Skip to main content

आठवण

आठवण

Published on 13/11/2013 - 00:19 प्रकाशित मुखपृष्ठ
छोट्याशा या जगात माझ्या तू खूप मोठी कामगिरी केलीस मी जरा थोडं अजून जगावं म्हणून स्वतः झिजुन झिजुन मेलीस माझा हट्ट पुरवत आलीस नेहमी सगळी कामं पाठी टाकून सलगी केलीस माझ्याशी तू विश्वास ठेवलास डोळे झाकून ऐश-आरामात जगायची सवय होती, शून्य विकास फक्त विलास वाईट दिवस आल्यावर बिथरलो तेव्हा फक्त तूच आधार दिलास भावनिक ब्लॅकमेल करुन मी तुझ्याकडून घेतलं स्वतःला आंजारून गोंजारून तू दिलेला मैत्रीचा हात पकडून चान्सही मारला प्रेमाचा मी चोरून खरंय की मी खोटं बोलत आलोय खोटं बोलून मी खरंच खोटारडा झालोय पण एक खरी गोष्ट तुला सांगू पाहतोय तुझ्यावरच्या प्रेमात अगदी बुडून निघालोय कंटाळलोय मी दूरून प्रेम करून मला आता कोणीतरी नवीन हवंय नवे चेहरे खूप दिसतात गं पण तुझीच मला झालीय सवय तुझ्या नावाने ढाळलेल्या अश्रुंची करून ठेवलीये मी मनात साठवण परत येशील का माझ्या जगात तू? खूप येत्येय गं तुझी आठवण

याद्या 898
प्रतिक्रिया 1