साहित्य : बटाटे, तूप, साखर, केशर, आरारोट
कृती: बटाटे घेऊन ते उकडुन, कुस्करुन घ्यावेत. एक वाटी गोळ्यास पाव वाटी आरारोट घेऊन, त्या गोळ्यात घालून गोळा चांगला मळावा. नंतर गोळ्याच्या दीडपट साखर घेऊन, त्याचा दोन तारी पाक करून, त्यात केशर घालावे. वरील बटाट्याचा गोळा जाड भोकाच्या शेवपात्रात घालून, साजुक तुपावर शेवेसारखा चवंगा पाडावा व तांबूस रंगावर तळावा व पाकात सोडावा. ही बटाट्याची जिलबी कुरकुरीत व छान लागते. :P
(ही जिलबी उपासात खायची की नाही ही स्वत: ठरवावे. ~X( )
प्रतिक्रिया
15 Jul 2008 - 4:37 am | झंप्या
खादाड बोक्या, तुझ्या ह्या सगळ्या रेसिपीज वाचून तुझे नाव खादाड_बटाटा असावे असं वाटतय! :-)
17 Jul 2008 - 8:37 pm | खादाड_बोका
मुर्खा.....उद्या मी जर नॉनव्हेज रेसीपी दिली तर मी काय सिंह होईल काय ? नक्कीच नाही.
पण तुझ्या या वायफळ टिप्पणी नंतर मात्र तुझे नाव "बिन अक्कलेचा कांदा" ठेवण्यास हरकत नाही.
हा..हा..हा... :) :) :) :)
मला तर स्वप्नातही भुक लागते....
17 Jul 2008 - 8:38 pm | खादाड_बोका
मुर्खा.....उद्या मी जर नॉनव्हेज रेसीपी दिली तर मी काय सिंह होईल काय ? नक्कीच नाही.
पण तुझ्या या वायफळ टिप्पणी नंतर मात्र तुझे नाव "बिन अक्कलेचा कांदा" ठेवण्यास हरकत नाही.
हा..हा..हा... :) :) :) :)
मला तर स्वप्नातही भुक लागते....
17 Jul 2008 - 5:50 pm | श्रीयुत संतोष जोशी
नमस्कार,
उपासाला आरारोट चालतं का हो ?
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
17 Jul 2008 - 6:55 pm | खादाड_बोका
उपासाला आरारोट चालतं का हो ?
मला स्वतः माहीत नाही. ~X(
मला तर स्वप्नातही भुक लागते....
17 Jul 2008 - 11:25 pm | वरदा
उपासाला नाही चालत आरारोट्..मग तर बिस्कीटंही खातील की सगळे...
मला वाट्टं त्याऐवजी साबुदाणा पीठ घातलं तरी होईल चकली
(प्रयोग म्हणजे स्वयंपाक असं मानणारी)
वरदा
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt