलबत्त्यात सुटतं. दगडी खलबत्त्यात हळूहळू कुटलं तर नक्कीच सुटतं..

In reply to by कवितानागेश

वेल्लाभट Wed, 11/27/2013 - 06:28
बरोबर आहे. मिक्सर मधे तेल असं सुटत नाही, आणि सुटलं जरी, तरी स्प्रेडेबल कन्सिस्टन्सी येण्याइतपत सुटेल असं वाटत नाही. त्यामुळे, तेल घालावं लागतं. तिळाचं अशासाठी वापरतो मी, कारण त्यातील जीवनसत्वांचं मिश्रण बाकी तेलांपेक्षा सरस असतं. बाकी आंतरजालावर अनेक दुवे मिळतील. ऑलिव्ह ऑईलही वापरू शकता. मी एकदा साजुक तुपातही बनवलं होतं; तेही भारी लागलं. जबरदस्त.

पाकृ आवडली ...धन्यवाद :) ह्यात जवसाचा (ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्ससाठी जवस उत्तम) ही उपयोग केला तर जास्तं हेल्दी होईल असे वाटते. जवस (Flax Seed)

In reply to by सानिकास्वप्निल

वेल्लाभट Wed, 11/27/2013 - 06:21
तुम्ही व्हेरिएशन कराल तितकी आहेत. फक्त अंतिम कन्सिस्टन्सी (म्हणजे, प्रवाहीपणा) वर परिणाम होणार नाही एवढं बघितलं की बास.

In reply to by वेल्लाभट

जवस म्हणजे ओट्स नाही ओ जवस/ अळशी एकच. इंग्रजीत फ्लॅक्स सीड्स म्हणतात. अवांतर :जवसाची/ अळशीची चटणी खाल्ली नाही का कधी?? इथे पहा

In reply to by वेल्लाभट

ओट्स ला हिंदित जई म्हणतात पण मराठीत जवस नक्कीच नाही म्हणत. तुम्ही वापरलेले ओट्सच आहेत त्याबद्दल माझे काहीच म्हणणे नाही मी फक्त जवस हे ओट्स नाही असे म्हणतेय. हे बघा http://answers.yahoo.com/question/index?qid=20110915051630AARZA0p http://nutrition.indobase.com/articles/oats-nutrition.php

पैसा Wed, 11/27/2013 - 09:53
फायनल प्रॉडक्ट तिळाच्या वड्यांसारखं दिसतंय!

मी_आहे_ना Wed, 11/27/2013 - 12:20
धन्स् ह्या पाकृसाठी (भारतात पीनट बटर फारच महाग मिळतंय, हे नक्कीच करून बघायला हवं)

इष्टुर फाकडा Wed, 11/27/2013 - 14:47
जाता जाता, 'क्वार्क' हाही वेज लोकांसाठी अतिशय ब्येष्ट असा प्रथिन स्त्रोत आहे. कर्बोदके कमी करून आहारात प्रथिने वाढवायची असतील तर रोज तीनशे ग्राम क्वार्क थोडे पाणी, जिरेपूड, हिंग आणि मीठ घालून ढवळून जेवताना घेतले तर पोट लवकर भरते आणि जेवण कमी होवून प्रथिने जास्त खाल्ली जातात. शंभर ग्राम क्वार्क मध्ये १२ ग्राम प्रथिने (सहज पचणारी) असतात. आणि मेद अर्धा ग्राम ! ३६+३६+३६ असे तीन वेळा झाले तरी चिंता नाय काय :) शिवाय बाकी प्रथिने नेहमीची असतातच. अर्थात वरील प्रमाण हे बायसेप्स ची पप्पी घेवू इच्छिणार्यांसाठी आहे हेवे… etc ;)

सूड Wed, 01/01/2014 - 17:44
आपल्या सांगण्याप्रमाणे पीनट बटर बनवायचा प्रयत्न केल्या गेला आहे. फक्त एक चीटिंग केलंय यात, पाच चमचे साखर दळून घातलीये कोको पावडरची चव आणखी नीट येत्ये का बघायला. तीळाचं तेल मात्र जरा भीतभीतच घातलंय. खालील दोन फोटो दाणे मिक्सर मध्ये बारीक करतानाही किती तेल निघू शकतं त्याचा नमुना दाखवायला डकवलेत. कॉलिंग जेटमाऊली, बघत्येस ना गो !! ;) सूचना: स्वयंपाकाच्या ओट्यावर हळदीचे डाग पडले आहेत, नेमके त्यावरच बोट ठेवून सदस्यांनी धाग्याचे काश्मीर करु नये. ;)

In reply to by सूड

बॅटमॅन Wed, 01/01/2014 - 17:57
स्वयंपाकाच्या ओट्यावर हळदीचे डाग पडले आहेत, नेमके त्यावरच बोट ठेवून सदस्यांनी धाग्याचे काश्मीर करु नये.
असे म्हणून स्वतःच वाघा बॉर्डर खुली करून दिल्यावर धाग्याचे काश्मीर झाल्यास दोष कुणाचा =))

In reply to by बॅटमॅन

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/02/2014 - 12:34
@स्वतःच वाघा बॉर्डर खुली करून दिल्यावर धाग्याचे काश्मीर झाल्यास दोष कुणाचा>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif काय डाग'लाय बाण! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif

In reply to by वेल्लाभट

सूड गुरुवार, 01/02/2014 - 14:44
ओक्के. धन्यवाद वेल्लाकाका!! @ब्याट्या: जेटमाऊलीचा उल्लेख झाल्याने तसं लिहावं लागलं. मागं नान्याच्या 'कार्बोरेटर कसा साफ करावा' या छायाचित्रात्मक प्रतिसादात तिने 'नखे कापा' असा उपप्रतिसाद दिला होता. सो इ वस जुस्त चोवेरिन्ग म्य्सेल्फ!! ;)

In reply to by सूड

कवितानागेश Fri, 01/03/2014 - 00:31
..पण त्यामुळे कार्बोरेटर काश्मिरला गेला नव्हता. :D असो. माझे प्रतिसाद कुणीतरी लक्षात ठेवतंय हे पाहून मला गहिवरुन येतंय! :P

आयुर्हित Sat, 01/04/2014 - 04:47
आ हा हा!!! अगदी भन्नाट पदार्थ आहे हा!!! फोटो पाहूनच तोंडाला पाणी सुटलंय. आज पहिल्या दिवशीच "मिपा म्हणजे मेजवानी" हि तर खात्री झाली माझी! खरं तर खूप सोपी रेसिपी असून घरी करता येण्यासारखा आहे. मुलांनाही नक्कीच आवडेल खायला. लक्ष लक्ष धन्यवाद!!! आपला लाडका : आयुर्हीत

In reply to by स्पा

वेल्लाभट गुरुवार, 04/09/2015 - 14:37
आणि खपलं नाही समजा, तर एखाद्या रसभाजीत घालावं दोन मोठे चमचे. मस्त दाटसर रस्सा होतो. :) वेगळा स्वाद येतो आणि छान.

पलाश गुरुवार, 04/09/2015 - 15:36
मस्त कृती. बाजारात मिळणार्‍या पीनटबटरपेक्षा चव नक्की छान असणार याची. ओटस न घालता केलं तर? प्रथिनांच्या / पोषणमूल्यांच्या प्रमाणामध्ये लक्षणीय फरक पडत असेल तर ओटस ना नेहेमीच्या स्वयंपाकघरात असणार्‍या जिन्नसांंमधला पर्याय आहे का?