Skip to main content

' अधांतरी ..'

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 23/09/2013 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण कुंद कुंद दाटून येते. अनावर ठसठसते, रक्तासारखी ठिबकते. दिशांच्या कोनात विझून गेलेले हळवे पक्षी जागे होतात, उगाच चिवचिवतात, श्वासांच्या फांदीवर घट्ट रुतून बसतात. क्षितिजावर सांडलेले रंग सुटतात ; अलवार आकाशावर दिशाहीन फुटतात. तुझे भास प्राणांतून विजेसारखे लखलखतात, धारदार पात्यासारखे आरपार जाणिवेवर फिरतात. तूझ्या असण्याच्या शक्यतांच्या सीमारेषेवर जीव इंद्रधनुष्यासारखा सततच अधांतरी ..! - डॉ. सुनील अहिरराव
लेखनविषय:

वाचने 633
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया