Skip to main content

शब्द शब्द

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 17/07/2013 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द शब्द शब्दातच सारे शब्द जिव्हाळा शब्द उन्हाळा वडवानळ जळ शब्द पसारे एक एकट्या एकांताचे कूस छत्र घर शब्द सहारे मुक्या जाणिवा गभुळ जखमा आतुर माया शब्द शहारे नभ संचित आकाश पवन घन शब्दच वेडे ऋतु झरणारे खोल ओंजळी लाव्हा अंकित खुपणारे सल शब्द बोचरे शब्द उतारा सकल प्रार्थना आत्म संहिता शब्द खरे .....................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1375
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

रेखिव रचना:
मुक्या जाणिवा गभुळ जखमा आतुर माया शब्द शहारे नभ संचित आकाश पवन घन शब्दच वेडे ऋतु झरणारे
पण कां कोण जाणे या वेळेस जरा जमवून आणल्या सारखी वाटली. काका, रागावू नका, पण मला असे वाटले, कां मलाच नीट कळली नाही?