Skip to main content

प्रवासी

लेखक सार्थबोध यांनी बुधवार, 21/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवासी जीवन प्रवास गूढ, कोणी कसा केला कोणी हसत निभावले, रडून कोणी केला ll १ ll प्रवासी दिसले कोणी, चालता पथात एकलाच गेला कोणी, हात कोणी केला ll २ ll साथीदार कोणाचा, सोडूनी मधेच गेला संपले तिथेच कोणी, मार्गस्थ कोणी झाला ll ३ ll प्रवास दूरचा, निश्चय निघताना केला प्रारंभीच कोणी, शेवटी कोणी विसरला ll ४ ll प्रवास तत्व ठरले, खुणगाठ बांधलेला मोडले तत्व कोणाचे, प्रवास कुणाचा तुटला ll ५ ll कधी बिकट कधी सोपी, संमिश्र वाट होती थकला मधेच कोणी, कोणी खुणा सोडूनी गेला ll ६ ll प्रवास पूर्ण कोणाचा, हर्षोल्हास कोणा झाला नि:श्वास सोडला कोणी, साजरा कोणी केला ll ७ ll प्रवासी अनेक पंथी, दर्जा कोणाचा कसला विस्मृतीत गेला कोणी, पुतळ्यात कोणी वसला ll ८ ll संपला प्रवास ज्यांचा, अनुमान हिशोब केला व्यर्थ; शून्यप्राप्ती कोणा, अर्थपूर्ण कोणाचा झाला ll ९ ll
लेखनविषय:

वाचने 617
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

मस्त वर्णन केले आहे