कट्-वडा!

स्पंदना's picture
स्पंदना in पाककृती
26 Aug 2013 - 8:03 am

काय! काय!! काय!!
म्हणायच तरी काय म्हणते मी!
ऊठ सुट मिसळ! मिसळ!! अन मिसळ!!
नाही म्हणजे आम्ही ऐकायच तरी किती म्हणते मी? अगदी एका आयडीचे नावसुद्धा मिसळ्पाव असाव? कोण मिसळ्प्रेमी ! कोण उठुन नुसते मिसळीचे फोटो टाकून शंभरी गाठतो? ऑ? काय आहे काय? अहो या मिसळीलाच झणका देणारा आणखी एक भन्नाट प्रकार आहे याची कुणाला जाणीवही नसावी? अगदी उड्या मारुन मारुन जाऊन मिसळी खाता तेथे काळ्या फळ्यावर खडुने लिहीलेले हे नाव तुम्हा कुणाला दिसु नये? उगा नव नव्या चवी चाखणार्‍यांना हा ही पदार्थ चाखुन पहायची उर्मी येउ नये?
आता म्हणाल अपर्णाबाय एव्हढा का उमाळा फुटलाय या पदार्थाचा? का? का फुटु नये? अहो कॉलेजच्या रम्य भासणार्‍या दिवसात अस्मादिकांनी तरंगायची स्वप्न पाहीली ती याच कट-वड्याच्या बाऊलात! नाका तोंडातून निघणार्‍या वाफा सांभाळत कपाळीचा घाम पुसला तो याच्याच सहवासाने! पर्स उलटी पालटी करुन खरच आत पुरेसे पैसे नाहीत याची निराश मनाने चाचपणी केली ती याच्याच चवीला आसुसून! अन अश्या तारुण्याच्या आठवणीत राजासारखा घर करुन बसलेला कट-वडा बाहेरच्या कातिल दुनियेच्या खिजगणतीतही असु नये? इतका अन्याय?
ते काही नाही! आज मी चमचा अन बाऊल परजुन हा अन्याय दुर करणाच. आमच्या कट-वड्याच नाव या पाककलाक्षेत्री झळकावणारच!
बर! आणी लागतय तरी अस काय जगावेगळ या कट-वड्यासाठी म्हणते मी! आपलाच कट, अन आपलाच वडा! हाय काय त्यात म्हणते मी? पण हा कट अन वड्याचा प्रीती संगम मात्र अगदी नरसोबावाडीच्या संगमा एव्हढ पुण्य देउन जातो.
तर मंडळी या पदार्थाला लागणारे सामान!
जेव्हढे पाहिजे तेव्हढे वडे, अन उपसेल तेव्हढा कट! वर पसरायला फरसाण,कोथींबीर,कांदा, थोडस ओल खोबर अन लिंबाची फोड!
नाऽऽही? टप्प्या ट्प्प्याने पाहिजे म्हणता? घेवा देवा. देतु!
तर वड्याचे सामान-
उकडलेले बटाटे, चिरलेला कांदा, मिरची, कडीपत्ता, हळद, कोथींबीर. थोडी आले पेस्ट, अन थोडी लसूण पेस्ट.
फोडणीसाठी- तेल, हिंग, जीरे, मोहरी.
आवरणासाठी- बेसन,हिंग,जीरे,आमच कोल्हापुरी तिखट, मिठ, थोडी कोथींबीर, कडीपत्ता, (हे दोन्ही अगदी बारिक कापुन) चमचाभर मोहन.
तळायला तेल.

तर उकडलेल्या बटाट्याचे बारिक तुकडे करुन त्यात एका कढईत कांद्याची जीर,मोहरी,हिंग,कडीपत्ता,मिरच्या घालुन केलेली फोडणी मिसळा. चवीप्रमाणे मिठ घाला. आता या मिश्रणाचे दोन भाग करुन एका भागात आल्याची तर दुसर्‍या भागात लसणीची पेस्ट मिसळा. एकाचवेळी दोन वेगवेगळ्या चवीचे वडे खायला मिळतील. ते ही अ‍ॅज अ सरप्राइज! तर आता या मिश्रणाचे लिंबाएव्हढे अथवा त्यापेक्षा मोठे गोळे बनवुन घ्या.
आवरणाच्या साहित्यात पाणी मिसळुन भजीच्या पिठासारखे घट्टसर भिजवा. वडे तळायला ठेवलेल्या तेलातले थोडे तेल यावर मोहन म्हणुन घाला. अन घ्या तळुन वडे!

आता बनवुया कट!!
मी या कटासाठी सगळ आंतरजाल पालथ घातल! सगळ्या रेसीपी ट्राय केल्या. चकली ताईची केली, स्वाती ताईची केली, पेठकर काकांच्या खरडवहीचे उंबरे झिजवले, पण उंहुं! नो रिझल्टस! माझ्या कटाच्या चवीला चटावलेल्या जिभेला काही ती जी कोल्हापुरी विशिष्ट चव असते, ती काही मिळेना. उगा कट म्हणुन हौस भागवायची अस चालु होतं. अन मग एक दिवस अतृप्त आत्म्यान करंssट-मिसळ(४४० व्होल्ट) टाकली, अन त्यात कटाचा उल्लेख करताना, त्यात बटाटाभाजी मिसळतात असा दणका मारला. हान तेच्या मारी! अहो काय शॉट लागला ते वाचुन म्हणता? लागलीच त्याप्रकारे कट बनवुन पाह्यला अन काय सांगु राव? चक्क गारद!
तर कट साहित्य-
१ वाटी कांदा पेस्ट,१ वाटी टोमॅटो पेस्ट,१ वाटी ओल खोबर,१ वाटी पापडी अथवा गाठी (हो फरसाणतली)चा चुरा, एक वाटी बटाटा भाजी (चुरुन घ्या),१ तमालपत्र,४ लवंगा,१" दालचिन,१ १/२ टीस्पुन लसूण पेस्ट, मिठ, आमच तिखट, अन कोकम.

थोड्याश्या तेलात तमालपत्र,लवंगा,दालचिनी पर्तुन घ्या त्यावर कांदा पेस्ट घालुन कच्चा वास जाईपर्यंत परता, आता त्यात ओल खोबर घालुन परता.मग टोमॅटो पेस्ट घालुन साधारण शिजवुन घ्या.
हे सगळ मिक्सरवर फिरवुन छान बारिकस वाटुन घ्या. त्यातच बटाट्याची भाजी अन पापडी अथवा गाठीचा चुरा मिसळा.
आता जरा जास्त तेल घ्या एका पातेल्यात. तेल तापल की गॅस बंद करा, वरचा एक्झॉस्ट लावा, दारे खिडक्या उघडा अन तेल किंचीत तापमानाला उतरल की त्यात आमच कोल्हापुरी तिखट घाला. जळु देउ नका! भरभर पळीने हलवत रहा. आता त्यात वरील पेस्ट घालुन पुन्हा गॅस सुरु करा. पाहिजे तेव्हढ पाणी, मिठ अन कोकम घाला. चांगल उकळा.

सुटलं का पाणी तोंडाला?
कट-वडा साहित्य-
वरचे दोन वडे, बारिक चिरलेला कांदा, कोथींबीर, टोमॅटो (ऑप्शनल) फरसाण, लिंबु. अन पाव. बाजुला कटाची वाटी. अन भरपुर पाणी. नाक डोळे पुसायला एक हातरुमाल.

आता वडे बाऊलमध्ये असे निट ठेवा, त्यांच्याकडे एकदा डोळेभरुन पहा. हात मागे! अस हावरटासारख नुसता वडाउचलुन तोंडात नाही टाकायचा! आता त्यावर मस्त फरसाण घाला. मग चांगला दोन पळ्या कट घाला. कांदा-कोथींबीरीची पखरण करा. पाहीजे असेल तर टोमॅटो पसरा. जर्र्र्रा लिंबु पिळा. अन बसा डाव्या हाताला पाव घेउन. आता काय विचारताय? हाणा !!

__/\__
अपर्णा

प्रतिक्रिया

सकाळी सकाळी का अत्याचार करता ओ इतके.

मदनबाण's picture

26 Aug 2013 - 8:36 am | मदनबाण

यम्म यम्म !
सकाळच्याला हापिसात बसुनशान असं सगळं गरमा गरम बघीतल की लयं त्रास व्हतो बघा ! ;)

( कोल्हापुरी कट प्रेमी) :)

मुक्त विहारि's picture

26 Aug 2013 - 8:54 am | मुक्त विहारि

आवडती डिश..

सौंदाळा's picture

26 Aug 2013 - 9:48 am | सौंदाळा

चिपळुणहुन गुहागरला जाताना श्रुंगारतळी गावाच्या पुढे एका हाटीलात रस्सा-वडा नावाने बर्‍याचदा खाल्ला आहे.
अफलातुन लागतो. मात्र हा हॉटेलवाला रस्सा/कट म्हणुन चिकन्/मटणाचा शिळा रस्सा देतो असा संशय आहे. पण त्यामुळे या डिशला मात्र चार चांद लागतात ;)
वेळणेश्वरलादेखील समुद्रकिनारी कट वडा आणि चहा नाष्त्याला खाल्ला आहे.
काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
मस्त मस्त मस्त

मोदक's picture

26 Aug 2013 - 7:42 pm | मोदक

नोंद घेतल्या गेली आहे.

पाकृ ब्येष्ट!!

स्पंदना's picture

27 Aug 2013 - 5:22 am | स्पंदना

खरच? माझ्या मते आमच्या कोल्हापुरव्यतिरिक्त ही डीश आणखी कोठेही मिळत नाही.
बर झाल तुम्ही सांगितलात ते.

बाकी कुठे काहीसं साम्य असलेला पदार्थ अन्य नावाने मिळत असेलच. पण कट वडा हे नाव आणि तो विशिष्ट पदार्थ हा सांगली, कोल्हापूर, कराड, सातारा इतक्या पट्ट्यात ओरिजिनल असतो असं खात्रीने म्हणता येईल. त्या परिसरात पाचसहा वर्षे काढल्याने कटवड्याशी अत्यंत जवळचा परिचय आहे. कॉलेज आणि कटवड्याचं नातं लेखात म्हटल्याप्रमाणे एकदम घट्ट आहे.

बाकी कटवडा या प्रकारात वडा गार चालतो आणि बहुधा असतोही. कट वाफाळता असणं अनिवार्य. शिवाय कोल्हापूर सांगलीकडे बटाटेवड्याचे आवरण एकदम जाड करण्याची पद्धत आहे. असा वडा गार झाल्यावर नुसता खायला आणखीच भयंकर लागतो. पण हाच वडा उकळत्या कटात घालून दिला की मस्त खुलतो.

कट आणि वडा वेगवेगळा देणे (आणि वरुन अ‍ॅड ऑन्स आजुबाजूला ठेवलेले) हा सर्व्ह करण्याचा फॅन्सी प्रकार झाला. ते फरसाण आणि अन्य सजावट काढून टाकून वड्याला थेट कटात बुडवून बाजूने तुडुंब कट भरुन खोलगट वाडगा-थाळी हीच सर्व्ह करण्याची योग्य पद्धत. सोबत पाव मात्र चालेल..एरवी जाळच तेजायला.

अमोल केळकर's picture

27 Aug 2013 - 12:39 pm | अमोल केळकर

सहमत :)

अमोल केळकर

+१११११११११११११११११११११११.

सौंदाळा's picture

27 Aug 2013 - 2:33 pm | सौंदाळा

सर्व प्रथम १० वर्षापुर्वी गुहागरला जाताना खाल्ला, तेव्हाच बेहद्द आवडला. त्यानंतर प्रत्येक वेळी गेलो तेव्हा खाल्ला. गुहागर, हेदवी, वेळणेश्वर परिसरात कोणत्याही उपहारग्रुहार नाष्त्याला मिळेल (मला तरी ३-४ वेगवेगळ्या ठीकाणी मिळाला.)
हे बघा मागच्या वर्षीच वेळणेश्वरला खाल्लेला रस्सा-वडा. देवळाच्या मागे समुद्रकिनार्‍याजवळ गोखल्यांच्या हॉटेलात. अप्रतिम चव (आणि गोखल्यांचे लोकेशनसुध्दा)
rassa-wada

मालोजीराव's picture

27 Aug 2013 - 7:01 pm | मालोजीराव

चिकन्/मटणाचा शिळा रस्सा देतो असा संशय आहे

अशी मिसळ कुठे देतात याच्या शोधात आहे

बॅटमॅन's picture

28 Aug 2013 - 12:35 pm | बॅटमॅन

मीही!!! गेलाबाजार फिश करीसुद्धा चालेल असे वाटते.

फिशकरी मिसळीत /कट म्हणून बरी लागेल असं थिऑरिटिकली वाटत नाही. मिसळ / कट हा तर्री बेस्ड असतो. फिशकरी त्या मानाने खोबरे आणि अन्य मसाल्यांमुळे त्या गटातली वाटत नाही. काही ठिकाणी फिशकरीही लालभडक तर्रीवाली (अंडाकरीसारखी) बनवतात. पण मुळात गोवन किंवा कोंकणातली फिशकरी ही कट म्हणून तेवढी योग्य चवीची / टेक्स्चरची वाटणार नाही.

बॅटमॅन's picture

28 Aug 2013 - 12:56 pm | बॅटमॅन

हम्म तेही खरंच म्हणा. काय माहिती एखादी "कोकणी" आवृत्ती कुणी तयार करेलही याची.

मात्र फिशकरीत आप्पे आणि मटण रश्श्याबरोबर थालीपीठ चांगले लागेल का?
(गविंनी उद्युक्त केले असा विचार करायला ;))

फिशकरी आणि मटणकरी हे दोन्ही स्वतःमध्ये स्वादाचं वर्चस्व असलेले (फ्लेवर इंटेन्स) पदार्थ आहेत. त्यासोबत थालीपीठ हा दुसरा फ्लेवर इंटेन्स पदार्थ खाऊन दोन्हीची स्वतंत्र चव मारली जाईल. अशा मसालेदार रश्श्यासोबत त्याच्या स्वादाची थेट तीव्रता कमी करु शकणारा आणि मूळ स्वादात काही बदल न घडवणारा न्यूट्रल साथीदार (भाकरी, भात) हेच चांगले लागतील.

आप्पेसुद्धा बर्‍यापैकी मसाला / मिरची / स्वाद घालून बनवलेले असतात असं पाहिलं आहे. आप्प्यांचा इडलीइतका प्लेन प्रकार असेल तर तो मटण / चिकन रश्श्यासोबत चांगला लागेल.. लागेल कशाला, लागतोच.. तसा इडली / जाड डोसा / आप्पम आणि रस्सा असा बेत द. भारतात अनेक घरांत बनवतात आणि खातातही.

आप्पमची आठवण करून दिलीत, आता हे खाणे आले.

अवांतरः आप्पम हा आप्प्यांचा प्रकार बहुतेककरून नव्हे.

आप्पम हा आप्प्यांचा प्रकार नक्कीच नव्हे..

अगदी.

आप्पे म्हणजे छोटे गोल गोळे.

Appe

आप्पम म्हणजे जाड जाळीदार घावनाचा अवतार.

Appam

बॅटमॅन's picture

28 Aug 2013 - 4:41 pm | बॅटमॅन

अजून एक शंका. घावन म्हंजे नीरडोसा, बरोबर? त्याच्या आणि आप्पमच्या पिठात फरक असतो भौतेककरून. नीरडोश्याचे पीठ आंबवत नाहीत बहुधा.

घावन निराळे आणि नीरदोसा निराळा. इफ आयाम नॉट राँग नीरदोशाचं पीठ नारळाच्या दूधात भिजवतात.

बॅटमॅन's picture

28 Aug 2013 - 9:03 pm | बॅटमॅन

नारळाच्या दुधात? घरी मातु:श्रींना एकदा करण्याची रिक्वेष्ट केली होती. दोश्याची चव अगदी हाटलातल्यागत झाली होती पण नारळाच्या दुधात कै घातले नव्हते. असो, पाहून सांगतो इकडेतिकडे.

प्रभाकर पेठकर's picture

29 Aug 2013 - 2:10 am | प्रभाकर पेठकर

नीर दोसा आणि घावन हे दोन्ही प्रकार एकच आहेत असे मला वाटते.
नीर डोश्यात नारळाचे दूध वापरण्याची पद्धत आहे पण साध्या पाण्यात पीठ भिजवूनही नीर डोसा करतात. तसेच, तांदूळाचे पीठ भिजवून जसे नीर डोसे करतात तसेच तांदूळ रात्रभर भिजवून, सकाळी मिक्सरमध्ये फिरवून अगदी मुलायम पीठ बनवून पाणी घालून ही बनवितात.
घावन सुद्धा वरील प्रमाणेच दोन्ही प्रकारे करतात. मात्र घावन करताना नारळाचे दूध वापरल्याचे कधी ऐकले नाही.

ओह ओक्के. माहितीकरिता धन्यवाद पेठकरकाका!

चिंतामणी's picture

31 Aug 2013 - 5:20 pm | चिंतामणी

इथे नीरदोस्याची सचीत्र पाकृ टाकलेली आहे.

खरतर अप्पम बरोबर जी मटण रस्सा वा चिकनची चव लागते ती अगदी अप्रतिम म्हणावी लागेल.

प्रभाकर पेठकर's picture

30 Aug 2013 - 10:00 am | प्रभाकर पेठकर

कुठल्याही मांसाहारी रश्याला तांदूळाचे पदार्थच न्याय देऊ शकतात. जसे, सधा भात, अप्पम, सेट किंवा दावणगीरी डोसा, आंबोळ्या, नीर डोसा इ.इ.इ.

कपिलमुनी's picture

30 Aug 2013 - 10:49 am | कपिलमुनी

काही भागात जावई बापु साठी खास बेत असतो ...मटण चा दाट रस्सा रत्री करून ठेवतात आणि सकाळी तांदळाच्या गरम डोसे किंवा आप्पे करतात ..
आप्पे त्यात बुडवून खायला लै भारी लागता ...

बॅटमॅन's picture

30 Aug 2013 - 12:09 pm | बॅटमॅन

जाहीर अणुमोदण!!!!!! नादच नै करायचा.

चिकन्/मटणाचा शिळा रस्सा देतो असा संशय आहे
अशी मिसळ कुठे देतात याच्या शोधात आहे

मीही!!! गेलाबाजार फिश करीसुद्धा चालेल असे वाटते.

ठिकाण सापडले..!!!

कर्वे रोड - यात्री हॉटेलजवळ चिकन मिसळ मिळाली. चिकन खीमा + फरसाण + रस्सा असा प्रकार होता. आवडला.

.

वा... तोंडाला पाणी सुटले आणि तुझी लिहण्याची शैली पणा झकास!!! :)

अमोल केळकर's picture

26 Aug 2013 - 10:13 am | अमोल केळकर

क्या बात है ! मस्तच :)

अमोल केळकर

सविता००१'s picture

26 Aug 2013 - 10:15 am | सविता००१

सुंदरच. पण अपर्णाताई तुझा त्रिवार निषेध. सक्काळी सक्काळी हपिसात आल्यावर त्रास दिलास म्हणून. ;)

कोमल's picture

26 Aug 2013 - 10:20 am | कोमल

तोंपासु अप्पी तै..
लै भारी.. कोलापूरला घिऊन गेलातकी सक्काळ सक्काळी..

दत्ता काळे's picture

26 Aug 2013 - 10:39 am | दत्ता काळे

श्रावणी सोमवारचा उपास मोडला. खाण्याची तीव्र इच्छा झाली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Aug 2013 - 10:48 am | डॉ सुहास म्हात्रे

पाकृ आणि लिखाणासाठी __/\__ __/\__ __/\__ !

एक मस्त रेस्त्रॉ टाका, अश्याच नाट्यमय पद्ध्तीने सेवा द्यायची व्यवस्था करा. एक वेगळी गुर्मे प्लेस म्हणून टेरिफिक चालेल. पेप्राबिप्रात नक्की छापून येईल :)

अभ्या..'s picture

26 Aug 2013 - 11:38 am | अभ्या..

त्रिवार सहमत,
अपर्नातई पण लोक खायला येतील का तुझ्या अशा रसाळ गप्पा ऐकायला?
दोन्हीचे कोम्बो अर्थातच लाजवाब :)
लै म्हणजे लै म्हणजे लैच भारी

स्पंदना's picture

27 Aug 2013 - 5:25 am | स्पंदना

मृणालिनी, अमोल, सविता, कोमल, दत्ता काळे, अन इस्पिकचा राजा मनापासुन धन्यवाद.

सविता ००१ निषेधाची नोंद घेतली गेली आहे. ००७ यावर काम करतील. या क्षणी ते कटात बुडाले आहेत, वर आले की लग्गीच पाठवते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Aug 2013 - 11:11 am | डॉ सुहास म्हात्रे

ऑ !!! आमचं एक्क्यावरून राजावर डिमोशन कां बरं ??? आम्ही चांगलाच प्रतिसाद लिहीला होता ;) :)

स्पंदना's picture

30 Aug 2013 - 7:27 am | स्पंदना

आयो! आवं लय माणसांची नाव घ्याया लागल्याने (ऑ? काय लिहीते आहे मी? देवा! वाचव!) जरा उपाधी बदलली. माफी असावी एक्का साहेब, उगा खेळी नका उलट्वु जी!

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Aug 2013 - 5:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

फिकर णॉट.... होतं कधीकधी असं. थोडी गंमत केली होती इतकंच :)

झकासराव's picture

26 Aug 2013 - 10:48 am | झकासराव

कहर!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

रुमानी's picture

26 Aug 2013 - 11:06 am | रुमानी

एकदम झकास.........!!

त्रिवेणी's picture

26 Aug 2013 - 12:15 pm | त्रिवेणी

आता 440 करंट ला भेट द्यावी लागणार.
ताई उपवासाच्या दिवशी नका हो अश्या रेशीपी टाकत जाऊ.

नित्य नुतन's picture

26 Aug 2013 - 12:39 pm | नित्य नुतन

वा वा सुन्दर ... वीकांताला करुनच बघते...

दिपक.कुवेत's picture

26 Aug 2013 - 12:54 pm | दिपक.कुवेत

मिसळिच्या कटासारखेच झणझणीत लेखन.....नुसतं वाचुनच भुक चाळवली. ओ मॅडम एक विनंती आहे....ह्या पुढे तु नुसती पाकॄ/फोटो तरी टाक किंवा नुसतं रसाळ्/ओघवतं लिखाण तरी कर.....हे असलं वाचुन वर जळवणारे फोटो पहायचे म्हणजे ये सरासर नाईन्साफि है|

पैसा's picture

26 Aug 2013 - 1:24 pm | पैसा

बटाटेवड्यांपर्यंत पोचेपर्यंत जीव गेला. मग कटापर्यंत पोचले तेव्हा आत्मा अमर आहे याची खात्री पटली आणि कटवडे बघितले तेव्हा राहिलेला आत्मा पण मोक्षाला पोचला! काय लिहिलंय जबरदस्त!!

अत्रुप्त आत्मा's picture

26 Aug 2013 - 10:58 pm | अत्रुप्त आत्मा

@ मग कटापर्यंत पोचले तेव्हा आत्मा अमर आहे याची खात्री पटली >>> =))

https://lh3.googleusercontent.com/-95GmYXZZbNI/Uhq63YPTkfI/AAAAAAAABHk/Z46CkLqWoPQ/w629-h549-no/2013-07-22+18.26.52.jpg
......................http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/big-drooling-smiley-emoticon.gif

या प्रतिसादाला माझा दंडवत गो बाय!

सस्नेह's picture

28 Aug 2013 - 5:54 pm | सस्नेह

म्हणजे आत्मुस मरेपर्यंत नव्हे तर अ-मरेपर्यंतसुद्धा अतृप्त राहाणार की काय ?

अत्रुप्त आत्मा's picture

28 Aug 2013 - 8:27 pm | अत्रुप्त आत्मा

=)) तुंम्ही कित्तिही काहिही म्हणलात,,,तरी... मी अ मर आहे...च्च! =))

गणपा's picture

26 Aug 2013 - 1:28 pm | गणपा

सपशेल दं ड व त स्विकारावा.

कपिलमुनी's picture

26 Aug 2013 - 8:05 pm | कपिलमुनी

तुमीबी उतरा की आखाड्यात !

लै दिस झाले ...

आदूबाळ's picture

28 Aug 2013 - 8:35 pm | आदूबाळ

+१

गणपाभौंची पाकृ पाहूल लय दिवस झाले...

रोहिणी पानमंद's picture

26 Aug 2013 - 1:46 pm | रोहिणी पानमंद

मस्तच!!!!!!! छान, सोपी पाककृती.

प्रभाकर पेठकर's picture

26 Aug 2013 - 1:55 pm | प्रभाकर पेठकर

काय योगायोग आहे पाहा. आजच मुंबईचा 'उसळ-पाव' करण्याचा बेत आहे. आणि त्यात कट-वडाची पाकृ आली. उसळपाव आणि कटवड्याची पाककृती अगदी सख्खी भावंडं वाटतात.

कटवड्याच्या कटाचा कट करण्यात येईलच.

कपिलमुनी's picture

26 Aug 2013 - 3:08 pm | कपिलमुनी

आवडलेली कट कट कट

त्रिवेणी's picture

26 Aug 2013 - 3:31 pm | त्रिवेणी

काका
उसळ-पाव चे फोटो आणि पाक्रूची वाट बघते, लवकर येऊ द्या प्लीज.

प्रभाकर पेठकर's picture

26 Aug 2013 - 4:23 pm | प्रभाकर पेठकर

कालरात्री सोडा घालून पांढरे वाटाणे भिजवले होते. आज स़काळी कुकरला २(च) शिट्या घेऊन शिजवले पण तरीही अतिशिजले. कांहीचे पीठ झाले त्यामुळे उसळ फसली.
पुढच्या खेपेस जास्त काळजी घेऊन शिजविन आणि मिपावर पाकृ टाकेन.

स्पंदना's picture

27 Aug 2013 - 5:31 am | स्पंदना

सोडा का घालायचा?

प्रभाकर पेठकर's picture

27 Aug 2013 - 9:13 am | प्रभाकर पेठकर

सोडा का घालायचा?

गरज नाही. वाटाणे नीट शिजणार नाहीत ह्या अनाठायी भिती पोटी सोडा घातला होता. पण अनुभवातून शहाणपण आले आहे. असो.

तुमच्या कोल्हापुरातला हाच झणझणीत कट-वडा आमच्या मुंबईत माझ्या लहानपणी (साठच्या दशकात) मिळायचा. अनेकदा खाल्ला आहे. सध्याची परिस्थिती माहीत नाही.

अनन्न्या's picture

26 Aug 2013 - 7:18 pm | अनन्न्या

आता करून खायलाच पाहिजे!

आनन्दिता's picture

26 Aug 2013 - 7:33 pm | आनन्दिता

कट कट करत असते ही ताईटली नेहमी!, :) :)

पहिल्या रांगेतल्या दुसर्या फोटो मधली माझी प्लेट आवडली... =))

कपिलमुनी's picture

26 Aug 2013 - 8:10 pm | कपिलमुनी

कट वडा खावा तर खासबागच्या मागे !
सांगली कोल्लापूर ला गोल वडा मिळतो त्याचे कव्हर जाड असते... तसाच वडा खायला मज्जा येते ..

>>आवरणाच्या साहित्यात पाणी मिसळुन भजीच्या पिठासारखे घट्टसर भिजवा.
अपर्णाताय.. परफेक्ट जमलाय बघा!!

इष्टुर फाकडा's picture

26 Aug 2013 - 11:03 pm | इष्टुर फाकडा

अगगागागागा हाण तिच्या xxxx

निमिष ध.'s picture

27 Aug 2013 - 12:16 am | निमिष ध.

या विकन्ताला करुन पहाणे आले. त्या शिवाय जळजळ कमी होणार नाही.

स्पंदना's picture

27 Aug 2013 - 5:34 am | स्पंदना

गणपाभाउ, रोहीणी,श्रुती, झकासराव,दिपक.कुवेत,त्रीवेणी, अन नित्य नूतन, निमिष ध धन्यवाद.
कपिलमुनी, अन इष्टुर फाकडा अनेक धन्यवाद.

कपिलमुनी तुम्ही आपल्या कोल्हापुरचे? :)
आनंदिता..आता तू तर येत नाहीस मग प्लेट ठेवुन काय करु? म्हणुन वापरली.

मीनल's picture

27 Aug 2013 - 1:34 am | मीनल

मिसळ पाव बरोबर जो कट मिळतो तो हाच का?
मटकी भिजलेली तयार आहे. मिसळ पाव करेन म्हटते.

स्पंदना's picture

27 Aug 2013 - 5:13 am | स्पंदना

त्यातच चार वडे पण तळा मीनलाक्का!
येकदम नादखुळा होउन जाइल घर तुमच.

उपास's picture

6 Oct 2013 - 11:20 pm | उपास

हायला कहर आहे..
अपर्णाबेन मिसळपुराण थांबवा आणि कटवडा करा असं कंठशोष करुन सांगतेय तरी पुन्हा तेच 'मिसळपाव करेन'.. वडे नाही केलेत तर शेजारणीला सांगा.. म्हणजे तुमचा कट आणि तिचा वडा :))

अपर्णातै, लयीच जळवणूक.. पुण्यात कुठेशी मिळेल बर! सँपल वडा मला तरी अगदीच पिचकावणि वाटतो मजबूत कट आणि त्यात मुसमुसलेला वडा असं पाहिजे :) बरं ह्या पाकृ ला लागणारा एकंदर वेळ किती? त्यावरुन ठरवण्यात येईल की स्वतः करायचं की आउटसोर्स ते ;)

श्रीरंग_जोशी's picture

27 Aug 2013 - 6:13 am | श्रीरंग_जोशी

काय माहोल पाककॄती आहे;
येकदम खतरा दिसत आहे.

निवेदिता-ताई's picture

27 Aug 2013 - 8:56 am | निवेदिता-ताई

झक्कास.................मलाही कटाची कॄती हवी होती...आता करुन पहाते

वडे असलेला फोटो काय झकास आलाय. तोंडाला पाणी सुटले अगदी.
कट वडा करून मोठा कटच केला आम्हा भुकेलेल्यांवर.

मी_आहे_ना's picture

27 Aug 2013 - 11:45 am | मी_आहे_ना

वाह...जबरी! तों पा सु आणि लगेच वीकांताला ही पाकृ चाखण्याचा कट शिजलाय
:)

पेस्तन काका's picture

27 Aug 2013 - 11:59 am | पेस्तन काका

सकाळी ह्या निर्जन वस्तित (ज्यास IT PARK हिन्जवडी असे म्हणतात) हे असे कट बघीतले कि पोटाल खड्डा पडतो हो..:(

स्वाती दिनेश's picture

27 Aug 2013 - 12:11 pm | स्वाती दिनेश

कटवडा लै भारी जमलाय..
स्वाती

सूड's picture

27 Aug 2013 - 2:12 pm | सूड

मस्तच !!

कवितानागेश's picture

27 Aug 2013 - 2:35 pm | कवितानागेश

अपर्णाताई, मला दत्तक घे ना थोडे दिवस! :D

सौंदाळा's picture

27 Aug 2013 - 2:38 pm | सौंदाळा

मी तर वार लावुन जेवणार.
अपर्णाताई, सानिकाताई, पेठकरकाका, गणपाभाऊ, जागुताई, खादाड अमिता (सोम ते शनि) आणि रविवार गविंसोबत हॉटेलिंग ;)

स्पंदना's picture

27 Aug 2013 - 3:34 pm | स्पंदना

भागो!

ए माऊ मांडीवर मावशील का दत्तक विधानाला?

सानिकास्वप्निल's picture

27 Aug 2013 - 5:52 pm | सानिकास्वप्निल

साष्टांग दंडवत गो ताय :)
__/\__ __/\__ __/\__ __/\__

पप्पुपेजर's picture

27 Aug 2013 - 6:55 pm | पप्पुपेजर

लाइक केल्या गेले आहे !!!

चेरी's picture

27 Aug 2013 - 9:44 pm | चेरी

फोटो, रेसिपी आणि लेखन शैली आवडले.

सखी's picture

27 Aug 2013 - 9:57 pm | सखी

कहर आहे तु आणि तुझ्या पाकृसुद्धा, शेवटुन दुसरा फोटु अप्रतिम. मी तरी जेवतानाच वाचली पाकृ तरी जळजळ झालीच.

भडकमकर मास्तर's picture

27 Aug 2013 - 10:50 pm | भडकमकर मास्तर

वा मस्त पाकृ

काळा पहाड's picture

27 Aug 2013 - 11:40 pm | काळा पहाड

ओ नका ओ या पुण्या मुंबई वाल्यांना कोल्हापूरच्या पाककृती सांगू. नंतर त्यात दही बिही घालून पुणेरी कटवडा करून त्याचा अपमान करतात! वर कटवड्याची किंमत पण वाढवून त्याला उगीचच महाग करून ठेवतात. या दुर्दैवी जीवांना बसू दे उसळपाव (मुंबईवाले) आणि तो लेचा पेचा वडापाव (पुणेवाले) खात.

बादवे, कटवडा हा ब्रेडबरोबर (तोही लादीपावाला कापून बनवलेल्या) खायचा विषय आहे, पावाबरोबर नव्हे. निषेध!

स्पंदना's picture

28 Aug 2013 - 5:56 am | स्पंदना

बादवे, कटवडा हा ब्रेडबरोबर (तोही लादीपावाला कापून बनवलेल्या) खायचा विषय आहे, पावाबरोबर नव्हे. निषेध!

तो सकाळी सकाळी भाजलेला जरा वाकडा तिकडा पण भारी मउ लुसलुशीत पाव म्हणजे काय सांगु? तो कापायला त्या बेकरीवाल्याची पातळ सुरी. आहाहा!
अगदी साताला ब्रेड भाजल्याचा वास दरवळायच, बरोबर बिस्किट (आता कुकीज). चवी हरवल्या राव!

शिवोऽहम्'s picture

28 Aug 2013 - 2:00 pm | शिवोऽहम्

अगदी! पाव म्हणजे तोच. खेमराज जवळ सकाळी ब्रेड भाजल्याचा वास बी.टी. कॉलेजपर्यंत पसरलेला असायचा. विद्यापीठाच्या जवळ असलेला शामचा वडा आणि कटवडा लऽऽऽय भारी! तसाच राजारामपुरी १०व्या गल्लीतल्या गणेशचा!

एकदम भारी आठवणी आहेत तिथल्या, बागल चौकातल्या, राजारामपुरीतल्या.

कोल्हापुरी जगात भारी गं ताई!

कुसुमावती's picture

29 Aug 2013 - 2:26 pm | कुसुमावती

क्या बात है शिवोऽहम्! कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या. शिवाजी विद्यापीठात आमच्या बॅडमिंटनच्या स्पर्धा असायच्या. मॅच आम्ही जिंको अथवा हरो शामचा वडा खाल्याशिवाय जायचा नाही असा आमचा नियम(च) होता. शामच्या वडा इतकाच मंगळवार पेठेतला अनेगाबी लई भारी.

प्रभाकर पेठकर's picture

29 Aug 2013 - 2:28 pm | प्रभाकर पेठकर

अनेगाबी

म्हणजे काय?

अनेगा वडा सेंटर आहे कोल्हापुरात मंगळवार पेठेत.

ते अनेगाबी च्या ऐवजी अनेगा बी असे वाचावे.