सुसला / Susalaa

टक्कू's picture
टक्कू in पाककृती
22 Jul 2013 - 6:46 pm

नव्याने कळलेला पदार्थ, सुसला :)

परवा माझ्या मोठ्या काकूने घरी बनवलेल ताजं मेतकूट दिलं. वास्तविक मला मेतकूट ह्या प्रकाराबद्दल फारसं प्रेम नाही. म्हणून मी सहज म्हणाले कि अगं जास्त देऊ नकोस. ती पट्कन म्हणाली कि सुसला करुन बघ. मला हे नावच नविन होतं. माझ्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्ह बघून तिने लगेच recipe सांगितली. कर्नाटक side ला बनणारा हा पदार्थ. साधी सोप्पी recipe with मेतकूट touch ताबडतोब बनवून चाखला आणि माझ्या आवडत्या पदार्थ यादीत भर पडली :)
कदाचित ब-याच जणांना माहित असलेला आणि कदाचित ब-याच जणांना माहित नसलेला सुसला इथे share करत आहे. नक्की करून बघा. हो पण त्यासाठी काकूने बनवलेलं चविष्ट मेतकूट हवंच हवं :)

साहित्यः
५ वाट्या भडंग चुरमुरे
२ कांदे
फोडणीसाठी मोहरी, हिंग, हळद, कढिपत्ता, हिरव्या मिरच्या
मीठ, साखर चवीनुसार
४ tp sp मेटकूट

कृती:
१. आपण पोहे करतो तशीच हि कृती आहे. कढई मध्ये तेल गरम करावे. त्यात मोहरी, हिंग, हळद, कढिपत्ता, मिरची अशी सुरेख फोडणी करावी.
२. फोडणी मध्ये चिरलेला कांदा घालावा. किंचित मीठ व साखर घालून झाकण ठेवून वाफ काढावी.
३. एका चाळणी मध्ये चुरमुरे धुवुन घ्यावेत व पाणी निथळू द्यावे. कांदा शिजला कि त्यात हे चुरमुरे घालावे. चविनुसार मीठ, साखर घालून चांगले ढवळावे. झाकण ठेवून एक वाफ काढावी.
४. आता त्यात मेतकूट घालावे. ते छान एकत्र करुन परत झाकण ठेवावे व परत एक वाफ काढावी.

बास.. गरमागरम सुसला ताव मारण्यासाठी तय्यार आहे :)

1
2
3
4
5
6
7
8
9

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

22 Jul 2013 - 6:50 pm | पिलीयन रायडर

वा वा... मस्तच..!!
माझी आई हेच मेतकुट न टाकता "सुशीला" म्हणुन करते!!

अवांतरः- काय पण नाव असतात पदर्थांची... सुशीला, मणिकपैंजण (फोडणीची पोळी!) आणि अजुन काय काय..

प्रभाकर पेठकर's picture

23 Jul 2013 - 1:24 am | प्रभाकर पेठकर

मणिकपैंजण (फोडणीची पोळी!)

वा..वा माझी श्रीरामपुरची मावशी वापरायची हा शब्द. लहानपणी तिच्याकडे गेलो असताना सकाळी भूक लागली म्हणून विचारावं 'काय करते आहेस खायला?' की कधी कधी कानावर यायचं 'माणिकपैंजण'. आम्हाला कळायचं नाही हा काय प्रकार आहे. ताटलीत वाढून आला की कळायचं 'अरे! हा तर पोळीचा कुस्करा'. तो तर आवडीचा त्यामुळे माणिकपैंजण शब्द मनावर कोरला गेला.

आमच्याकडे फोडणीची पोळी = शाही तुकडा! ;)

पहिल्यांदाच असा पदार्थ पाहिला.
नावही प्रथमच ऐकतोय.
थोडक्यात कांदा पोह्यां सारखच. फक्त पोह्यां ऐवजी कुरमुरे वापरलेत शिवाय सोबतीला मेतकुटाचा तडका.

अनन्न्या's picture

22 Jul 2013 - 7:04 pm | अनन्न्या

की न धुता वापरून जास्त चांगले वाटेल? खरच पहिल्यांदा पाहिला हा पदार्थ!

सखी's picture

22 Jul 2013 - 10:44 pm | सखी

हेच विचारणार होते, चुरमुरे मऊ नाही पडत का?
माझी मामी सोलापुर साईडची आहे, ती थोड्याशा भाजलेल्या पातळ पोह्यात, कांदा, टोमॅटो, तिखट, मीठ, लिंबू आणि असे मुख्य म्हणजे हे मेतकुट घालायची, खूप छान लागते ते. आणि कधी कंटाळा आला असताना असे खाल्ले बरोबर एखादं पुस्तक आणि बाहेर पाऊस असला की कंटाळाही पळून जातो :)

टक्कू's picture

22 Jul 2013 - 10:47 pm | टक्कू

अनन्न्या चुरमुरे पोह्यांसारखे खूप धुवायचे नाहीत.
मेतकूट घालून वाफ काढल्यामुळे चुरमुरे न धुता वापरले तरी मऊ होतील.

पिलीयन रायडर's picture

23 Jul 2013 - 12:59 pm | पिलीयन रायडर

अग छान मऊ होतात..
चुर्मुरे पाण्यातुन काढले की ओलसर होतात आणि मग फोडणी मध्ये छान मऊ..
आणि हे सगळं फार मस्त लागतं!!

छानच पदार्थ आहे. वेगळा आहे.

विजुभाऊ's picture

22 Jul 2013 - 7:21 pm | विजुभाऊ

आमच्या सातार्‍याकडे असल्याच भारी नावाचा एक पदार्थ आहे.
त्याचे नाव " म्हाद्या"
कांदा आनि शेंगदाण्याची भाजी असते.
भरपूर कांदा घालून केलेली शेम्गदाण्याची भाजी किंवा भरपूर शेंगदाणे घालून केलेली काम्द्याची भाजी.
रेशीपी टाकतो कधितरी.

भावना कल्लोळ's picture

23 Jul 2013 - 5:22 pm | भावना कल्लोळ

आमच्या तासगावच्या आजीने केली होती, मी लग्नानंतर पहिल्यांदाच गेले होते आणि परतीच्या वाटेवर आजीने भाकरी आणि मह्द्या दिला होता बनवुन.

देवांग's picture

22 Jul 2013 - 7:59 pm | देवांग

टक्कू.. टक्कू कसा बनवतात

टक्कू's picture

22 Jul 2013 - 10:26 pm | टक्कू

अमित टक्कू ची पाककृती माझ्या ब्लोग वर मिळेल. त्याचा दुवा हा इथे:
http://takkuuu.blogspot.in/2013/04/blog-post.html

धन्यवाद

सानिकास्वप्निल's picture

22 Jul 2013 - 10:34 pm | सानिकास्वप्निल

आम्ही ह्याला सुशीला म्हणतो :)

कवितानागेश's picture

22 Jul 2013 - 11:05 pm | कवितानागेश

मीपण हा पदार्थ फार वर्षांपूर्वी सुशीला याच नावानी चाखलाय. छान लागतो. :)

स्मिता चौगुले's picture

25 Jul 2013 - 8:29 am | स्मिता चौगुले

असेच म्हणते.. आमच्या सोलापुरात याला सुशीला असेच म्हणतात पण त्यात मेतकुट घालत नाहित
छान पोह्यासारखी फोड्णी देवुन, वरिल साहित्य+दाळे+शेन्गा+कढीपत्ता+कोथिम्बिर हे देखिल त्यात टाकतात आणि वरती लिम्बु पिळून वाढ्तात.

अभ्या..'s picture

25 Jul 2013 - 6:29 pm | अभ्या..

+१
कर्नाटक सीमेकडच्या गावात कॅन्टीनमध्ये नाश्त्याला हा विकत पण मिळतो.
वरुन दही घालून देतात. फक्त सकाळी लौकर मिळतो. दिवसभर नाही.

किसन शिंदे's picture

23 Jul 2013 - 1:42 am | किसन शिंदे

एकदम नविन पदार्थ! रविवारच्या सकाळी घरी नाश्ता म्हणून बनवून पाहायला हरकत नाही.

हो मी पण सुशिला म्हणुनच ऐकलाय हा पदार्थ!
पण माझ्या घरात चिरमुरे हे कुरकुरीतच असायला हवेत असा नियम आहे.
तरीही पोहे या पद्धतिने केले तर चालतील का?

टक्कू's picture

23 Jul 2013 - 10:08 am | टक्कू

साऊ पोहे पण चांगले लागतील. सखीने वर सांगितल्याप्रमाणे हि करुन बघता येतील.

जागु's picture

23 Jul 2013 - 11:32 am | जागु

मस्तच.

बॅटमॅन's picture

23 Jul 2013 - 11:50 am | बॅटमॅन

उत्तर कर्नाटकच्या काही मानबिंदू डिशेस आहेत त्यातलीच हीपण एक! लय खंग्री असतो तेच्यायला, आता घरला जाऊन फर्माईश करावी लागणार असं दिस्तंय :)

पाकृ चांगली आहे.. मी पण हे नाव कधी नाही ऐकले.

बालगंधर्व's picture

23 Jul 2013 - 9:03 pm | बालगंधर्व

थन्य्कु तक्खु, सुस्ला आवदली. :)
थय्क्नु मनपाअसुन.

"सुसलाया दाही बश्या" मध्ये फिट्ट बसेल बघा हा परतिसद ;)

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jul 2013 - 6:59 pm | अत्रुप्त आत्मा

आमच्यासाठी तर येकदम नवीन पदार्थ हाय...

आणी कसा विचाराल???..तर..आय हाय!..आय हाय!..आय हाय!

किसन शिंदे's picture

24 Jul 2013 - 12:52 pm | किसन शिंदे

हे आम्या बनवलेली 'सुशीला'!! ;)

1

त्रिवेणी's picture

24 Jul 2013 - 5:16 pm | त्रिवेणी

शिंदे सर,
फोटो दिसत नाय.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jul 2013 - 6:00 pm | अत्रुप्त आत्मा

@शिंदे सर,>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-059.gif

टक्कू's picture

24 Jul 2013 - 3:28 pm | टक्कू

अरे व्वा! मस्तच :)

.जेव्ह दिवाळीत किवा लग्न कर्यत उरलेला चिवडा किंवा एरवी हि मऊ पडलेल्या चिवड्याचा सद उपयोग आम्हि हा सुशिला करयला करतो :)

सौंदाळा's picture

25 Jul 2013 - 6:32 pm | सौंदाळा

सुशिला काय, म्हाद्या काय, मणिकपैंजण काय ऐकावे ते नवलच...
हटके पाकक्रुती. मेतकुट भात आवडत नाही अजिबात पण सुशिला खाल्ली पाहीजे एकदा ;)

प्रभाकर पेठकर's picture

25 Jul 2013 - 6:51 pm | प्रभाकर पेठकर

मेतकुट भात आवडत नाही अजिबात....

मला भयंकर आवडतो. वाफाळणारा आंबेमोहोर भात, घरचं साजुक तुप, किंचीत मीठ आणि खमंग मेतकुट. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असावा.
ह्या सुसला, सुशीला जे असेल ते बनवून पाहण्यासाठी आजच खमंग मेतकुट बनविले आहे. आता लवकरच सुसला बनविण्यात येईल. बाकी वरचेवर तुप,मीठ, भात, मेतकुट, घरगुती लोणचे हा बेत॑ होईलच.

मनिमौ's picture

13 Aug 2013 - 4:50 pm | मनिमौ

लय भारी

सुहास झेले's picture

13 Aug 2013 - 6:06 pm | सुहास झेले

भारीच.... पहिल्यांदा ऐकलं ह्या पदार्थाबद्दल. नक्की करून बघण्यात येईल :) :)

बासून्दी's picture

29 Aug 2013 - 11:34 am | बासून्दी

मेत्कुत कसे बनवतात्?कोनि सान्गेल का

गौरीबाई गोवेकर's picture

4 Sep 2013 - 12:30 pm | गौरीबाई गोवेकर

वेगळाच पदार्थ...करून वघणार.

शि बि आय's picture

1 Apr 2015 - 7:34 pm | शि बि आय

व्वा!! झकास... आता सुसला करायलाच हवे.... सोपी आणि परिपूर्ण रेसिपी आहे