✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्प्लीट टोनिंग ( विषय :- व्यवसाय )

म
मदनबाण यांनी
Sun, 07/07/2013 - 13:44  ·  लेख
लेख
मंडळी कॄष्ण-धवल छायाचित्रण करण्यात मजा येते तसेच याच कॄष्ण-धवल चित्रांना हलक्या रंगाची छटा दिल्यास त्यात अजुन वेगळेपणा देखील आणता येतो... हेच स्प्लीट टोनिंग करण्यामागचा उद्देश असतो.मूळ चित्र आणि चित्रातल्या सावल्या यांना विविध कलरटोन मधे आणल्यास छायाचित्राला एक प्रकारचा वेगळेपणा येतो. मी मात्र संपूर्ण चित्रालाच एकाच टोन मधे ठेवले आहे, फक्त कलरटोन वेगवेगळे वापरले आहेत. तुम्ही सुद्धा ही पद्धत एकदा वापरुन पहाच... :) फुलझाडे विक्रेता:- P1 पॅ...पु पॅ... पु इडलीवाला :- P2 भाज्या कडाडल्या ! P3 गोड कापुस :) P4 सुरी /चाकु / कात्री धार लावुन मिळेल... P5 खिडक्या... P6 कपडे विक्रेता:- P7 भांडीय्योयोयोयो... P8 कॅमेरा :- निकॉन डी-५१०० मदनबाण.....
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
छायाचित्रण
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
6318 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

मस्त रे बाणा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/07/2013 - 13:59 नवीन
कृष्णधवल छायाचित्रे छान दिसत आहेत. अवांतर : फोटो काढायला तुम्ही ग्यालरीत बसता वाटतं ? चाकुवाला आणि भांडेवालीचे चेहर्‍यावरचे भाव बोलके आहेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

+१

रुस्तम
Sun, 07/07/2013 - 14:01 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१

कवितानागेश
Sun, 07/07/2013 - 15:45 नवीन
छान आलेत फोटो. हे करुन पहायला हवं.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद सर.अवांतर : फोटो

मदनबाण
Sun, 07/07/2013 - 15:46 नवीन
धन्यवाद सर. अवांतर : फोटो काढायला तुम्ही ग्यालरीत बसता वाटतं ? नाय ! गॅलरी नाय हाय. असती तरं लयं बर झाल असतं ! खिडकीत तंगड्या बाहेर काढुन बसतो... आणि टिपतो एक एक व्यक्तिमत्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

परफेक्ट....

रुस्तम
Sun, 07/07/2013 - 14:00 नवीन
परफेक्ट....
  • Log in or register to post comments

सहि रे

स्पा
Sun, 07/07/2013 - 14:44 नवीन
लय भारी
  • Log in or register to post comments

मदनबाण, मस्त फोटो आहेत

संजय क्षीरसागर
Sun, 07/07/2013 - 15:26 नवीन
नेहमीचा ब्लॅक अँड व्हाइट तुम्ही वेगळ्या पद्धतीनं हँडल केलायं.
  • Log in or register to post comments

माझेही चार आणे

स्पा
Sun, 07/07/2013 - 15:44 नवीन
१.Image removed. २.Image removed. ३.Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त !

मदनबाण
Sun, 07/07/2013 - 15:50 नवीन
मस्त ! :) फक्त शेवटच्या चित्रात २ टोन वापरलेस का बोट तशीच ठेवुन कलरटोन केलायस ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

व्ह्य

स्पा
Sun, 07/07/2013 - 15:56 नवीन
अरेच्चा हो दोन टोन झाल्या कि :) बोट मी मुद्दामून तशीच ठेवलेली खरे तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

छान आलेत

दिपक.कुवेत
Sun, 07/07/2013 - 16:32 नवीन
फोटो. भांडिवालीचे भाव एकदम बोलके!
  • Log in or register to post comments

लय भारी!

पैसा
Sun, 07/07/2013 - 17:06 नवीन
स्पाने केलेला प्रयोग पण आवडला!
  • Log in or register to post comments

कृष्णधवल फोटो

सुधीर
Sun, 07/07/2013 - 17:34 नवीन
कृष्णधवल फोटो आवडले. कुत्र्याचा फोटो छान दिसतोय. फारच गुणी दिसतोय.
  • Log in or register to post comments

सुरेख!

स्पंदना
Mon, 07/08/2013 - 07:51 नवीन
सुरेख! भांडीवाली जरा जरा रागवावं की काय अश्या संभ्रमात दिसते आहे. स्पाच भु भु गोद आहे, पण आवडली ती नाव अन पाणी..
  • Log in or register to post comments

सही फोटो आहेत..

पिंगू
Mon, 07/08/2013 - 19:37 नवीन
सही फोटो आहेत..
  • Log in or register to post comments

खिडक्या

मीनल
Wed, 07/10/2013 - 01:56 नवीन
खिडक्या एकदम सही आहेत.
  • Log in or register to post comments

या धाग्यात डोकावणार्‍या आणि

मदनबाण
Wed, 07/10/2013 - 10:02 नवीन
या धाग्यात डोकावणार्‍या आणि प्रतिसादाचे टंकन कष्ट घेणार्‍या सर्व मंडळींना ठांकु ! :)
  • Log in or register to post comments

क्रिएशन आवडली रे बाणा.

गवि
Wed, 07/10/2013 - 11:12 नवीन
क्रिएशन आवडली रे बाणा. खिडक्यावाला फोटो आणखीनच विशेष आवडला..
  • Log in or register to post comments

मस्त फोटो.

प्यारे१
Wed, 07/10/2013 - 15:29 नवीन
मस्त फोटो. एक अवांतर प्रश्नः मला वाटतं हा विषय मागे झालाय पण तरी, फोटो मधल्या किमान दोन व्यक्तींना माहिती आहे की फोटो काढताय. त्यांना फोटो प्रकाशित करणार आहे ह्याबाबत माहिती दिलेली का? त्यांचा आक्षेप तर नाही ना?
  • Log in or register to post comments

स्पावड्याचे पण!

प्यारे१
Wed, 07/10/2013 - 15:29 नवीन
स्पावड्याचे पण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

त्यांना फोटो प्रकाशित करणार

मदनबाण
Wed, 07/10/2013 - 15:52 नवीन
त्यांना फोटो प्रकाशित करणार आहे ह्याबाबत माहिती दिलेली का? त्यांचा आक्षेप तर नाही ना? प्रत्येक वेळेला फोटो काढताना ज्याचे फोटो काढले जात आहेत त्याची परवानगी घेता येईलच असे नाही.शिवाय परवानगी घेउन फोटो काढले तरी आपल्याला अपेक्षित असलेले भाव्,मुद्रा आणि परिस्थीती तशी मिळेल याची खात्री देता येत नाही.समजा उद्या मी रेल्वे पुलावर उभा राहुन खाली असलेल्या रेल्वेत चढणार्‍यांची स्पर्धा टिपतो आह?, अशा वेळी परवानगी मागायला कोणाकडे जाणार ? ;)आपला फोटो काढला जात आहे हे कळता क्षणीच चेहेर्‍यावरचे भाव बदलतात ! नुसता हसतानाचा चेहेर्‍याचा फोटो काढायचा म्हंटले तरी त्यात तो परिणाम साधता येत नाही जो मोकळेपणे हसताना नकळत काढल्या गेलेल्या फोटोत दाखवता येते. सांगुन काढलेल्या फोटोत हसण्यात आणि नजरेत एक प्रकारचा कॄत्रीमपणा आणि सजगता दिसुन येते. माझ्या या फोटोतील धारवाला आणि भांडी विकणारी स्त्री या दोघांनाही मी फोटो काढतोय हे कळले त्यातल्या धार काढणार्‍याला मी त्याचे फोटो काढतोय हे पाहुन तो सुखावला आणि आरामात फोटो काढुन देण्यासाठी थांबला.भांडीवाली बाईचे फोटो काढताना माझीच जरा घाई झाली कारण ती जेव्हा खाली आली तेव्हा व्ह्युफाइंडर मधुन मी दुसरा विषय टिपण्यात व्यस्त होतो. ती दिसली आणि पटकन आणि मी पटकन क्लीक केले... हा कोण नमुना माझे फोटो काढतोय असे भाव मला तिच्या नजरेतुन कळले ! ;) मी शक्योतो स्त्रीयांची ओळख पटेल किंवा त्यांचा चेहेरा स्पष्ट दिसेल असे फोटो काढण्याचे मुद्दामुन प्रयत्न करत नाही आणि ते जालावरही टाकत नाही, पण या वेळी मी माझ्याकडे असलेल्या २ भांडीवाल्यांचे टिपलेले फोटो माझ्या बायडीला दाखवले आणि यातला कुढला जास्त तुला आवडला असे विचारले तेव्हा जो वर दिला आहे त्याला तिने तीची पसंती दाखवली आणि म्हणुनच तो फोटो इथे दिला. लहान मुलांचे फोटो काढायचे असतील तर त्यांच्या पालकांची मी परवानगी घेतो आणि हे फोटो इंटरनेटवर जाणार आहेत हे ही सांगतो. या संकेस्थळाचा पत्ता आणि या संकेस्थळा विषयी सुद्धा सांगतो. कँडिड फोटोग्राफी मधे दरवेळी परवानगी घेता येईलच असे नाही,पण वरील कोणतेही फोटो काढताना ती तशी घेणे मला शक्य देखील नव्हते. माझ्या मते तुमचा उद्देश योग्य असेल तर तुम्हाला कुठलीच बोचणी लागत नाही,लागणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अधिक इकडे वाचा :- https://en

मदनबाण
Wed, 07/10/2013 - 16:08 नवीन
अधिक इकडे वाचा :- https://en.wikipedia.org/wiki/Candid_photography https://en.wikipedia.org/wiki/Street_photography
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा