लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 18/09/2013 10:32 या दिवशी प्रकाशित केले. धुके सभोवर मन काठावर गूढ प्रभात रुपेरी भास आभासे असलेलेपण भ्रामक दुनिया सारी दंव; लव तृण पानांवर पसरे अगाध नीर पथारी गंध मोकळा मातीचा असमंती घेई भरारी कोण संग तो कुणा व्यापतो अगतिक आभा चकोरी नील आकाशी पाचू रानी नवथर हिव अंबारी ………………. अज्ञात काव्यरस अद्भुतरस लेखनविषय: कविता वाचने 925 प्रतिक्रिया 0 प्रतिक्रिया
प्रतिक्रिया