(अनुवादीत. कवी-इंदीवर)
हरवून बसलो मी सर्वस्व माझे
तुझ्याच प्रीतिसाठी
का सोडीले तुझ्या प्रीतिने मला
दारो दारी भटकण्यासाठी
आंसवे नयनातली नाही ओघळली
विचार मनातले नाही बोलले
छपवूनी मनात ते मी फिरतो
घुटकर मरण्यासाठी
तुझ्याच प्रीतिसाठी
झालीस ज्याची राहशी त्याची
लख लाख लाभो तुला प्रीतिची
थबकट माझी दुःखी चीतेवरी
जीवंत जळण्यासाठी
तुझ्याच प्रीतिसाठी
श्रीकृष्ण सामंत
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1265
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया