सुसला / Susalaa
नव्याने कळलेला पदार्थ, सुसला :)
परवा माझ्या मोठ्या काकूने घरी बनवलेल ताजं मेतकूट दिलं. वास्तविक मला मेतकूट ह्या प्रकाराबद्दल फारसं प्रेम नाही. म्हणून मी सहज म्हणाले कि अगं जास्त देऊ नकोस. ती पट्कन म्हणाली कि सुसला करुन बघ. मला हे नावच नविन होतं. माझ्या चेहर्यावरचं प्रश्नचिन्ह बघून तिने लगेच recipe सांगितली. कर्नाटक side ला बनणारा हा पदार्थ. साधी सोप्पी recipe with मेतकूट touch ताबडतोब बनवून चाखला आणि माझ्या आवडत्या पदार्थ यादीत भर पडली :)
कदाचित ब-याच जणांना माहित असलेला आणि कदाचित ब-याच जणांना माहित नसलेला सुसला इथे share करत आहे. नक्की करून बघा. हो पण त्यासाठी काकूने बनवलेलं चविष्ट मेतकूट हवंच हवं :)
साहित्यः
५ वाट्या भडंग चुरमुरे
२ कांदे
फोडणीसाठी मोहरी, हिंग, हळद, कढिपत्ता, हिरव्या मिरच्या
मीठ, साखर चवीनुसार
४ tp sp मेटकूट
कृती:
१. आपण पोहे करतो तशीच हि कृती आहे. कढई मध्ये तेल गरम करावे. त्यात मोहरी, हिंग, हळद, कढिपत्ता, मिरची अशी सुरेख फोडणी करावी.
२. फोडणी मध्ये चिरलेला कांदा घालावा. किंचित मीठ व साखर घालून झाकण ठेवून वाफ काढावी.
३. एका चाळणी मध्ये चुरमुरे धुवुन घ्यावेत व पाणी निथळू द्यावे. कांदा शिजला कि त्यात हे चुरमुरे घालावे. चविनुसार मीठ, साखर घालून चांगले ढवळावे. झाकण ठेवून एक वाफ काढावी.
४. आता त्यात मेतकूट घालावे. ते छान एकत्र करुन परत झाकण ठेवावे व परत एक वाफ काढावी.
बास.. गरमागरम सुसला ताव मारण्यासाठी तय्यार आहे :)
वाचने
17297
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
वा वा... मस्तच..!!
In reply to वा वा... मस्तच..!! by पिलीयन रायडर
माणिकपैंजण.
In reply to वा वा... मस्तच..!! by पिलीयन रायडर
आमच्याकडे फोडणीची पोळी = शाही
पहिल्यांदाच असा पदार्थ पाहिला.
चुरमुरे मऊ नाही पडत?
In reply to चुरमुरे मऊ नाही पडत? by अनन्न्या
हेच
In reply to चुरमुरे मऊ नाही पडत? by अनन्न्या
मऊ होतात..
In reply to चुरमुरे मऊ नाही पडत? by अनन्न्या
अग छान मऊ होतात..
छानच पदार्थ आहे. वेगळा आहे.
म्हाद्या
In reply to म्हाद्या by विजुभाऊ
व्हय इजीभाऊ,
टक्कू
In reply to टक्कू by देवांग
टक्कू ची पाककृती
छान पदार्थ
In reply to छान पदार्थ by सानिकास्वप्निल
मीपण हा पदार्थ फार
In reply to छान पदार्थ by सानिकास्वप्निल
असेच म्हणते.. आमच्या
In reply to असेच म्हणते.. आमच्या by स्मिता चौगुले
+१
एकदम नविन पदार्थ! रविवारच्या
हो मी पण सुशिला म्हणुनच ऐकलाय
In reply to हो मी पण सुशिला म्हणुनच ऐकलाय by साऊ
चालतील ना!
मस्तच.
उत्तर कर्नाटकच्या काही
पाकृ चांगली आहे.. मी पण हे
In reply to पाकृ चांगली आहे.. मी पण हे by Mrunalini
थन्य्कु तक्खु, सुस्ला आवदली.
In reply to थन्य्कु तक्खु, सुस्ला आवदली. by बालगंधर्व
"सुसलाया दाही बश्या" मध्ये
आमच्यासाठी तर येकदम नवीन
हे आम्या बनवलेली 'सुशीला'!!
In reply to हे आम्या बनवलेली 'सुशीला'!! by किसन शिंदे
शिंदे सर, फोटो दिसत नाय.
In reply to शिंदे सर, फोटो दिसत नाय. by त्रिवेणी
@शिंदे सर,>>>
अरे व्वा!
आम्हि पण याला सुशिला च म्हणतो....!
सुशिला काय, म्हाद्या काय,
भयंकर आवडतो.
जबर
भारीच.... पहिल्यांदा ऐकलं
मेतकुत
वेगळाच
व्वा!! झकास... आता सुसला