✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रात्रीस उखाणा सुचला

प — प्रसाद साळवी, गुरुवार, 07/25/2013 - 22:51
मी शब्द तुला सुचलेला, उधळून लावीतो कविता मी सूर उसवले दोन्ही, तिसर्‍याच्या उदयाकरता बघणार्‍या नजरांमधले वाटेत थांबले अंतर नजरेच्या क्षितिजाआडून सतरंगी जंतरमंतर वाजवता रंग उद्याचे, शत-गंध मोकळे होती ओघळत्या सेकंदांचे अडवून ठेवले मोती देऊळ-खांबा पक्षी क्षत-पंख पुसे इवलासा रदबदली अंधाराशी, हा निव्वळ फोल दिलासा वितळत्या भूतकाळातून निसरडी पाऊले आली घमघमत्या आज-उद्याशी आडवी-तिडवी रमली कधी स्तब्ध उभ्या असलेल्या, डोंगरमाथ्याआडून मुक्त स्वरांनी सरिता नाचते जाणीवा विसरून

प्रतिक्रिया द्या
2651 वाचन

💬 प्रतिसाद (6)

छान आहे,पण शृंगार रस म्हणवा

अत्रुप्त आत्मा
Fri, 07/26/2013 - 00:04 नवीन
छान आहे,पण शृंगार रस म्हणवा तसा फुलला नाही. प्रेम रस मात्र भरपूर आहे. :)
  • Log in or register to post comments

शृंगार बिंगार तर सोडा,

अभ्या..
Fri, 07/26/2013 - 00:52 नवीन
शृंगार बिंगार तर सोडा, ओळीच्या शेवटाचे अक्षर शेम हाय एवड्च क्वालीफिकेशण मला तर दिसलं. :( बाकी अजुन काय कोणाला आढ्ळल्यास समजावून सांगण्याची कृपा करावी ही नम्र विनंती. गुर्जींना पण भर्पूर प्रेम रस कूठे दिसला कुणास ठाऊक. बहुधा ते स्वतःच प्रेमस्वरुप झाले असावेत. ;)
  • Log in or register to post comments

@बहुधा ते स्वतःच प्रेमस्वरुप

अत्रुप्त आत्मा
Fri, 07/26/2013 - 10:02 नवीन
@बहुधा ते स्वतःच प्रेमस्वरुप Image removed.झाले असावेत. smiley>>> =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अभ्याशी सहमत

काकाकाकू
Fri, 07/26/2013 - 02:47 नवीन
काहि कळले नाहि. कोणीतरी रसग्रहण करुन समजवून सांगेल का?
  • Log in or register to post comments

मला आवडली कविता, मधली दोन

स्पंदना
Fri, 07/26/2013 - 07:50 नवीन
मला आवडली कविता, मधली दोन कडवी नाही समजली पण बाकिचे कळले अन आवडले सुद्धा!
  • Log in or register to post comments

अरे तुम्ही सगळे एव्हढ छान कस

म्हैस
Fri, 07/26/2013 - 17:07 नवीन
अरे तुम्ही सगळे एव्हढ छान कस काय टाइप करताय? अवघड आहे बुवा.......
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा