Skip to main content

पर्णोपर्णी

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 23/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
घुमता वात वनावनातून कुजबूज ये पानसळीतून जाता वारा जरा विरून स्तब्ध शांतता वृक्षलतातून ll १ ll धूळ उडे स्थलांतरातून हर पर्ण ये मातीत लिंपून येई जे नभ जलभारून नवसंजीवन कणाकणातून ll २ ll पर्णे गुंतती कळ्याफुलातून काही झुलती फांदी-फांदीतून कोणी सांडती गळती वाळून जीर्ण अमोलिक पुस्तकातून ll ३ ll नव्या कुणास दव गोंजारून ये नवजीवन अंकुरातून कोणी पडला देठ मोडून हेळसांड तयाची पाचोळ्यातून ll ४ ll - सार्थबोध
लेखनविषय:

वाचने 679
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया