काय आहे आमच्याकडे ?
रंग नाही रूप नाही, काय आहे आमच्याकडे
सौंदर्याला तुझ्या द्यायला, न्याय आहे आमच्याकडे
ओळखीचे असेल तुला ते, हुरहुरणे पावसातले
सांगूच का तुला त्याचाही, उपाय आहे आमच्याकडे
ना सुगंध ना वारा, ना पाऊस ना गारा
शहारण्या तुला या सर्वांना, पर्याय आहे आमच्याकडे
मस्तीत तुझिया आम्ही, बेदुंध होऊ ऎसे
उधळून टाकू सारे, जे काय आहे आमच्याकडे
लिहशील तूही काही, कविता पावसा-धुक्यावर
घेशील जेव्हा भरभरून, जे काय आहे आमच्याकडे
कुठवर ऎकशील वेडे, गोष्टी तू ज्या अनुभवायच्या
ये इष्क कर जरासा समजेल, काय आहे आमच्याकडे
aflaatoon!
क्या बात है...
मस्त
मस्त.
****
झक्कास.........!
मला का कळ्ळी नाय ??
कारन
जियो
मस्त.
केवळ अप्रतिम
+1
मस्त
कुठवर ऎकशील वेडे, गोष्टी तू
खासच!
सर्वांना धन्यवाद
लढ बाप्पू...
+१
क्या बात है.
छान आहे.
जोरकस अन मस्त! आवडली कविता.